Pravin-Togadia
Pravin-Togadia 
विदर्भ

संघ आणि भाजपला भगव्याचा विसर - प्रवीण तोगडिया

सकाळवृत्तसेवा

नागपूर - "राष्ट्रीय स्वयंसेवक संघ आणि भाजप सत्तेत येण्यापूर्वी स्वतःला हिंदू राष्ट्राच्या संकल्पनेचे पाईक सांगायचे. मात्र, आता संघ मुस्लिमांच्या सहभागाची भाषा बोलू लागला आहे आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी मुस्लिम मतांसाठी मशिदीत जात आहेत. संघ आणि भाजपने हिरवा रंग जवळ करून भगव्याशी फारकत घेतली आहे,' अशी बोचरी टीका आंतरराष्ट्रीय हिंदू परिषदेचे अध्यक्ष प्रवीण तोगडिया यांनी आज येथे पत्रकार परिषदेत केली.

आंतरराष्ट्रीय हिंदू परिषदेच्या कार्यकर्ता मेळाव्यासाठी नागपुरात आले असताना त्यांनी पत्रकारांशी संवाद साधला. प्रवीण तोगडिया म्हणाले, "अयोध्येत राम मंदिर व्हावे ही सर्व हिंदूंची इच्छा आहे. राष्ट्रीय स्वयंसेवक संघ आणि भाजपचाही तोच अजेंडा होता. मात्र, सत्ता मिळताच सरकारने राम मंदिराचा प्रस्ताव बाजूला ठेवला. चार वर्षांत एकदाही या मुद्यावर सरकारने भूमिका स्पष्ट केली नाही. राम मंदिराच्या मुद्यावर आंदोलन करणाऱ्यांना बाजूला करण्यास सुरवात केली. राम मंदिर मुद्यावर संसदेत कायदा करावा, अशीच आमची मागणी आहे. त्याचा आराखडा आमच्याकडे तयार आहे. मात्र, सरकारला अनुसूचित जाती/जमातींच्या कायद्यात अधिक रस आहे. संघालाही हेडगेवार आणि गोळवलकर गुरुजींच्या हिंदुत्वाचा विसर पडला आहे.'

बाळासाहेब ठाकरेच आदर्श
हिंदू राष्ट्राच्या संकल्पनेवर शिवसेना तयार झाली. त्या वेळी राम मंदिरासाठी बाळासाहेब ठाकरे यांनी भगव्या झेंड्याखाली सर्वांना एकत्र आणले. त्यामुळे ते आपले आदर्श असल्याचे प्रवीण तोगडिया म्हणाले. मोदी सरकारला हिंदू राष्ट्राचे स्वप्न साकारता येणार नसेल तर उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वात भगवा हातात घेऊन ते साध्य करावे, असेही आवाहन त्यांनी केले.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Amit Shah Fake Video Case : झारखंड काँग्रेसचं एक्स अकाऊंट सस्पेंड; अमित शाह व्हिडीओ प्रकरणात मोठी कारवाई

Google Error : गुगल डाऊन! जगभरातील युजर्स त्रस्त; अमेरिकेतून 1400 तक्रारी

Yogi Adityanath : काँग्रेस सत्तेत आल्यास हिंदूंची विभागणी होईल - योगी आदित्यनाथ

IPL 2024, CSK vs PBKS: चेन्नईला पंजाबच्या गोलंदाजांनी रोखलं अन् फलंदाजांनी ठोकलं; ऋतुराजसेनेचा बालेकिल्ल्यात दुसरा पराभव

Loksabha election 2024 : जेडीयूचे माजी प्रदेशाध्यक्ष शशांक राव यांचा भाजपात प्रवेश; उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची उपस्थिती

SCROLL FOR NEXT