Devendra-Fadnavis
Devendra-Fadnavis 
विदर्भ

शिवसेनेचे प्रेम छुपे आमचे उघड - देवेंद्र फडणवीस

सकाळवृत्तसेवा

नागपूर - शिवसेनेचे प्रेम छुपे आहे तर आमचे उघड आहे. कुणी कितीही नाकारले तरी भाजप आणि शिवसेनेची युती होणारच, असा ठाम विश्‍वास मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी रामगिरी येथे पत्रकारांशी बोलताना व्यक्त केला. दसरा मेळाव्यात उद्धव ठाकरे यांनी आपल्या भाषणातून युतीचे संकेतही दिले असल्याचे मुख्यमंत्र्यांनी सांगितले. 

शिवसेना सातत्याने पंतप्रधान नरेंद्र मोदी तसेच राज्य सरकारच्या कारभारावर सत्तेत राहूनही टीका करीत आहे. शिवसेनेचे नेते उद्धव ठाकरे ज्या पद्धतीने सामना तसेच जाहीर सभांमधून भाजपला ठोकून काढत आहेत, त्यामुळे युती होणार की नाही याविषयी राजकीय वर्तुळात चर्चा आहेत. काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसची आघाडी होण्याचे जवळपास निश्‍चित झाले आहे. तशी घोषणाही दोन्ही काँग्रेसच्या नेत्यांनी केली. या पार्श्‍वभूमीवर मुख्यमंत्र्यांना विचारणा केली असता त्यांनी युती होणारच असे सांगितले. 

सेनेकडून अद्याप यावर कोणतीही अधिकृत भूमिका घेण्यात आली नाही. भाजपच शत्रू असल्याचे ते सांगत आहेत. भाजपने दिलेले आश्‍वासन खोटे असल्याचीही टीका जाहीरपणे केली जात आहे. याकडे लक्ष वेधले असता मुख्यमंत्र्यांनी त्यांची भूमिका आम्ही समकारात्मक घेत असल्याचे सांगितले. भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष अमित शहा यांनी मुंबईत उद्धव ठाकरे यांची भेट घेतली. दसरा मेळाव्यातील सेना प्रमुखांचे भाषण युती होण्याचे संकेत देणारे आहे. युतीबाबतचे आमचे प्रेम उघड आहे. त्यांचे प्रेम लपून आहे. दोन्ही समविचारी पक्ष असल्याने युती होणार आहे.  सेनेकडून अद्याप यावर कोणतीही अधिकृत भूमिका घेण्यात आली नाही. त्यामुळे त्यांच्या भूमिकेकडे सर्वांच्या नजरा आहेत.

एमआयएमशी संबंधच नाही
आंबेडकर आणि एमआयएमच्या प्रश्‍नावर मुख्यमंत्री फडणवीस म्हणाले की, काँग्रेस, राष्ट्रवादीशी आघाडी न झाल्यास त्याचा भाजपला फायदा होण्याचा आरोप करण्यात येतो. प्रकाश आंबेडकरांनी भाजपशी कधीच युती केली नाही. ते करणारही नाही. आणि एमआयएमशी युती करण्याचा संबंधच येत नाही, असे त्यांनी स्पष्ट केले.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Amit Shah Fake Video Case : झारखंड काँग्रेसचं एक्स अकाऊंट सस्पेंड; अमित शाह व्हिडीओ प्रकरणात मोठी कारवाई

Google Error : गुगल डाऊन! जगभरातील युजर्स त्रस्त; अमेरिकेतून 1400 तक्रारी

Yogi Adityanath : काँग्रेस सत्तेत आल्यास हिंदूंची विभागणी होईल - योगी आदित्यनाथ

IPL 2024, CSK vs PBKS: चेन्नईला पंजाबच्या गोलंदाजांनी रोखलं अन् फलंदाजांनी ठोकलं; ऋतुराजसेनेचा बालेकिल्ल्यात दुसरा पराभव

Loksabha election 2024 : जेडीयूचे माजी प्रदेशाध्यक्ष शशांक राव यांचा भाजपात प्रवेश; उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची उपस्थिती

SCROLL FOR NEXT