Sanjay Rathod's vehicle accident sakal
विदर्भ

Sanjay Rathod : पालकमंत्री संजय राठोड यांच्या ताफ्यातील वाहनाचा भीषण अपघात; चालक गंभीर जखमी

Sanjay Rathod : पालकमंत्री संजय राठोड यांच्या ताफ्यातील वाहनाला आर्णी-दिग्रस रोडवर भीषण अपघात झाला, ज्यात चालक जखमी झाला आहे. राठोड दुसऱ्या वाहनात होते आणि त्यांची प्रकृती स्थिर आहे, असे त्यांनी स्पष्ट केले.

सकाळ वृत्तसेवा

यवतमाळ/आर्णी : वाशीम जिल्ह्यातील पोहरादेवी येथील नियोजित कार्यक्रमाच्या तयारीचा आढावा घेऊन परत येताना पालकमंत्री संजय राठोड यांच्या ताफ्यातील वाहनाचा भीषण अपघात झाला.

ही घटना आर्णी-दिग्रस रोडवरील कोपरा गावाजवळ शुक्रवारी (ता. ४) मध्यरात्री दोन ते अडीच वाजताच्या दरम्यान घडली. यात चालक जखमी झाल्याची माहिती आहे. मात्रसायंकाळपर्यंत पोलिस ठाण्यात तक्रार दाखल नव्हती. प्राप्त माहितीनुसार, वाशीम जिल्ह्यातील पोहरागड येथे शनिवारी (ता. ५) पंतप्रधान नरेंद्र मोदी, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, अजित पवार यांच्या उपस्थितीत नंगारा म्युझियमचे उद्‍घाटन होणार आहे.

या कार्यक्रमाची तयारी अंतिम टप्प्यात आहे. या तयारीचा आढावा घेण्याकरिता पालकमंत्री संजय राठोड गुरुवारी (ता. ३) पोहरादेवी येथे गेले होते. अशात परतीच्या मार्गाने पालकमंत्री संजय राठोड आणि त्यांचे सहकारी मध्यरात्री येत होते. दरम्यान, आर्णी ते दिग्रस रोडवरील कोपरा गावाजवळ त्यांच्या ताफ्यातील वाहनाने पिकअपला मागील बाजूने धडक दिली. ही धडक एवढी जोरदार होती की, पालकमंत्र्यांच्या ताफ्यातील वाहनाचा चक्काचूर झाला आहे. या अपघातात वाहनाचा चालक जखमी झाला असून, त्याला तातडीने रुग्णालयात उपचाराकरिता दाखल केले आहे.

पालकमंत्री राठोड दुसऱ्या वाहनात होते. सध्या चालकाची प्रकृती स्थिर असल्याची माहिती मिळाली आहे. धडक दिलेल्या वाहनात केळी होती. रस्त्यावर अस्ताव्यस्त झालेली केळी दुसऱ्या वाहनात टाकून पोहरागड येथे पाठविण्यात आली आहे.

अपघातानंतर घटनास्थळी असलेले वाहन रात्रीतून इतरत्र हलविण्यात आले. तर शुक्रवारी (ता. ४) उशिरापर्यंत पोलिस ठाण्यात तक्रार दाखल करण्यात आली नव्हती.

पोहरागड येथून परत येताना मी दुसऱ्या वाहनात बसून होतो. या वाहनाचा अपघात झाल्याचे कळताच चालकाला रुग्णालयात उपचाराकरिता दाखल केले. सध्या मी सुखरूप आहे. सोशल मीडियावरील अफवा अत्यंत चुकीच्या आहेत.

- संजय राठोड, पालकमंत्री, यवतमाळ-वाशीम.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

MPSC Main Exam Pattern: राज्य सेवा मुख्य परीक्षेच्या स्वरूपात मोठा बदल; वैकल्पिक विषय वगळला, पुढच्या वर्षीपासून अंमलबजावणी

Pune Kothrud theatre delay: कोथरूडमधील बाळासाहेब ठाकरे बालनाट्यगृह १२ वर्षांपासून रखडले; भित्तीचित्रांसाठी तब्बल ६९ लाखांचा खर्च मंजूर

Ketan Agarwal Murder : केतन अग्रवाल खून प्रकरण जलदगती न्यायालयात; विशेष सरकारी वकील म्हणून उज्ज्वल निकम नियुक्त

Takli Rajerai vet hospital crisis: टाकळी राजेराय पशुवैद्यकीय रुग्णालयात मनुष्यबळ व सुविधांचा अभाव; नऊ हजार जनावरांचे आरोग्य धोक्यात

Dangerous ZP School Building: टाकळी राजेराय जि.प. शाळेची धोकादायक इमारत; २०१७ पासून लोबकळता स्लॅब, विद्यार्थ्यांच्या जीवाशी सुरूच खेळ

SCROLL FOR NEXT