Before the robbery the robber was Arrested
Before the robbery the robber was Arrested 
विदर्भ

दरोडा टाकण्यापूर्वीच दरोडेखोर जेरबंद ; बाळापूर पोलिसांची कारवाई

अनिल दंदी

बाळापूर (अकोला) :शहरात काल गुरुवारी मध्यरात्रीच्या सुमारास दरोडा टाकण्याच्या तयारीत असलेल्या एका अट्टल दरोडेखोराला बाळापूर पोलिसांनी शिताफीने जेरबंद केले. या दरोडेखोरांच्या ताब्यातून एक चारचाकी वाहन, दरोड्याचे साहित्य व मिर्ची पुड असा दोन लाख रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला. मात्र मुख्य सूत्रधार अभिमान पवार व त्याचे तीन साथीदार फरार होण्यात यशस्वी झाले आहेत. 

बाळापूर पोलिस ठाण्याचे प्रभारी ठाणेदार वैभव पाटील, पोलिस उपनिरीक्षक विठ्ठल वाणी व पोलिस कर्मचारी पोलिस ठाण्यात हजर असताना आज गुरुवारी सायंकाळच्या सुमारास 
शासकीय विश्रामगृहाकडे जाणाऱ्या रस्त्यावरील नाल्याजवळ असलेल्या पुलाच्या आडोशाला एक पांढऱ्या रंगाची एम एच १६ ए जे ६८४४ या क्रमांकाची विस्टा गाडी उभी असून, काही व्यक्ती संशयास्पद फिरत असल्याची माहिती पोलिसांना मिळाली. 

ठाण्यात बसलेल्या प्रभारी ठाणेदार वैभव पाटील यांनी क्षणाचाही विलंब न लावता पोलिस पथकासह विश्रामगृहाचा रस्ता गाठला. 
रस्त्याच्या कडेला एक वाहन उभे असल्याचे पोलिस पथकाच्या निदर्शनास आले. पोलिसांना पाहून लपून बसलेल्या चार संशयितांनी घटनास्थळावरून पळण्यास सुरवात केल्यामुळे पोलिसांनी या संशयितांचा पाठलाग केला. मात्र ते पळून जाण्यात यशस्वी ठरले. यावेळी  पोलिसांनी पकडलेल्या एका जणास ताब्यात घेऊन त्याची चौकशी केली असता त्याने आपले नाव अंकुश रामभाऊ फासाटे (३६) रा. राहटगाव ता. पैठण जि. औरंगाबाद असे सांगितले.  अन्य चार साथीदार अभिमान पवार (रा.वडजी ता.पैठण जि. औरंगाबाद) रमेश उबाळे (रा.रहाटगाव ता.पैठण,) अनिल फासाटे (रा.रहाटगाव ता.पैठण) यांच्या मदतीने बाळापूर शहरातील सोन्याच्या दुकानावर दरोडा टाकण्याचा उद्देश असल्याची कबुली पकडलेल्या या दरोडेखोराने दिली.

पोलिसांनी वाहनाची झाडाझडती घेतली असता मागच्या सिटवर एक लोखंडी कुकरी, एक लोखंडी कत्ता, दोन लाकडी दांडे, एक 
मिरची पावडरचे पाकीट, लांब नायलॉन दोरखंड असा एकूण २ लाख ३२० रूपयांचा ऐवज बाळापूर पोलिसांनी जप्त केला. पोलिसांच्या या कामगिरीमुळे पोलिसांचे कौतुक होत आहे. ही कारवाई ठाणेदार विनोद ठाकरे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिस सहा. निरीक्षक वैभव पाटील पोलिस उपनिरीक्षक विठ्ठल वाणी व पोलिस कर्मचाऱ्यांनी केली

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Sunetra Pawar: बारामतीत सुनेत्रा पवारांची उमेदवारी भाजपच्या दबावातून दिली का? अजित पवारांनी स्पष्टच सांगितलं

Rahul Gandhi Pune Sabha : ''मोदी आता ओबीसी असल्याचं सांगत नाहीत...'' राहुल गांधींनी पुण्याच्या सभेत सांगितलं कारण

MI vs KKR Live IPL 2024 : अय्यरची 70 धावांची खेळी, मुंबईसमोर विजयासाठी 170 धावांच आव्हान

SSC-HSC Result 2024 : सीबीएसईचा दहावी-बारावीचा निकाल २० मे नंतर होणार जाहीर

West Indies T20 WC 24 Squad : विंडीजच्या संघात सगळे स्टार मात्र इन फॉर्म जादूगारच मिसिंग

SCROLL FOR NEXT