selling of rice crops are stopped due to lack of sacks  
विदर्भ

बारदाणा नसल्यामुळे धान खरेदी केंद्र बंद; शेतकरी गेल्या ८ दिवसांपासून बघताहेत वाट  

दीपक फुलबांधे

भंडारा : मोठ्या थाटात पवनी तालुक्यात आधारभूत धान खरेदी केंद्र सुरू करण्यात आले परंतु मागील आठ दिवसापासून  धान मोजण्यासाठी लागणारा बारदाणा नसल्यामुळे खरेदी केंद्रावर खरेदी बंद असल्याचे दिसून येत आहे.
                                      
जिल्ह्यात आधारभूत धान खरेदी केंद्रांची संख्या धानाच्या उत्पादनाच्या मानाने कमीच आहे त्यातही पवनी तालुक्यात गोदामांच्या कमतरतेमुळे धान खरेदी केंद्र बोटावर मोजण्या सारखीच आहे. खरीप हंगामाची सुरुवात 1 ऑक्टोबरमध्ये झाली त्यामुळे केंद्र लवकर सुरू होतील अशी आशा शेतकऱ्यांना होती.  मात्र खरेदी केंद्राची सुरुवात 3 नोव्हेंबरला झाली पण प्रत्येक्ष धान खरेदीची सुरुवात 9 नोव्हेंबरमध्ये करण्यात आली.

प्रत्येक केंद्रावर सुमारे चार हजार शेतकऱ्यांनी धान मोजण्यासाठी नोंद केली असल्याचे दिसून येत आहे. दोन आठवडे चाललेल्या खरेदी केंद्रावर आतापर्यंत साठ ते सत्तर शेतकऱ्यांच्या धानाची मोजणी झाली आहे. बाकी शेतकऱ्यांना आपला नंबर केव्हा येईल याचीच वाट पाहत राहावी लागत आहे. खरेदी केंद्रावर चक्कर मारून परत फिरण्याशिवाई शेतकऱ्यांना उपाय नाही त्यामुळे शेतकऱ्यांच्या संकटाचे प्रमाण कमी होतान्हा दिसून येत नाही.
 
पवनी तालुका धान उत्पादनात अग्रेसर असणारा तालुका आहे परंतु त्या मानाने खरेदी  केंद्र खूप कमी असल्यामुळे खरेदी केंद्रावर ताण येत आहे नवीन संस्थांनी धान खरेदीची परवानगी मागितली असता बँक ग्यारंटी चे कारण समोर करून नाकारण्यात आली जुन्या सुरू असणाऱ्या सस्थाना जिल्यातील कुठल्याही तालुक्यात खरेदी करण्याची परवानगी देण्यात आली असती तर हा एक प्रभावी मार्ग निघाला असता 

आजची परिस्थिती पाहता असे दिसून येते की आठ दिवसापासून खरेदी केंद्रावर बारदाना नाही त्यामुळे पवनी खरेदी विक्रीची वाही, चकारा,कोंढा, आसगाव,पवनी ही केंद्रे बंदच आहेत त्यामुळे शेतकऱ्यांच्या संकटान्हा पारावार दिसत नाही लवकरात लवकर बारदाना उपलब्ध व्हाव्हा अशी शेतकऱ्यांची मागणी आहे तसेच दुसऱ्या तालुक्यातील चांगल्या संस्थाना बाहेरील तालुक्यात खरेदी केंद्र सुरू करण्याची परवानगी मिळाली तर योग्य मार्ग यावर निघू शकतो.

संपादन - अथर्व महांकाळ 

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Epstein files ओपन! सेक्स स्कँडलचे धक्कादायक 68 नवीन फोटो प्रसिद्ध... बिल गेट्ससह दिग्गज नेत्यांचे फोटो, जग हादरलं!

Ashes Test: ॲशेस कसोटीत ‘डीआरएस’वर शंका; ऑस्ट्रेलियाचे वर्चस्व, कॅरीनंतर स्मिथच्या निर्णयावरही प्रश्‍नचिन्ह

Pimpri News : इंद्रायणी, पवना प्रदूषणमुक्तीसाठी आराखडा; सरपंच, उपसरपंच, अभियंते, अधिकाऱ्यांसमोर सादरीकरण

Viral Video: लेकीच्या जन्माचा जल्लोष! धुरंधरमधील 'FA9LA' गाण्यावर वडिलांचा भन्नाट डान्स, यामी गौतमने शेअर केली पोस्ट

Kolhapur City Crisis : २८० टन कचरा दररोज, पण प्रक्रिया अपुरीच; झूम प्रकल्पातील कचऱ्याचे डोंगर शहरासाठी धोक्याचे

SCROLL FOR NEXT