Sharad Pawar  esakal
विदर्भ

Sakal Survey : कर्ती मंडळी दादांकडे, ज्येष्ठांची पसंती साहेबांना

अमरावतीची जागा भाजपच्या जवळ गेलेल्या नवनीत राणा यांच्याकडे आहे.

संदीप भारंबे

Sakal Survey - विदर्भात मुळातच राष्ट्रवादी काँग्रेसचा प्रभाव कमी आहे. राष्ट्रवादी काँग्रेसचे जे काही अस्तित्व होते ते काही बड्या नेत्यांपुरतेच मर्यादित होते. त्यांच्याभोवतीच राष्ट्रवादी काँग्रेसचे राजकारण फिरते. ज्यांचा प्रभाव शिल्लक आहे त्यातील बहुतेक जण सध्या अजित पवार यांच्याकडे गेले आहेत. तर जुनी जाणती मंडळी ही शरद पवार यांच्यासोबत आहेत.

विदर्भात राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रामुख्याने अनिल देशमुख, प्रफुल्ल पटेल, धर्मरावबाबा आत्राम, मनोहर नाईक, सुरेश देशमुख, हर्षवर्धन देशमुख, डॉ. राजेंद्र शिंगणे, डॉ. संतोषकुमार कोरपे, सुभाष ठाकरे, शिरीष धोत्रे, रमेश बंग आदी नेत्यांची नावे घेतली जात होती.

त्यानंतर गुलाबराव गावंडे, तुकाराम बिडकर, डॉ. आशा मिरगे, रेखाताई खेडेकर, संजय खोडके, घुईखेडकर यांची नावे घेतली जातात. तसेच नव्या दमाचे अनेक नेतेही तयार झाले होते. या सर्वांपैकी राजकारणात अजूनही प्रभाव राखून असलेल्या नेत्यांनी अजित पवारांचा गट जवळ केला आहे.

विदर्भात भाजपची पकड मजबूत आहे. लोकसभेच्या दहा जागांपैकी चंद्रपुरातून काँग्रेसचे एकमेव उमेदवार बाळू धानोरकर विजयी झाले होते. परंतु, त्यांचे नुकतेच अकाली निधन झाले आहे. उर्वरित पाच जागांवर भाजपचे तर तीन जागांवर सध्या शिवसेनेच्या शिंदे गटाचे खासदार आहेत.

अमरावतीची जागा भाजपच्या जवळ गेलेल्या नवनीत राणा यांच्याकडे आहे. राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये फूट पडल्यानंतर आगामी लोकसभा निवडणुकीत भंडारा-गोंदिया लोकसभा मतदारसंघावर प्रफुल्ल पटेल हे दावा सांगू शकतात. येथे भाजपचे सुनील मेंढे हे खासदार आहेत.

मित्र पक्षाची ताकद कमी करण्याचे धोरण

विदर्भात भाजप हाच एकमेव प्रभावी पक्ष राहावा यासाठी नेत्यांचा प्रयत्नात असतो. युतीतील पक्षाला त्याचा प्रभाव असलेल्या भागातील अधिकच्या जागा देऊन विदर्भातून हद्दपार करण्याचे भाजपचे धोरण आहे. यापूर्वीही शिवसेनेसोबत युतीत असताना विदर्भातून शिवसेनेची ताकद कमी करण्याचे काम भाजपने केले.

आता राष्ट्रवादी काँग्रेसलाही तोच नियम लावला जाणार असल्याचे बोलले जाते. विधानसभेत ‘राष्ट्रवादी’चे सध्या सहा आमदार आहेत. त्यापैकी अनिल देशमुख सोडले तर सर्वच आमदार अजित पवार गटात गेले आहेत. विधानसभेतही विदर्भातून राष्ट्रवादीच्या वाट्याला यापेक्षा एखादं-दोन जागा अधिक मिळू शकतील. प्रामुख्याने शिवसेनेचा उद्धव ठाकरे गट व काँग्रेसला डॅमेज करण्यासाठीच अजित पवार गटाचा वापर होण्याची दाट शक्यता आहे.

काटोलचे अनिल देशमुख हे एकमेव आमदार शरद पवार यांच्यासोबत आहेत. अमरावतीतील राष्ट्रवादीचे संजय खोडके, सुरेखा ठाकरे अजित पवार गटात आहेत.

त्यामुळे येथे अजित पवार गटाचेच वर्चस्व दिसते. सहकार क्षेत्रातील डॉ. संतोषकुमार कोरपे, हर्षवर्धन देशमुख, रमेश बंग, गुलाबराव गावंडे, डॉ. आशा मिरगे हे शरद पवार यांच्या गटात आहेत. सध्या पदावर असलेल्यांपैकी बहुतेक जण अजित पवार यांच्याकडे गेले आहेत.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Pakistan President: ''आम्ही हिंदूंना सहन करतो'', पाकिस्तानातील अल्पसंख्याकांबाबत राष्ट्रपती झरदारींचं संतापजनक विधान

IND vs SL: KL राहुलचा स्वीप शॉट अन् चेंडू आदळला थेट श्रीलंकन खेळाडूच्या हेल्मेटवर; सर्वांच्याच काळजाचा चुकला ठोका!

तीन वेळा अबॉर्शन झालं... स्वाती देवलने सांगितला डोळ्यात पाणी आणणारा प्रसंग; म्हणाली, 'तुषार खूप रडला कारण...

Prithviraj Chavan: ''तुम्ही माझा राजकीय खून केलात?'' पृथ्वीराज चव्हाणांना गोपीनाथ मुंडे काय म्हणाले होते? पडद्यामागे नेमकं काय घडलेलं?

Samarth Movie Review: मनाचे श्लोक, अध्यात्म अन् बाप-लेकाचा संघर्ष; विचार करायला लावणारा 'समर्थ'; कसा आहे चित्रपट?

SCROLL FOR NEXT