Vidarbha Loksabha Election sakal
विदर्भ

Sakal Survey Loksabha 2024: ...तरच काँग्रेसला ‘अच्छे दिन’ अन्यथा विदर्भात राहणार भाजपचा वरचष्मा

Vidarbha Loksabha election survey: विदर्भात भाजपचे प्राबल्य आहे. पण काँग्रेसने ‘वंचित’ आघाडीला सोबत घेतले तरच ‘अच्छे दिन’ दिसण्याची शक्यता आहे.

संदीप भारंबे

विदर्भात भाजपचे प्राबल्य आहे. पण काँग्रेसने ‘वंचित’ आघाडीला सोबत घेतले तरच ‘अच्छे दिन’ दिसण्याची शक्यता आहे. अन्यथा भाजप वरचष्मा कायम राखण्यात यशस्वी होईल, अशी स्थिती आहे.

लोकसभेच्या आगामी रणसंग्रामात विदर्भ हा सर्वच पक्षांसाठी महत्त्वाचा आहे. आज भाजप आणि काँग्रेस या दोन्ही पक्षांचे प्रदेशाध्यक्ष हे विदर्भातील आहेत. एकेकाळी अगदी संकटकाळात विदर्भाने काँग्रेसला साथ दिली आहे.

परंतु गेल्या काही दशकांत काँग्रेसचे विदर्भातील वर्चस्व कमी होत गेले. गेल्या लोकसभा निवडणुकीत तर दहापैकी आठ जागांवर भाजपचे खासदार विजयी झाले. अमरावतीच्या अपक्ष खासदार नवनीत राणा यांनी राष्ट्रवादी काँग्रेसच्या मदतीने विजय मिळविला खरा, परंतु नंतर भाजपला पाठिंबा जाहीर केला आहे. आता तर त्या अपक्ष आहेत की, भाजपच्या खासदार हे सांगणे कठीण झाले आहे. चंद्रपुरात काँग्रेसचे एकमेव खासदार विजयी झाले होते. परंतु त्यांचे नुकतेच निधन झाले आहे.

काँग्रेस नेते राहुल गांधी यांच्या भारत-जोडो यात्रेनंतर विदर्भात काँग्रेसमध्ये पुन्हा नवचैतन्य निर्माण झाले. परंतु एकजूट दाखविल्याशिवाय काँग्रेसची शक्ती दिसणारच नाही. दरम्यानच्या काळात राज्याच्या राजकीय पटलावर अनपेक्षित बदल घडले आहेत. त्यामुळे लोकसभेसाठीचे जागा वाटप व योग्य उमेदवारीवरच विजयाचे गणित ठरणार आहे. भाजपही काही विद्यमान खासदारांना नारळ देण्याची शक्यता आहे. राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गट व शिवसेना शिंदे गटासोबतही काही जागांवर भाजपची रस्सीखेच सुरू आहे.

भंडारा-गोंदिया लोकसभेच्या जागेसंदर्भात प्रफुल्ल पटेल हे आग्रही आहेत. गडचिरोलीच्या जागेवरही धर्मराव बाबा अत्राम आग्रही आहेत. अजित पवार गटाच्या या दोन्ही नेत्यांचा आग्रह मोडणे तितके सोपे नाही. तिकडे शिंदे गटाकडे असलेल्या रामटेकच्या जागेवर भाजपने दावा केला आहे. महाविकास आघाडीतही वर्धा, अकोला, यवतमाळ-वाशीमसह आणखी काही जागांवरून रस्सीखेच सुरू आहे. अमरावतीच्या जागेवर अनपेक्षित उमेदवार दिला जाण्याची शक्यता आहे. नागपूर, अमरावती, यवतमाळ-वाशीम व चंद्रपूर हे मतदारसंघ सर्वाधिक चर्चेत राहण्याची शक्यता आहे.

पश्चिम विदर्भातील अकोला, यवतमाळ-वाशीम व अमरावती तर पूर्व विदर्भातील चंद्रपूर, रामटेक व भंडारा-गोंदिया अशा सहा जागांबाबत महाविकास आघाडी आशावादी आहे. मात्र, हे सर्व शक्य होईल ते मतविभाजन टाळण्यात यश मिळाले तरच. विदर्भात नागपूर, वर्धा आणि बुलढाणा या जागा ‘एनडीए’कडेच राहण्याची शक्यता आहे तर मात्र, उर्वरित सर्वच जागांवर ‘एनडीए’ला जोर लावावा लागणार आहे. ही स्थिती ताज्या सर्वेक्षणातून पुढे येताना दिसते. परंतु लोकसभेसाठी प्रत्यक्ष मतदान होईपर्यंत अनेक घडामोडी होण्याची शक्यता असून यंदाची निवडणूक सर्वाधिक चर्चेची राहण्याची शक्यता आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Pakistan T20 WC Qualification Scenario : भारताकडून हार अन् पाकिस्तानी बेजार! गुणतालिकेत उलथापालथ, अमेरिका दुसऱ्या क्रमांकावर, पाकडे Super 8s मध्ये कसे पोहोचणार?

IND vs PAK T20 WC: हा विजय भारतीयांसाठी! पाकिस्तानच्या मुसक्या आवळल्यानंतर सूर्यकुमार यादवचं 'मन' जिंकणारं विधान...

Harshvardhan Sapkal : 'मुंबईतील रस्त्याला 'टिपु सुलतान'चं नाव देण्याचा भाजपने दिला होता प्रस्ताव', हर्षवर्धन सपकाळांनी थेट पुरावाच सादर केला..

IND vs PAK T20 WC: ८-१ ! कुठेही खेळा, पाकिस्तानचे वस्त्रहरण निश्चित! टीम इंडिया दणदणीत विजयासह Super 8s मध्ये; शेजाऱ्यांचा पुढचा मार्ग खडतर

IND vs PAK T20 WC: आधी झोडले, मग ट्रोल केले! पाकिस्तानची इभ्रत वेशीला टांगल्यानंतर इशान किशन काय म्हणाला वाचा...

SCROLL FOR NEXT