Scheduled Caste person was denied entry into temple crime against three sakal
विदर्भ

अनुसूचित जातीच्या व्यक्तीला मंदिरात प्रवेश नाकारला

धामणी येथील घटना; तिघांवर गुन्हे दाखल

सकाळ वृत्तसेवा

मानोरा : मानोरा पोलीस स्टेशन अंतर्गत येणाऱ्या धामणी (मानोरा) येथील जाणामाता मंदिरात अनुसूचित जातीचा असल्याने प्रवेश नाकारून मारहाण केल्याची संतापजनक घटना १९ जुलै रोजी घडली होती. या प्रकरणी पीडिताच्या फिर्यादीवरून मानोरा पोलिसांनी तीन जणांविरोधात अनुसूचित जाती जमाती अन्याय प्रतिबंधक कायद्यानुसार गुन्हा दाखल केला आहे. पोलिस सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार मानोऱ्यातील संतोषीमाता नगरात पंकज श्रीकृष्ण कंठाडे हे त्यांच्या सासुरवाडीत राहतात. त्यांची सासू आशाबाई लसनकार यांनी धामणी येथील जाणामाता मंदिरात दर्शनासाठी चलण्यास सांगितले. त्यामुळे ते १९ जुलै रोजी रात्री ७ ते ७.३० वाजता मोटारसायकलने सासूसोबत मंदिरात गेले होते.

तिथे गजानन महाराज मंदिरासमोर असलेल्या किशोर पाटील व गजानन ठाकरे यांनी हे मंदिर तुमच्या समाजाचे नाही, असे सांगून पंकज व आशाबाई यांना मंदिरात जाऊ दिले नाही. तसेच त्यांना धक्काबुक्की करून शिवीगाळ केली. त्याच वेळी जगदीश गाढवे याने दोघांनाही लोखंडी पाईपने मारहाण केली. त्यात आशाबाई लसनकार जखमी झाल्या. तर, पंकज कठाडे हे जीवे मारण्याची धमकी दिल्यामुळे घाबरून त्यांच्या गावी अमरावतीला निघून गेले.

या घटेची तक्रार पंकज कठाडे यांनी शुक्रवारी (ता. २२) मानोरा पोलिस ठाण्यात केली. त्यावरून मानोरा पोलिसांनी आरोपी गजानन ठाकरे, किशोर पाटील व जगदीश गाढवे पाटील यांच्याविरुद्ध गुन्हे दाखल केले. घटनेचा तपास कारंजा उपविभागीय पोलिस अधिकारी जगदीश पांडे, पोलिस उपनिरीक्षक सविता वड्डे हे करीत आहेत.

धामणी येथील मंदिरात प्रवेश करण्यास अटकाव केल्याप्रकरणी तीन जणांवर गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. या प्रकरणाचा तपास सुरू आहे.

- जगदीश पांडे, उपविभागीय पोलिस अधिकारी, कारंजा

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Gold Rate Today : सोनं-चांदी स्वस्त! 6 दिवसांनंतर पहिल्यांदा मोठी घसरण; काय आहे आजचा भाव?

Nashik Politics : नाशिकमध्ये सत्तास्थापनेचा मार्ग मोकळा, भाजपच्या संपर्कात 'इतके' नगरसेवक? गिरीश महाजनांच्या दाव्याने खळबळ

'पुष्पा 3' मध्ये भाईजानची एन्ट्री? सलमान खान साकारणार गूढ आणि ताकदवान पात्र?

Latest Marathi News Live Update : या तालुक्यांत जिल्हा परिषद आणि पंचायत समिती निवडणुकीसाठी दोन्ही राष्ट्रवादी काँग्रेस एकत्र

Property Tax : मिळकतकर थकबाकीदारांवर जप्ती! महापालिकेकडून आजपासून कारवाई तीव्र; कोणतीही सूट नाही

SCROLL FOR NEXT