सिरोंचा : येथे सुरू असलेले सीसी रस्त्याचे काम.  
विदर्भ

सांगा, याला रस्ता म्हणावा की चिखलाची वाट...या रस्त्याने कसा करावा प्रवास

तिरुपती चिट्याला

सिरोंचा (जि. गडचिरोली) : येथील सिरोंचा नगरपंचायत हद्दीतील प्रभाग क्र 8, 9, 10 या वार्डांत सीसी रोडचे काम सुरू आहे. मात्र या रस्त्याच्या कामात मातीमिश्रित वाळू आणि निकृष्ट दर्जाची गिट्टी वापरली जात असल्याने बांधकामाचा दर्जा घसरल्याचा आरोप शिवसेनेचे माजी तालुकाध्यक्ष अमित तिपट्टी यांनी केला आहे.

या रस्त्याबद्दल माहिती देताना माजी तालुकाध्यक्ष तिपट्टी म्हणाले की, शहरातील रस्त्याचा विकास करण्यासाठी सरकारकडून लाखो रुपयांचा निधी दिला जात आहे. पण संबंधित अधिकाऱ्यांच्या दुर्लक्षामुळे या रस्त्याच्या कामात निकृष्ट दर्जाची गिट्टी व वाळूचा वापर होत असल्याने भविष्यात रस्ता उखडून जाण्याची शक्‍यता आहे.

नगरपंचायतीचा कानाडोळा

असे असतानाही या कामाकडे नगरपंचायत डोळेझाक करत असल्याचे दिसून येत आहे. नगरपंचायतीच्या इमारतीपासून अगदी हाकेच्या अंतरावर हे काम चालत असले, तरी कामावर जाऊन वापरण्यात येणाऱ्या वाळू व गिट्टीचा दर्जा पंचायत समितीचे अधिकारी किंवा पदाधिकारी पाहत नाहीत. त्यावरूनच विकासकामांच्या बाबतीने नगरपंचायतीचा दृष्टिकोन कसा आहे, याची जाणीव होते.

बांधकामाची चौकशी करा

सिरोंचा शहरातील 8,9,10 क्रमांकाच्या वॉर्डांत सुरू असलेल्या निकृष्ट दर्जाच्या सीसी रोडच्या बांधकामाची चौकशी करण्यात यावी, अशी मागणी शिवसेनेचे माहिती तालुकाध्यक्ष तिपट्टी यांनी नगरपंचायतीचे मुख्याधिकारी आणि सिरोंचा येथील तहसीलदार यांना निवेदनाद्वारे केली आहे.


दोषींवर होणार कारवाई

या रस्त्याबद्दलच्या आरोपांसंदर्भात मुख्याधिकारी विशाल पाटील यांच्याशी संपर्क साधला असता त्यांनी आपण या प्रकरणाची गंभीर दखल घेतली असल्याचे सांगितले. यासंदर्भात होत असलेले आरोप व तक्रारींची शहानिशा करून या कामाची चौकशी करू. या कामाबाबत काही दोष आढळून आल्यास संबंधित दोषींवर तत्काळ कारवाई करण्यात येईल. शिवाय या कामाचे त्रयस्थ लेख परीक्षण करण्यात येईल, असेही त्यांनी सांगितले.

(संपादन : दुलिराम रहांगडाले)

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Miraj Government Hospital Slab Collapse : मिरज शासकीय रुग्णालयाच्या आवारात मोठी दुर्घटना; नवीन कमानीचा स्लॅब कोसळला, 7 कामगार जखमी, एकाची प्रकृती गंभीर

‘1 किलो सोयाबीन काढून दाखवा, क्विंटलभर काजू-बदाम घेऊन जा’; सोयाबीनच्या नुकसानीवर शेतकऱ्याचा संताप |

‘अपशब्द वापरण्यापेक्षा…’ शशांक केतकर ट्रोलर्सवर भडकला? उत्तर देत म्हणाला...आधी मी काय म्हणतोय ते...'

Mangalwedha Drought: मंगळवेढ्यात पाणी-चाऱ्यासाठी काँग्रेसचे बेमुदत धरणे; काजू-बदामाच्या बैठकीवर चिरमुरे खाऊन आंदोलनाचा टोला

साठी गाठूनही सलमान खान फिट कसा? घरचं जेवण, वर्कआउट अन्... जाणून घ्या भाईजानचा फिटनेस फंडा

SCROLL FOR NEXT