विदर्भ

महाविद्यालयात नेमता येणार सेवानिवृत्त शिक्षक

सकाळ वृत्तसेवा
नागपूर : राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठाशी संलग्नित असलेल्या बऱ्याच महाविद्यालयांत विनाअनुदानित अभ्यासक्रमांना नियमित प्राध्यापक नसल्याचे दिसून येते. यासंदर्भातील नुकत्याच झालेल्या विद्वत परिषदेच्या बैठकीत विनाअनुदानित महाविद्यालयात रिक्त जागांवर सेवानिवृत्त प्राध्यापकांची नेमणूक करण्याच्या प्रस्तावाला मान्यता देण्याचे ठरविले आहे. त्यासाठी एका समितीची स्थापना करण्यात आली आहे.
यूजीसीने प्राध्यापकांच्या सेवानिवृत्तीचे वय 60 वरून 65 वर्षे केले. राज्य सरकारनेही त्यात बदल करून 60 वरून 65 वर्षे सेवानिवृत्तीचे वय केले. मात्र, काहीच दिवसांत राज्य सरकारने काही कारणे देत, पुन्हा नवीन अध्यादेश काढून प्राध्यापकांच्या सेवानिवृत्तीचे वय 65 वरून 60 वर्षे केले. सेवानिवृत्तीमुळे रिक्त झालेल्या पदावर अनुदानित महाविद्यालयांना प्राध्यापक भरतीसाठी मान्यता घेणे आवश्‍यक आहे. विनाअनुदानित महाविद्यालयांना अशी अट नसल्याने त्यांना प्राध्यापकांची नेमणूक करता येणे सहज शक्‍य होते. मात्र, या पदावर प्राध्यापकांची नेमणूक करताना पात्र व्यक्ती मिळत नसल्याची ओरड महाविद्यालयांकडून वारंवार होताना दिसून येते. त्यामुळे बऱ्याच महाविद्यालयांनी नियमित प्राध्यापकांची नेमणूक केलेली नाही.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Pune Metro: पुणेकरांची प्रतीक्षा लवकरच संपणार; हिंजवडी-शिवाजीनगर मेट्रोचे १२ स्थानके तयार, आता फक्त सरकारच्या निर्णयाची वाट!

Kolhapur Illegal Gravel Mining : कोल्हापूरचा बिहार होतोय का? प्रांताधिकाऱ्यांना खडी चोरीची टीप दिली अन् थेट डंपर अंगावर घातला

Latest Marathi News Live Update : २४ ते २५ जूनच्या सुमारास कोकणात पावसाच्या प्रमाणात वाढ होण्याचा अंदाज

Chhatrapati Sambhajnagar: शीतपेयातून पत्नीसह दोन मुलांवर विषप्रयोग; उपचारादरम्यान चारवर्षीय मुलाचा मृत्यू

Viral Video : आरटीओ कारवाईपासून वाचण्यासाठी चालकाने धावत्या डंपरमधून एक्सप्रेसवे वर सांडले दगड; वाहतूक ठप्प, पोलीस फावडे घेऊन लागले कामाला

SCROLL FOR NEXT