file photo
file photo 
विदर्भ

एलएलएमचा निकाल 30 दिवसांच्या आत

सकाळवृत्तसेवा

अमरावती ः संत गाडगेबाबा अमरावती विद्यापीठाच्या परीक्षा विभागाने एलएलएम पहिल्या सेमिस्टरसह अधिक एका शाखेचा निकाल 30 दिवसांत जाहीर केला. यामुळे विद्यापीठाची उशिरा निकाल देण्याची परंपरा नवीन परीक्षा संचालकांनी मोडीत काढल्याने कुलगुरू, प्र-कुलगुरू व परीक्षा संचालक आणि आयसीआरचे संचालक डॉ. खद्री यांचे अभिनंदन होत आहे.
संत गाडगोबाबा अमरावती विद्यापीठाचे तत्कालीन परीक्षानियंत्रक डॉ. भी. रा. वाघमारे निवृत्त झाल्यानंतर परीक्षा विभाग जणू वाऱ्यावरच होता. मूल्यांकन केंद्राची सिस्टीम सुरू करणारे डॉ. वाघमारे यांनी या केंद्राला कडक शिस्त लावली होती. मूल्यांकन केंद्रावर चौफेर त्यांची नजर असायची. दिवसातून एक-दोन राउंड त्यांचे केंद्रावर व्हायचेच, असे तेथील कर्मचारी सांगतात. त्यांच्या कार्यकाळात कुठलेही गुणवाढ प्रकरण घडले नाही. निकालही 30 ते 45 दिवसांच्या आत जाहीर होत होते. डॉ. वाघमारे निवृत्त झाल्यानंतर येणाऱ्या परीक्षा नियंत्रकांनी परीक्षेत्तर सर्व कामे मूल्यांकन केंद्रावर सोडून दिली होती. विद्यापीठाच्या जुन्या कायद्याप्रमाणे परीक्षांची जबाबदारी ही प्र-कुलगुरूंवर होती. मूल्यांकन केंद्रावर वाघमारे नंतर कुणीही परीक्षानियंत्रक फिरकत नसत. याचा परिणाम उशिरा निकाल लागण्यावर झाला. त्यामुळे विद्यार्थ्यांचे मोर्चे, आंदोलनाला परीक्षा नियंत्रकांविरुद्ध करण्यात येऊन त्याला नेहमी कुलगुरू डॉ. चांदेकरांना सामोरे जावे लागत होते. कुलगुरू डॉ. चांदेकरांनी विद्यापीठाच्या प्रशासनात व परीक्षा विभागात जातीने लक्ष दिले. त्यांनी आता डॉ. हेमंत देशमुख परीक्षा संचालक व डॉ. बाजीराव जयपूरकर यांची प्र-कुलगुरू म्हणून नियुक्‍ती केली. विद्यापीठ नवीन कायद्यानुसार प्र-कुलगुरूंकडे परीक्षांची जबाबदारी काढून टाकण्यात आल्यावरही कुलगुरूंनी ती त्यांच्यावर सोपविली होती. दोघांनीही विद्यार्थी केंद्रबिंदू मानून परीक्षाविभागाकडे लक्ष दिले. एलएलएम पहिल्या सेमिस्टरची परीक्षा 9 एप्रिलला संपल्यावर अवघ्या 30 दिवसांत निकाल जाहीर केला.
आयसीआरने दिला निकाल
या निकालाची जबाबदारी पूर्वी माइंड लॉजिक या कंपनीकडे होती. या कंपनीचे काम बंद केल्यानंतर विद्यापीठाच्या आयसीआर विभागाकडे काही परीक्षांची जबाबदारी देण्यात आली. यापैकी आयसीआरने एलएलएम पहिल्या सेमिस्टर व ऍडिशनल सेमिस्टरचा निकाल शुक्रवारी (ता. 10) जाहीर केला.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

IPL 2024 LSG vs KKR Live Score: दमदार सुरुवातीनंतर कोलकाताने गमावली पहिली विकेट; नवीन-उल-हकने आक्रमक खेळणाऱ्या ओपनरला धाडलं माघारी

Lok Sabha Election 2024 : लोकसभेचा तिसऱ्या टप्प्यातील प्रचार संपला, देशभरातील 94 जागांसाठी 7 मे रोजी मतदान

Ajit Pawar : रोहित पवार झाले भावनिक, अजित पवारांनी केली नक्कल! म्हणाले, असली नौटंकी...

IPL 2024 Point Table : ऋतुराजची चेन्नई टॉप फोरमध्ये दाखल! CSK च्या विजयानं पंजाबलाच नाही तर तब्बल सहा संघांना बसला धक्का

LinkedIn Job Search : नोकरीची चिंता आता सोडा.! लिंक्डइनवर जॉब शोधण्याची ‘ही’ आहे सोपी पद्धत

SCROLL FOR NEXT