पवनी : कालव्यातून सांबराला बाहेर काढताना मैत्र व वनविभागाचे कर्मचारी.
पवनी : कालव्यातून सांबराला बाहेर काढताना मैत्र व वनविभागाचे कर्मचारी. 
विदर्भ

कालव्यात पडलेल्या सांबराला जीवनदान

सकाळवृत्तसेवा

पवनी (जि. भंडारा)  : गोसेखुर्द धरणाच्या उजव्या कालव्यात पडलेल्या सांबराला शुक्रवारी मैत्र वन्यजीव संरक्षण व संवर्धन संस्था, वनविभागाच्या दलाने मिळून जीवदान दिले. गोसेखुर्द धरणाच्या उजव्या कालव्यात नेहमीच अभयारण्यातील वन्यप्राणी पडण्याच्या घटना घडतात.
आजवर मैत्रने 25 च्यावर प्राण्यांचा जीव वाचविला आहे.
गोसेखुर्द धरणाच्या उजव्या कालव्याच्या गुडेगाव बीट क्रमांक 1 मध्ये सांबर कालव्यात पडल्याची माहिती बीटरक्षक ए. व्ही. खेंते यांनी भ्रमणध्वनीवरून वन मैत्रचे सचिव माधव वैद्य यांना दिली. त्यानंतर वैद्य आपल्या चमूसह घटनास्थळी दाखल झाले. वनविभागाचे कर्मचारी व सदस्यांनी संयुक्तरीत्या प्रयत्न करून सांबराला चार तासाच्या अथक परिश्रमानंतर कालव्यातून बाहेर काढले. वनपरिक्षेत्राधिकारी कोमल जाधव, मैत्रचे अध्यक्ष महादेव शिवरकर यांच्या मार्गदर्शनात संघरत्न धारगावे, राहुल वाघमारे, महेश मठीया, अतुल जुमळे, प्रफुल्ल रामटेके, अमोल वाघधरे, चंद्रकांत काटेखाये, चंदू देशमुख, मनोज भुरे यांनी सहकार्य केले.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

IPL 2024 MI vs SRH: सूर्यकुमारचं तडाखेबंद शतक अन् मुंबईचा दणदणीत विजय; वानखेडेवर हैदराबादला दिला पराभवाचा धक्का

MI vs SRH: पहिलाच सामना अन् हेडचा उडवलेला त्रिफळा, पण झाला नो-बॉल; निराश झालेल्या अंशुलला बुमराह-हार्दिकने असा दिला धीर

Mumbai News : मुंबईतील कार्यालयीन वेळेत बदल होणार? रेल्वेच्या आवाहनाला ३३ कंपन्यांचा प्रतिसाद

Abhishek Ghosalkar: घोसाळकर कुटुंबियांना सीसीटीव्ही फुटेज दाखवा; हायकोर्टाचे पोलिसांना निर्देश

Mumbai Riots: मुंबईतील 1992च्या दंगलीतील खटले निकाली काढा; सुप्रीम कोर्टाचे सरकारला निर्देश

SCROLL FOR NEXT