विदर्भ

मुक्ततेसाठी होता गृह खात्यावर दबाव

सुरेश नगराळे

बचावासाठी समर्थकांनी केला होता पत्रांचा भडिमार

गडचिरोली - नक्षल्यांना मदत व देशविरोधी कारवाया करण्याच्या आरोपावरून जन्मठेपेची शिक्षा झालेले प्रो. जी. एन. साईबाबा यांच्या बचावासाठी देशविदेशातील त्यांच्या समर्थकांनी चौकशीदरम्यान तब्बल ३० हजार पत्रे पाठवून गृहखात्यावर दबाव टाकण्याचा प्रयत्न केला होता, अशी खळबळजनक माहिती मंगळवारी (ता. ७) समोर आली. पोलिसांनी साईबाबाला पहिल्यांदा अटक केल्यानंतर ही पत्रे पाठवण्यात आली होती.

माओवादी संघटनांचा मास्टर माइंड मानला जाणारा व दिल्ली विद्यापीठातील रामलाल आनंद महाविद्यालयात इंग्रजीचा प्राध्यापक असलेला प्रो. साईबाबा आंतरराष्ट्रीय स्तरावरही परिचित होता. त्याचे माओवाद्यांसोबतच आतंकवाद्यांसोबतही संबंध असल्याचे पोलिस तपासात सिद्ध झाले. अहेरीचे तत्कालीन उपविभागीय पोलिस अधिकारी सुहास बावचे यांनी संबंधांचा पाठपुरावा करत साईबाबाविरोधात सबळ पुरावे गोळा केले होते. या पुराव्यांमुळे प्रो. साईबाबा अडचणीत  आल्याचे लक्षात येताच देशविदेशातील त्याच्या समर्थकांनी माजी गृहमंत्री आर. आर. आबा पाटील, तसेच तपास अधिकाऱ्यांना सुमारे ३० हजार पत्रे पाठवून त्याच्या बचावाचा प्रयत्न केला होता. आबांना तर पत्रातून विनवणी करण्यात आली होती. मात्र, गृहखात्याने व आबांनी या पत्रांची फारशी दखल घेतली नाही. उलट साईबाबांचे धागेदोरे किती खोलवर पोहोचले आहे, याचाही तपास सुरू केला असता मुक्ततेसाठी होता गृह खात्यावर दबाव
विदेशातील सामाजिक संस्था, मानवाधिकार आयोगाच्या कार्यकर्त्यांचा समावेश असल्याचे आढळून आले. प्रो. साईबाबांचे माओवादी संघटनेशी संबंध नाही. ते एक चांगले प्राध्यापक असून हुशार, बुद्धिवंत तसेच ९० टक्के अपंग असल्याने पोलिसांनी नाहक त्यांना अडकवू नये अशा प्रकारचा मजकूर असलेली ३० हजार पत्रे प्राप्त झाली होती; परंतु आपण कुठल्याही दबावाला न घाबरता या प्रकरणाचा शेवट केल्याचे तपास अधिकारी सुहास बावचे यांनी सांगितले.  

गडचिरोली पोलिसांनी दिल्लीच्या जवाहरलाल नेहरू विद्यापीठाचा विद्यार्थी हेम मिश्रा यास ऑगस्ट २०१३ मध्ये महेश तिरकी व पांडू नरोटे या दोन युवकासह अहेरी येथे अटक केली होती. हेम मिश्राच्या माहितीवरून पोलिसांनी नंतर सप्टेंबर २०१३ मध्ये प्रशांत राही यास अटक केली. प्रा. साईबाबाने माओवादी नेता नर्मदाक्का यांना भेटण्यासाठी जेएनयूचा विद्यार्थी हेम मिश्रा याला अबुजमाड पहाडावर जाण्यास सांगितले होते. मात्र, महेश तिरकी व पांडू नरोटे यांच्याकडे पोलिसांना काही चिठ्ठ्या व पाच लाख रुपये रोख मिळाले होते. त्यातून या प्रकरणाचे गांभीर्य पोलिसांच्या लक्षात आले. गडचिरोली पोलिसांनी दिल्लीत प्रो. साईबाबांच्या निवासस्थानावर छापा टाकून महत्त्वाचे कागदपत्र हस्तगत केल्याने शिक्षेसाठी मोठी मदत झाली.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Sharad Pawar: अस्वस्थ आत्म्यापासून सुटका करुन घ्या म्हणणाऱ्या PM मोदींना शरद पवारांचं प्रत्युत्तर; म्हणाले, हे खरं आहे पण...

Latest Marathi News Live Update : काँग्रेस जनतेची संपत्ती, त्यांच्या व्होटबँकेला वाटणार, मोदींचा आरोप

PM Modi in Dharashiv: अमेरिकेत व्हाईट हाऊसमध्ये जेवणाच्या टेबलवर होतं 'सूपरफूड'; मोदींनी सांगितला किस्सा

T20 WC 24 South Africa Squad : दक्षिण आफ्रिकेने टी-20 वर्ल्ड कपसाठी संघाची केली घोषणा! 2 अनकॅप्ड खेळाडूंची ताफ्यात एन्ट्री

Indian Navy: "कोणत्याही आव्हानासाठी नौदल कायम सज्ज," पदभार स्वीकारताच नवे नौदल प्रमुख गरजले

SCROLL FOR NEXT