Samruddhi Mahamarg Accident truck caught fire after near buldhana Video  
विदर्भ

Samruddhi Mahamarg Accident Video : 'समृद्धी'वर अपघातांचं सत्र थांबेना; टायर फुटून ट्रकला भीषण आग

रोहित कणसे

samruddhi mahamarg accident news : समृद्धी महामार्ग हा त्यावर होणाऱ्या सततच्या अपघातांमुळे नेहमीच चर्चेत असतो. या रस्त्यावर झालेल्या भीषण अपघातात शेकडो प्रवाशांनी जीव गमवला आहे. दरम्यान या महामार्गावर होणाऱ्या अपघातांचं सत्र काही थांबताना दिसत नाहीये. आता केमिकल घेऊन जाणाऱ्या एका ट्रकचा समृद्धी महामार्गावर भीषण अपघात झाला.

नाशिकहून नागपूरच्या दिशेने निघालेल्या ट्रकचा बुलढाण्यातील मेहकरजवळ अचानक समोरील टायर फुटला. त्यामुळे ट्रक अनियंत्रित होऊन डिव्हायडरला जाऊन धडकला. या अपघातात ट्रकला अचानक आग लागली.या आगीत ट्रक पूर्णपणे जळून खाक झाला आहे.

ट्रकचालक आणि वाहकाने वेळेवर ट्रकबाहेर उडी घेतल्याने सुदैवाने या अपघातात कोणतीही जीवितहानी झाली नाही. या अपघातानंतर महामार्गावरील वाहतूक काही काळ ठप्प झाली होती. घटनेची माहिती अग्निशमन दलाचे जवान घटनास्थळी दाखल झाले. यानंतर ही आग आटोक्यात आणण्यात आली.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Ashadhi Ekadashi : महापूजेवेळीही भाविकांसाठी श्री विठ्ठलाचे मुखदर्शन सुरू; पदस्पर्श दर्शनाची रांग मंदिरापासून 20 किमी अंतरावर, पंढरपुरात 30 लाखांहून अधिक भाविकांचा महापूर

What is The Significance Of Pandharpur Wari? पाऊले चालती पंढरीची वाट...

Pandharpur Ashadhi Ekadashi : "बा विठ्ठला, राज्यातील प्रत्येक शेतकरी सुखी राहू दे..."; शासकीय महापूजेनंतर CM फडणवीसांचे पांडुरंगाला साकडे

Ashadhi Ekadashi Mahapuja : '20 वर्षे एकही वारी चुकवली नाही...'; मुख्यमंत्री फडणवीसांसोबत शासकीय महापूजेचा कोणाला मिळाला मान? धाराशिवमधील शेतकरी दाम्पत्य आहे तरी कोण?

Pandharpur Ashadhi Ekadashi Live Updates : CM देवेंद्र-अमृता फडणवीसांच्या हस्ते विठूरायाची महापूजा; मुख्यमंत्र्यांनी काय मागितलं मागणं?

SCROLL FOR NEXT