file photo
file photo 
विदर्भ

"एमबीए'ची दुसरी प्रवेश फेरी थांबविली

सकाळ वृत्तसेवा

नागपूर : "एमबीए'च्या गुणवत्ता यादीतील घोळ निदर्शनास येताच, सीईटी सेलद्वारे तीन दिवसानंतर प्रवेश प्रक्रियेतील दुसऱ्या फेरी थांबविण्यात आली आहे. 24 जुलै पासूनच विद्यार्थ्यांना प्रवेशाचे ऑप्शन भरता येत नसल्याची तक्रार समोर आली होती. आता अधिकृतरित्या ही प्रक्रिया थांबविण्यात आली असून ती नेमकी केव्हा सुरू होणार याबाबत अनिश्‍चितता आहे.
एमबीए प्रवेशासाठी विद्यार्थ्यांना प्रवेशपूर्व परीक्षा उत्तीर्ण करणे गरजेचे असते. महाराष्ट्र स्टेट कॉमन एंट्रेंस टेस्ट (एमएचसीईटी), एम्स टेस्ट फॉर मॅनेजमेंट एडमिशन्स (एटमा), मॅनेजमेंट एप्टिट्यूड टेस्ट ( मॅट), कॉमन मॅनेजमेंट एडमिशन टेस्ट (सी-मॅट) सारख्या कॉमन एन्टरन्स टेस्टमधील गुणांच्या आधारावर विद्यार्थ्यांना प्रवेश देण्यात येतो. नोंदणीदरम्यान विद्यार्थ्यांच्या सर्व कागदपत्रांची तपासणी करण्यात येते. नोंदणीनंतर गुणवत्ता यादी तयार करण्यात येते. प्रथम तात्पुरती तर त्यानंतर अंतिम गुणवत्ता यादी प्रकाशित करण्यात येते. मात्र, अंतिम गुणवत्ता यादीत काही विद्यार्थ्यांचे गुण वाढविण्यात आले. याच आधारावर त्यांचा महाविद्यालयात प्रवेश करण्यात आल्याचे निदर्शनास आले. विशेष म्हणजे चार वर्षांत 99.99 परर्सेंटाईल गुण आजपर्यंत मिळाले नसताना, या विद्यार्थ्यांना गुणवत्ता यादीत 99.99 परर्सेंटाईल मिळालेच कसे हा प्रश्‍न समोर आला. प्रकरण लक्षात येताच सीईटी सेलचे अध्यक्ष आनंद रायते यांना मिळालेल्या तक्रारीच्या आधारावर त्यांनी 134 विद्यार्थ्यांना कारणे दाखवा नोटीस बजाविली. या 134 विद्यार्थ्यांची चौकशी सुरू असून ती चौकशी पूर्ण झाल्यावर त्यातील दोषी विद्यार्थ्यांसह प्रवेश देणाऱ्यासह महाविद्यालयांवर फौजदारी कारवाई करण्यात येणार आहे. त्यामुळे ती कारवाई होतपर्यंत प्रवेश प्रक्रिया बंद ठेवण्यात येणार आहे. यानंतर नवी यादी तयार करून त्याद्वारे प्रवेश देण्यात येणार असल्याचे सहसंचालक डॉ. महाजन यांनी सांगितले.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

पुन्हा ना'पाक' कृत्य! जम्मू-काश्मीरमध्ये हवाई दलाच्या ताफ्यावर दहशतवाद्यांचा हल्ला

IPL 2024 RCB vs GT Live Score: शुभमन गिलही स्वस्तात बाद! गुजरातच्या दोन्ही सलामीवीरांना सिराजने धाडले माघारी

Congress : ''चार जूननंतर काँग्रेसमध्ये मोठा भूकंप! एक काँग्रेस राहुल गांधींची तर दुसरी...'' प्रमोद कृष्णम् यांचा दावा

MPSC : मुख्य परीक्षा होऊन चार महिने झाले तरी निकाल लागेना; गट क संवर्गातील ७ हजार ५१० उमेदवारांचे भवितव्य टांगणीला

Viral Video: 'माझ्या आयुष्यातून निघून जा'; मेट्रोमध्येच भिडलं जोडपं, एकमेकांना मारल्या चापटा

SCROLL FOR NEXT