अर्जुनी मोरगाव : प्रवाशांसाठी जीवघेणा ठरणारा हाच तो राज्य महामार्ग. 
विदर्भ

हा रस्ता ठरला जीवघेणा...राज्य महामार्गावर उडतो चुरीचा धुराळा

सकाळ वृत्तसेवा

अर्जुनी मोरगाव (जि. गोंदिया) : गोंदिया-कोहमारा- अर्जुनी मोरगाव ते वडसा राज्य महामार्ग क्रमांक 275 ची अवस्था अतिशय दयनीय झाली आहे. वर्षानुवर्षांपासून या महामार्गाचे पक्के डांबरीकरण झाले नाही. मलमपट्टी करून बांधकाम विभाग मोकळा होत आहे. सध्या टाकलेल्या चुरीमुळे धुराळा होत असून, ये-जा करणाऱ्यांना जीव मुठीत घेऊनच प्रवास करावा लागते. याकडे मात्र, बांधकाम विभागासह लोकप्रतिनिधींचेही दुर्लक्ष होत आहे.

राज्य महामार्ग क्रमांक 275 हा गोंदिया-भंडारा, गडचिरोली-चंद्रपूर जिल्ह्यांना जोडणारा महत्त्वाचा दुवा आहे. परंतु, गेल्या कित्येक वर्षांपासून या महामार्गाच्या डागडुजीकडे कोणाचेही लक्ष गेले नाही. नावापुरताच उरलेला राज्य महामार्ग सद्यःस्थितीत अखेरच्या घटका मोजत आहे. या महामार्गावर अनेक ठिकाणी मोठमोठे खड्डे पडले आहेत. या महामार्गावरून प्रवास करणे म्हणजे अपघाताला आमंत्रण आहे.

अपघाताची शक्‍यता वाढली

काही दिवसांपूर्वी महामार्गावरील पडलेल्या खड्ड्यांत कुठे मुरूम, तर कुठे वाळू सिमेंट मिश्रित बारीक गिट्टी (चुरी) टाकून खड्डे बुजविण्याचा प्रयत्न करण्यात आला. मात्र, अधिक वर्दळीचा हा महामार्ग असल्याने चुरीचा धुराळा उडतो. त्यामुळे समोरहून येणाऱ्या वाहनचालकाला काहीच दिसत नाही. अशावेळी अपघाताची शक्‍यताही नाकारता येत नाही. अनेकदा या राज्य महामार्गावर अपघात होऊन जीवहानीसुद्धा झाली आहे. काही दिवसांपूर्वी महामार्गावर "सीडी वर्क' करण्यात आले. त्यामुळे येणे-जाणे सोयीचे होईल, अशी नागरिकांची आशा होती. मात्र, पावसाळा तोंडावर येऊनही या महामार्गाची अवस्था "जैसे थे' आहे. त्यामुळे येणाऱ्या पावसाळ्यातसुद्धा प्रवाशांना जीव मुठीत घेऊनच प्रवास करावा लागणार आहे.

श्‍वसनासंबंधी आजाराची शक्‍यता

खड्डे बुजविण्यासाठी चुरी टाकण्यात आली. मात्र, जड वाहतुकीमुळे चुरीचा धुराळा उडतो. समोरच्या आणि मागच्या व्यक्तींच्या नाकातोंडात हा धुराळा जातो. त्यामुळे श्‍वसनासंबंधीचे आजार उद्भवण्याची शक्‍यता नाकारता येत नसल्याचे नागरिकांचे म्हणणे आहे.

2018 मध्ये झाले होते आगळेवेगळे आंदोलन

या महामार्गाने अनेकांचा जीव घेतला. कित्येकांना अपंगत्व आले. असे असले तरीही महामार्ग दुरुस्तीकरिता बांधकाम विभाग कोणतेही पाऊल उचलायला तयार नाही. त्यामुळे या विभागाला जागे करण्यासाठी किंबहुना महामार्गाच्या दुरुस्तीसाठी डिसेंबर 2018 मध्ये राष्ट्रवादी कॉंग्रेसच्या कार्यकर्त्यांनी खामखुरा गावानजीक रस्त्यावर बेशरमची झाडे लावून व टायर जाळून आंदोलन केले होते. त्यावेळी खड्ड्यांमध्ये थातुरमातुर मुरूम टाकण्यात आले होते. मात्र, परत या रस्त्याची अवस्था "जैसे थे' झाली आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Buldhana Violence : बुलढाण्यात २ गटात राडा! तलवार अन् शस्त्रांनी वार; शिवसेना नगरसेवकासह राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्याचा मृत्यू, ७ जण जखमी

Leopard : दुष्काळात तेरावा महिना, भेंडाळा शिवारात बिबट्याच्या हल्ल्याचे सत्र सुरूच; पिंजरा लावण्याची मागणी

Phulambri News : तावडे केणेकरांच्या घरी, चव्हाण भाजप कार्यालयात..! पदवीधरच्या राजकारणात नेमके चाललेय तरी काय?

Mangalwedha News : दिल्लीच्या सीमेवर पंढरपूर मंगळवेढ्याच्या शेतकऱ्यांना रोखले; गनिमी पद्धतीने जंतर-मंतरवर धडक, मागण्यांसाठी आंदोलन

भारत-अमेरिका व्यापार कराराची चर्चा ठप्प! अर्थमंत्री निर्मला सीतारामण यांनी स्पष्ट शब्दांत सांगितलं कारण

SCROLL FOR NEXT