Rural Hospitals Sakal
विदर्भ

मेळघाटची आरोग्यसेवा वाऱ्यावर; डॉक्टरांनी थाटले दवाखाने

आरोग्ययंत्रणेत काम करणारे अनेक डॉक्टर खासगी दवाखाने व रुग्णालये थाटून काम करीत आहेत.

राज इंगळे

अचलपूर (जि. अमरावती) : मेळघाटात जिल्हा परिषदेच्या (Jilha Parishad) आरोग्ययंत्रणेत काम करणारे अनेक डॉक्टर खासगी दवाखाने व रुग्णालये थाटून काम करीत आहेत. याची माहिती तालुका आरोग्य अधिकारी यांना असूनही अशा डॉक्टरांना खासगी सेवा करण्यापासून रोखण्यासाठी कोणतेही पाऊल आजवर उचलण्यात आलेले नसल्याचे दिसून येते. त्यामुळे अनेक वैद्यकीय अधिकारी खासगी दवाखानाही चालवितात, ही बाब आता स्पष्ट झाली आहे.

मेळघाटच्या चिखलदरा व धारणी तालुक्याच्या आरोग्य अधिकारी यांनी तक्रार नाही म्हणून कारवाई नाही, अशी भूमिका घेतल्याचे दिसून येते. मेळघाटच्या चिखलदरा व धारणी तालुक्यातील बहुतेक भरारी पथक तथा सीएचओ डॉक्टरांनी खासगी दवाखाने थाटले आहेत. परिणामी मेळघाटची आरोग्यसेवा वाऱ्यावर असल्याचे दिसून येते.

मात्र आरोग्य प्रशासन याकडे डोळेझाक करीत आहे. शासकीय डॉक्टर खरोखरच खासगी व्यवसाय करीत नाही ना, ही तपासण्याची जबाबदारी तालुका वैद्यकीय अधिकारी यांची आहे. मात्र दोघांपैकी कुणीही अशी यंत्रणा राबवीत नाही, असे स्पष्ट दिसते. त्यामुळे की काय मेळघाटात मोठ्या प्रमाणात शासकीय डॉक्टरांनी खासगी दवाखाने थाटले आहेत.

याकडे दोन्ही ठिकाणच्या तालुका वैद्यकीय अधिकाऱ्यांनी सरकारी डॉक्टरांच्या सेवाभावाच्या नावाने सुरू केलेल्या दुकानदारीला पायबंद घालण्याची गरज आहे. अन्यथा हा रुग्णांच्या जिवाशी खेळण्याचा खेळ असाच सुरू राहील, हे नव्याने सांगण्याची गरज नाही.

याबाबत माहिती घेण्यात येईल आणि ज्या डॉक्टरांनी खासगी दवाखाने थाटले अशांवर कारवाई करण्यात येईल.

- दिलीप रणमले, जिल्हा आरोग्य अधिकारी

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Kerala Cabinet: मुख्यमंत्र्यांच्या शपथविधीआधीच केरळ मंत्रिमंडळाची घोषणा! काँग्रेसच्या दिग्गज नेत्यांना संधी; कुणावर कोणती जबाबदारी?

DC vs RR: आधी वैभव सूर्यवंशी अन् परागची वादळी खेळी अन् मग स्टार्कच्या एका ओव्हरने खेळ पालटला; दिल्लीने राजस्थानला २०० च्या आत रोखलं

आता वाहने पेट्रोल किंवा डिझेलवर नव्हे, तर पाण्यावर चालणार; 'वॉटर फ्यूल' तंत्रज्ञानामुळे खर्च कमी होणार, हे आहे तरी काय?

Virat Kohli चा धमाका सुरूच! IPL २०२६ मध्ये ५०० धावा पार करत घडवला इतिहास, जवळपासही कोणी नाही; स्वत:चाही विक्रम मोडला

Viral Video: वाघ समोर असूनही हरणं पळाली नाहीत; बोर व्याघ्र प्रकल्पातील व्हिडिओ पाहून नेटकरी थक्क

SCROLL FOR NEXT