Mahavikas aghadi sakal
विदर्भ

Sakal Survey 2024 : विदर्भ : आघाडीवरील विश्वास वाढला

लोकसभा निवडणुकीत महाविकास आघाडीच्या बाजूने झुकलेला वैदर्भीय मतदारांचा कौल आजही कायम असल्याचे ‘सकाळ’ने केलेल्या ताज्या राज्यव्यापी सर्वेक्षणातही स्पष्ट दिसते.

संदीप भारंबे

लोकसभा निवडणुकीत महाविकास आघाडीच्या बाजूने झुकलेला वैदर्भीय मतदारांचा कौल आजही कायम असल्याचे ‘सकाळ’ने केलेल्या ताज्या राज्यव्यापी सर्वेक्षणातही स्पष्ट दिसते. विशेषतः महायुतीसाठी मतविभाजनाचा लाभ देणाऱ्या वंचितचा प्रभावही मावळतीला लागल्याचे चित्र असून, ही राजकीय परिस्थिती महायुती आणि विशेषतः भाजपसाठी धोक्याची घंटा आहे.

नुकत्याच पार पडलेल्या लोकसभा निवडणुकीत विदर्भातील दहा पैकी केवळ तीन जागांवर विजय मिळाल्याने भाजप नेतृत्वातील महायुतीला मानहानिकारक पराभवाला सामोरे जावे लागले. लोकसभेच्या काळात शेती प्रश्नांकडे केलेले दुर्लक्ष, जातीय गणिते, विद्यमान खासदारांविरोधातील रोष, सत्ताधारी पक्षाच्या पदाधिकाऱ्यांमध्ये आलेला उन्माद, पक्षांची अनावश्यक फोडाफोडी, मतविभाजनात आलेले अपयश आदी कारणांमुळे महायुतीला विदर्भात जोरदार फटका बसला.

आता अवघ्या तीन महिन्यांवर विधानसभा निवडणूक येऊ घातली आहे. लाडकी बहिण योजना, शेतकऱ्यांना वीजबिल माफी, आदी लोकप्रिय घोषणा झाल्या. त्यापैकी लाडकी बहिण योजनेला चांगला प्रतिसाद मिळतो आहे. परंतु, ताज्या सर्वेक्षणात विदर्भातील निम्म्या महिलांनी महाविकास आघाडीला पसंती दिली आहे. अपेक्षित रोजगार निर्मिती व महागड्या उच्च शिक्षणामुळे युवकांमध्येही नाराजीचे चित्र आहे.

भाजपकडून पुन्हा काँग्रेसकडे

विदर्भ हा पारंपरिकरीत्या काँग्रेस मतपेढी असलेला भाग आहे. परंतु, शिवसेनेचा पश्चिम विदर्भातील प्रवेश व राम मंदिर आंदोलनाच्या काळात विदर्भात भाजपचा प्रभाव वाढत गेला. गेल्या दहा वर्षांपासून तर भाजपचा गड बनला होता. परंतु, ताज्या लोकसभा निवडणुकीनंतर त्याला भगदाड पडले.

शेतीप्रश्न व जातीय समीकरणांचा मोठा प्रभाव

गेल्या काही निवडणुका पाहिल्या तर शेती प्रश्नाकडे सत्ताधाऱ्यांचे झालेले दुर्लक्ष, आश्वासनांकडे पाठ फिरविणे, बदलती जातीय समीकरणे, पक्षांची फोडाफोडी, यंत्रणांचा गैरवापर आदींमुळे राजकीय क्षेत्रात अनपेक्षित बदल होत आहेत. पूर्व विदर्भात ओबीसींची संख्या मोठी आहे. त्याचा राजकारणावर परिणाम होतो. पश्चिम विदर्भात मराठी पाटील समाजाचा राजकारणावर प्रभाव आहे. शिवाय दलित व मुस्लिमांची मतेही निर्णायक ठरत आहेत.

