Shivkumar remanded in police custody till Monday Deepali Chavan suicide case Amravati district
Shivkumar remanded in police custody till Monday Deepali Chavan suicide case Amravati district 
विदर्भ

दीपाली चव्हाण आत्महत्याप्रकरण : शिवकुमारला सोमवारपर्यंत पोलिस कोठडी

सकाळ वृत्तसेवा

धारणी (जि. अमरावती) : मेळघाट व्याघ्रप्रकल्पाच्या हरिसाल वनपरिक्षेत्र अधिकारी दीपाली चव्हाण यांच्या आत्महत्येप्रकरणी उपवनसंरक्षक विनोद शिवकुमारला स्थानिक न्यायालयाने सोमवारपर्यंत (ता. २९) पोलिस कोठडीत ठेवण्याचे आदेश दिले आहे. पोलिसांनी तपासासाठी ३० मार्चपर्यंत पोलिस कोठडीची विनंती न्यायालयाकडे केली. बचाव पक्षाच्या वकिलांनी त्यावर युक्तिवाद केला. दोन्ही बाजू ऐकून घेतल्यावर न्यायालयाने २९ मार्चपर्यंत शिवकुमारला पोलिस कोठडीत ठेवण्याचे आदेश दिले.

दीपाली चव्हाण यांनी गुरुवारी (ता. २५) सायंकाळी हरिसाल येथे शासकीय निवासस्थानी स्वत:च्या सर्व्हिस रिव्हॉल्व्हरमधून गोळी झाडून आत्महत्या केली होती. आत्महत्येपूर्वी दिपाली यांनी लिहिलेल्या चार पानांच्या चिठ्ठीत उपवनसंरक्षक शिवकुमार यांच्या त्रासाचा उल्लेख केला होता. शुक्रवारी पोलिसांनी शिवकुमारला अटक केली व शनिवारी (ता. २७) धारणीच्या न्यायालयात हजर केले होते. यावेळी नागरिकांनी पोलिस ठाणे तसेच न्यायालयाच्या बाहेर चांगलीच गर्दी केली होती.

पोलिसांनी तपासासाठी ३० मार्चपर्यंत पोलिस कोठडीची विनंती न्यायालयाकडे केली. बचाव पक्षाच्या वकिलांनी त्यावर युक्तिवाद केला. दोन्ही बाजू ऐकून घेतल्यावर न्यायालयाने २९ मार्चपर्यंत शिवकुमारला पोलिस कोठडीत ठेवण्याचे आदेश दिले. पुराव्यासाठी लॅपटॉप, मोबाईल, कागदपत्रे जमा करण्याच्या प्रक्रियेने आता वेग घेतला आहे. दीपाली चव्हाण यांनी आत्महत्येपूर्वी लिहिलेल्या चिठ्ठीत काही लोकं शिवकुमारचे कान भरत होते, असे नमूद केल्याने ते कोण आहेत? याचा शोधसुद्धा घेतला जाईल. अशा लोकांवर कारवाई झाली पाहिजे, अशी मागणी जमलेल्या नागरिकांनी केली.

गुन्हा दाखल झाला नसून, चौकशी सुरू
या प्रकरणात व्याघ्रप्रकल्पाचे तत्कालीन क्षेत्रसंचालक एम. एस. रेड्डी यांच्याविरुद्ध अद्याप गुन्हा दाखल झाला नसून, चौकशी सुरू आहे.
- विलास कुलकर्णी,
पोलिस निरीक्षक, धारणी ठाणे

नागपुरातून झाली होती अटक

मेळघाट व्याघ्रप्रकतील हरिसाल येथील वनपरिक्षेत्र अधिकारी दीपाली चव्हाण यांच्या आत्महत्या प्रकरणातील मुख्य आरोपी उपवनसंरक्षक विनोद शिवकुमार याला शुक्रवारी सकाळी नागपूर रेल्वे स्थानकावरून अटक करण्यात आली होती. तो कर्नाटकातील मूळगावी पळून जाण्याच्या प्रयत्नात होता. नागपूर लोहमार्ग पोलिस व अमरावती ग्रामीण पोलिसांनी संयुक्त ही कारवाई केली. यानंतर शिवकुमारला निलंबित करण्यात आले.

साध्या वेषातील पोलिसांनी केली अटक

आरोपी विनोद शिवकुमार कर्नाटकातील मूळगावी पळून जाण्याची शक्यता असल्याने पोलिसांनी संभाव्य ठिकाणांवर लक्ष केंद्रित केले होते. रात्रीच नागपूर लोहमार्ग पोलिसांना आरोपीच्या छायाचित्रासह माहिती कळविण्यात आली होती. त्या पाठोपाठ अमरावती पोलिसांचे पथकही दाखल झाले होते. सापळा रचून आरोपीचा शोध सुरू करण्यात आला होता. शुक्रवारी सकाळी ९.१५ वाजताच्या सुमारास पोलिस पाळतीवर असताना आरोपी नागपूर रेल्वेस्थानकावर आढळून आला. लागलीच साध्या वेषातील पोलिसांनी झडप घालून त्याला अटक केली. तो दिल्ली-बेंगळुरू राजधानी एक्स्प्रेसने पळून जाण्याच्या तयारीत असल्याचे चौकशीत पुढे आले.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Navneet Rana: "काँग्रेसला मत देणं म्हणजे थेट पाकिस्तानला मत देणं"; नवनीत राणांचं वादग्रस्त विधान

IPL 2024 DC vs RR Live Score: अक्षर पटेलने राजस्थानला दिला दुसरा धक्का! दोन्ही सलामीवीर परतले माघारी

यवतमाळ जिल्हा कारागृहातील धक्कादायक घटना; कारागृहातील अधिकारी, कर्मचाऱ्यावर कैद्यांच्या टोळीचा हल्ला

Rohit Pawar: रोहित पवारांनी शेअर केलेल्या 'त्या' व्हिडिओनंतर PDCC बँकेच्या मॅनेजरसह बँकेवर गुन्हा दाखल

Latest Marathi News Update : दिवसभरात देश-विदेशात काय घडलं? जाणून घ्या एका क्लीकवर

SCROLL FOR NEXT