विदर्भ

स्क्रब टायफसचा उद्रेक

सकाळ वृत्तसेवा

नागपूर : मागील वर्षी स्क्रब टायफसच्या आजाराने 33 रुग्णांचे बळी घेतले होते, तर 201 रुग्ण आढळून आले होते. यंदा ऑगस्टपासून स्क्रब टायफसने पुन्हा डोकं वर काढले आहे. विशेष असे की, स्क्रब टायफसच्या 50 रुग्णांची नोंद मेडिकलमध्ये झाली असून यातील 6 जणांचा मृत्यू झाला आहे. यामुळे नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण आहे. 
ट्रॉम्बिक्‍युलीड माइट्‌सचे लारव्हे; ज्याला चिगर माइट्‌स म्हणतात त्याच्यातील ओरिएन्शिया सुसुगामुशी जंतू मानवी शरीरात प्रवेश केल्याने स्क्रब टायफसचा धोका आहे. स्क्रब टायफसवर उपचार न घेतल्यास साधारण 50 टक्के रुग्णांना मेंदूचा आजार होतो. योग्य उपचार मिळाले नाही, तर 25 टक्के रुग्णांचा मृत्यूही होतो. गेल्या वर्षी ऑगस्ट महिन्यात नागपुरात सर्वाधिक रुग्ण आढळून आले होते. एकट्या नागपुरात 100 रुग्णांची नोंद झाली होती. या आजाराचे मूळ शोधून काढण्यासाठी नागपुरात दिल्ली येथील राष्ट्रीय रोगनियंत्रण केंद्राचे (एनआयसीडी) पथक आले होते. त्यांच्या मदतीला आरोग्य विभागाच्या हिवताप व हत्तीरोग विभागातील कीटकशास्त्रज्ञ होते. रुग्ण आढळून येणाऱ्या भागातील उंदीर पकडण्यासाठी आरोग्यकर्मचाऱ्यांना "रॅट ट्रॅप' लावण्यात आले होते. पकडलेल्या उंदरांच्या अंगावरील चिगर माइट्‌स काढून अभ्यासही केला होता. 
आरोग्य विभागात 23 रुग्णांची नोंद 
स्क्रब टायफसच्या 50 रुग्णांची नोंद मेडिकलमध्ये झाल्यामुळे येथील वैद्यकीय वर्तुळात खळबळ उडाली आहे. त्याचप्रमाणे आरोग्य विभागातही 23 रुग्णांची नोंद झाली आहे. आरोग्य विभागाच्या नोंदीत शहरातील दोन रुग्णांसह भोपाळ, इटारशी आणि भंडारा येथील प्रत्येकी एका रुग्णाचा समावेश आहे. 
प्रतिबंधक उपाय 
डायइथील टॉल्युअमाइड किंवा बेनझील बॅन्झोईट अंगावर लावावे. उंदीर नियंत्रणाकरिता उपाय करावे. उंदीर मारण्याचे औषध टाकावे. कपडे बदलत असताना कपडे झटकून घालावे. झाडाझुडपात काम करून आल्यावर आपले कपडे गरम पाण्यात भिजवावे. गरज पाण्याने अंघोळ करावी. घरे, दवाखाना, कार्यालयाच्या परिसरात वाढलेल्या गवतावर 20 सेंटीमीटर उंचीपर्यंत तज्ज्ञांच्या सल्ल्यानुसार कीटकनाशकाची फवारणी करावी. स्क्रब टायफस हा आजार एका व्यक्तीपासून दुसऱ्या व्यक्तीला होत नाही. मात्र, एका व्यक्तीच्या शरीरावर, कपड्यावर चिकटलेल्या दूषित चिगर त्याच्या निकट संपर्कातील व्यक्तीपर्यंत पोहोचू शकतात, असे आरोग्य विभागातर्फे कळविण्यात आले आहे. 
 

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Railway News: प्रदूषणाला रेल्वेचं जोरदार उत्तर! आता पैसा अन् वेळही वाचणार; भारतीय रेल्वेची नवी वाहतूक क्रांती सुरू, योजना काय?

Pune Court Decision: पतीला जीव देण्यास प्रवृत्त केलं, पत्नीला सात वर्षांची सक्तमजुरी! दुसरा विवाह अन्...

Latest Marathi Breaking News Live Update: शिवसेनेच्या नाराजीच्या पार्श्वभूमीवर अजित पवार - फडणवीस भेट

Akola News : सुपरस्पेशालिटी हॉस्पिटलचे खाजगीकरण करण्याचा डाव; आ. साजिद खान यांचा स्फोटक आरोप

Leopard Attack : दोन बिबट्यांचा मेंढ्यांच्या कळपावर हल्ला; जीव धोक्यात घालून मेंढपाळ महिलेने केला प्रतिकार

SCROLL FOR NEXT