महायुतीला मतविभाजन आवश्यक

विदर्भात महायुतीला विजयी व्हायचे असेल तर महाविकास आघाडीला मिळणाऱ्या मतांमध्ये विभाजन घडवून आणणे आवश्यक आहे. लोकसभा निवडणुकीत अनेक ठिकाणी थेट लढती झाल्याने महायुतीला फटका बसला. अकोला व बुलडाणा या दोन्ही जागा केवळ मतविभाजनाच्या गणितामुळे महायुतीला जिंकता आल्या. त्यात वंचित बहुजन आघाडीचाही प्रभाव दिसला नाही. त्यामुळे यापुढे विधानसभा निवडणुकीच्या काळातही हे गणित जुळविणे आवश्यक बनले आहे.

सर्वेक्षणातील कल

  • 48.23% - महाविकास आघाडी

  • 29.50% - महायुती

  • 16.25% - ठरलेले नाही

  • 6.01% - यापैकी नाही

  • काँग्रेस - 35.99 %

  • भाजप - 29.70 %

  • राष्ट्रवादी काँग्रेस (शरदचंद्र पवार) - 7.50 %

  • शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) - 6.68 %

  • इतर - 5.69 %

  • शिवसेना - 3.52 %

  • वंचित बहुजन आघाडी - 3.38 %

  • राष्ट्रवादी काँग्रेस - 2.83 %

  • अपक्ष - 1.26 %

  • महाराष्ट्र नवनिर्माण सेना - 0.82 %

  • प्रहार - 0.75 %

  • आम आदमी पक्ष - 0.49 %

  • बहुजन विकास आघाडी - 0.39 %

  • स्वाभिमानी शेतकरी पक्ष - 0.37 %

  • एआयएमआयएम - 0.31 %

  • शेकाप - 0.25 %

प्रभाव टाकणारे मुद्दे

  • शेतीमालाला योग्य भाव मिळणे

  • युवकांना रोजगार उपलब्ध करून देणे

  • पिण्याच्या पाण्याची टंचाई दूर करणे

  • शिक्षणाची चांगली व्यवस्था

  • रस्ते व उद्योग विकास

  • जातीय समीकरणे

संभाव्य प्रमुख लढती

  • नागपूर दक्षिण पश्चिम - उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा मतदारसंघ.

  • बल्लारपूर - मंत्री सुधीर मुनगंटीवार येथून आमदार आहेत.

  • चिमूर - विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार येथून आमदार आहेत.

  • अहेरी - मंत्री धर्मरावबाबा आत्राम हे येथून आमदार आहेत.

  • कामठी - भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांचा हा गृहमतदारसंघ आहे.

  • काटोल - माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांचा हा मतदारसंघ आहे.

  • बडनेरा - रवी राणा हे येथून आमदार आहेत.

  • तिवसा - यशोमती ठाकूर येथून आमदार आहेत.

  • अचलपूर - बच्चू कडू येथून आमदार आहेत.

  • दिग्रस - मंत्री संजय राठोड येथून आमदार आहेत.

  • बाळापूर - गुवाहाटीहून परत आलेले नितीन देशमुख येथून आमदार आहेत

  • बुलडाणा - शिंदे गटाचे संजय गायकवाड येथून आमदार आहेत.

  • सिंदखेडराजा - माजी मंत्री राजेंद्र शिंगणे हे येथून आमदार आहेत.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

IND vs PAK T20 WC: हा विजय भारतीयांसाठी! पाकिस्तानच्या मुसक्या आवळल्यानंतर सूर्यकुमार यादवचं 'मन' जिंकणारं विधान...

IND vs PAK T20 WC: ८-१ ! कुठेही खेळा, पाकिस्तानचे वस्त्रहरण निश्चित! टीम इंडिया दणदणीत विजयासह Super 8s मध्ये; शेजाऱ्यांचा पुढचा मार्ग खडतर

IND vs PAK T20 WC: आधी झोडले, मग ट्रोल केले! पाकिस्तानची इभ्रत वेशीला टांगल्यानंतर इशान किशन काय म्हणाला वाचा...

Rahul Narwekar : अलिबागमध्ये नेमकं काय घडलं होतं? राहुल नार्वेकरांनी सांगितला घटनाक्रम; संजय राऊतांनाही दिलं आव्हान

Beed News : बीडमध्ये ‘लेडी बाऊन्सर्स’ची एन्ट्री; बिल्डरभोवती महिला सुरक्षेची कडेकोट फौज! जमिनीच्या वादानंतर घेतला अनोखा निर्णय

SCROLL FOR NEXT