Coaching_Classes
Coaching_Classes 
विदर्भ

‘सीलबंद’ कारवाईमुळे कोचिंग क्लासेस संचालकांना अखेर जाग

सकाळ वृत्तसेवा

अकोला : विद्यार्थी घडविण्याचे व्रत घेतल्याचे सांगत त्याच विद्यार्थ्यांची सुरक्षा वाऱ्यावर सोडणाऱ्या कोचिंग क्लासेस संचालकांवर अग्निशमन विभागाने कडक कारवाईचा बडगा उगारला. अग्नी सुरक्षा नसलेले कोचिंग क्लासेस सील करण्याची कारवाई सुरू होताच झोपेचे सोंग घेतलेल्या कोचिंग क्लासेस संचालकांना जाग आली आहे. कारवाईचा धसका घेत शहरातील २७ कोचिंग क्लासेस संचालकांनी अग्नी सुरक्षा यंत्रणा उभी केली असल्याचा अनुपालन अहवाल सादर करून 'वरातीमागून घोडे' हाकणे सुरू झाले आहे.

सुरत येथील कोचिंग क्लासला लागलेल्या आगीच्या प्रकरणानंतर महापालिकेच्या अग्निशमन विभागाने शहरातील कोचिंग क्लासमधील अग्निशमन यंत्रणा बसविण्याचा विषय गांभिर्याने घेत दहा जूनपासून कठोर कारवाई सुरू केली आहे. यामध्ये कोचिंग क्लासेसच्या इमारती सील केल्या जात असल्याने भीतीपोटी कोचिंग क्लासेस संचालकांची पळापळ होत असल्याचे चित्र दिसून येत आहे. शहरातील अनेक कोचिंग क्लासेस निव्वळ कमाईच्या मागे लागले असून, या क्लासेसनी विद्यार्थी सुरक्षा वाऱ्यावर सोडली आहे.

महापालिकेच्या अग्निशमन विभागाने या क्लासेसची झाडाझडती घेऊन संचालकांना सुरक्षेचे पुरेशे उपाय करण्याच्या सूचना दिल्या होत्या. सूचनेचे पालन न करणाऱ्या कोचिंग क्लासेसच्या इमारती सील करण्यास सुरूवात झाली. याची धास्ती घेऊन ५१ कोचिंग क्लासेसपैकी शुक्रवारपर्यंत २७ कोचिंग क्लासेसच्या संचालकांनी अग्निशमन विभागाकडे अनुपालन अहवाल सादर करून सुरक्षेच्या उपाययोजना सुरू करण्यात आल्याची माहिती दिली. सूचना देऊनही उपाय योजना न करणाऱ्या सरस्वती कोचिंग क्लास आणि युनिक कोचिंग क्लासेस सील करण्यात आल्याची माहिती अग्निशमन विभागाने दिली आहे.

अशी आहे सध्याची स्थिती
शहरातील ५१ कोचिंग क्लासेसपैकी २७ कोचिंग क्लासेसच्या संचालकांनी अग्निशमन विभागाकडे अनुपालन अहवाल सादर करून सुरक्षा उपाययोजनांचे काम सुरू केले आहे. तर १३ वसतिगृहांपैकी पाच वसतिगृह संचालकांनी अनुपालन अहवाल दिला असून, अद्यापही आठ वसतिगृहांमध्ये सुरक्षेच्या उपाय योजना करण्यात आल्या नसल्याची माहिती मिळाली आहे. 

अल्टीमेटमनंतर करण्यात आलेल्या कारवाईचे फलित दिसून येत आहे. २७ संस्थांनी काम सुरू केले असून, उर्वरित कोचिंग क्लासेसवर कारवाई सुरूच राहणार आहे. 
- रमेश ठाकरे, अग्निशमन अधिकारी, अकोला

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Sunetra Pawar: बारामतीत सुनेत्रा पवारांची उमेदवारी भाजपच्या दबावातून दिली का? अजित पवारांनी स्पष्टच सांगितलं

Rahul Gandhi Pune Sabha : ''मोदी आता ओबीसी असल्याचं सांगत नाहीत...'' राहुल गांधींनी पुण्याच्या सभेत सांगितलं कारण

MI vs KKR Live IPL 2024 : अय्यरची 70 धावांची खेळी, मुंबईसमोर विजयासाठी 170 धावांच आव्हान

SSC-HSC Result 2024 : सीबीएसईचा दहावी-बारावीचा निकाल २० मे नंतर होणार जाहीर

West Indies T20 WC 24 Squad : विंडीजच्या संघात सगळे स्टार मात्र इन फॉर्म जादूगारच मिसिंग

SCROLL FOR NEXT