file photo 
विदर्भ

कोरोनाने बिघडविले विद्यार्थ्यांचे गणित...‘शिक्षक विद्यार्थ्यांच्या दारी’ उपक्रम झाला बंद

मुनेश्‍वर कुकडे

गोंदिया  : ऑनलाइन शिक्षणापासून वंचित राहणाऱ्या ग्रामीण भागांतील विद्यार्थ्यांसाठी गृहमालाअंतर्गत ‘शिक्षक विद्यार्थ्यांच्या दारी’ हा उपक्रम जिल्हा परिषदेच्या शिक्षण विभागाने गत महिन्यात सुरू केला होता. विद्यार्थ्यांनी या उपक्रमाला उत्स्फूर्त प्रतिसाद दिला. शिवाय पालकांनीही कौतुक केले. मात्र, जिल्ह्यात कोरोना विषाणूचा वाढता उद्रेक पाहता, शिक्षण विभागाने अल्पावधीत हा उपक्रम आता गुंडाळला आहे.

कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी उपाययोजनेचा एक भाग म्हणून अनलॉकनंतरही शाळा, महाविद्यालये बंद ठेवण्यात आली आहेत. तसे शासनस्तरावरून आदेश देण्यात आले आहेत. दरम्यान, विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान होऊ नये म्हणून काही महिन्यांपूर्वी दीक्षा ऍप, टिलीमिली यासह अन्य माध्यमातून विद्यार्थ्यांकरिता ऑनलाइन शिक्षण सुरू करण्यात आले आहे.

विद्यार्थ्यांना ऑनलाइन शिक्षण

परंतु, कुण्या विद्यार्थ्यांच्या पालकांकडे ॲण्ड्राइड मोबाईल फोन नाही, तर कुणाला नेटवर्कच्या समस्येला सामोरे जावे लागत आहे. त्यामुळे सर्वच विद्यार्थ्यांना ऑनलाइन शिक्षण देणे कठीण झाले होते. यावर उपाय म्हणून जिल्हा परिषदेचे माध्यमिक शिक्षणाधिकारी प्रफुल्ल कचवे यांनी १३ ऑगस्ट रोजी पत्र काढून गृहमालाअंतर्गत ‘शिक्षक विद्यार्थ्यांच्या दारी’ हा उपक्रम राबविण्याच्या सूचना मुख्याध्यापकांना दिल्या होत्या.

गरीब विद्यार्थ्यांच्या आशेवर पाणी

शिक्षणाधिकाऱ्यांच्या या सूचनेनुसार, शिक्षक गावागावांत जाऊन विद्यार्थ्यांच्या घरी, मोहल्ला, सभागृह किंवा समाज मंदिरात चार ते पाच विद्यार्थ्यांना विद्यादान करीत होते. हे करताना सोशल डिस्टन्सिंगचे पालन, मास्क, सॅनिटायझरचा उपयोग कसोशीने केला जात होता.
नेटवर्कची समस्या असलेल्या गावांतील विद्यार्थ्यांकरिता तसेच आर्थिक परिस्थिती हलाखीची असलेल्या पालकांच्या पाल्यांकरिता हा उपक्रम प्रेरणादायी ठरत होता.

कोरोनाचा धोका टळावा म्हणून घेतला निर्णय

शिक्षक आपल्या घरीच येत असल्याने विद्यार्थीदेखील उत्स्फूर्त प्रतिसाद देत होते. पाल्याचे शिक्षण सुरूच आहे, हा भाव पालकांच्या चेहऱ्यावर स्पष्ट दिसून येत होता. मात्र, कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव जिल्ह्यात सातत्याने वाढत असल्याने अल्पावधीत आता हा उपक्रम शिक्षण विभागाने गुंडाळला आहे. विद्यार्थ्यांना किंबहुना शिक्षकांनाही कोरोनाचा धोका होऊ नये म्हणून हे पाऊल शिक्षण विभागाने उचलले आहे. त्यामुळे विद्यार्थ्यांसह त्यांच्या पालकांच्या चेहऱ्यावरचा आनंद क्षणिकच राहिला, असेच म्हणावे लागेल.


परिस्थिती पूर्वपदावर येईपर्यंत उपक्रम स्थगित
गोंदिया जिल्ह्यात कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव झपाट्याने वाढत आहे. त्यामुळे विद्यार्थी व शिक्षकदेखील सुरक्षित राहावे. संसर्गाचा धोका टळावा, याकरिता परिस्थिती पूर्वपदावर येईपर्यंत हा उपक्रम स्थगित करण्यात आला आहे.
- श्री. हिवारे, शिक्षणाधिकारी (प्राथमिक) जिल्हा परिषद, गोंदिया.

(संपादन : दुलिराम रहांगडाले)

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Team India Selection : रिषभ पंतला वन डे संघात स्थान नाही, पण मिळाले कर्णधारपद; Asian Games साठीच्या संघातही दोन बदल, भन्नाट टीम्स

MPSC Paper Leak : एमपीएससी अध्यक्षांच्या राजीनाम्याची मागणी; अभिजीत दिपकेंचं उमेदवारांना आंदोलनाचं आवाहन

Umarga News : उमरगा सामाजिक वनीकरण विभागात भ्रष्टाचाराचा आरोप; कारवाईत दिरंगाईमुळे युवासेनेकडून वनरक्षकावर शाईफेक

India Squad for WI Series: हार्दिक पांड्या संघाबाहेरच, जसप्रीत बुमराहचेही नाव गायब; ऋतुराज गायकवाडची वापसी, तर एक सप्राईज पॅकेज, जाणून घ्या भन्नाट टीम इंडिया

Censor Board: केंद्राकडून सेन्सॉर बोर्डाची फेररचना! १८ सदस्यांची निवड; निशिगंधा वाड, वामन केंद्रे, मनोज जोशींचा समावेश

SCROLL FOR NEXT