नागपूर : नेहमी गजबजलेला परिसर म्हणजे सीताबर्डी मेन रोडवर अतिक्रमण वाढले होते. आज शुक्रवारी दुपारी सीताबर्डी वाहतूक परिमंडळ आणि महानगरपालिकेच्या अतिक्रमण विभागाच्या पथकाने संयुक्तरीत्या रस्त्यावर अतिक्रमण करणाऱ्या 30 ते 35 हॉकर्सवर कारवाई करीत परिसर अतिक्रमणमुक्त केला.
सीताबर्डी मार्केट परिसरात खरेदीसाठी नेहमी गर्दी असते. या मार्गावर विविध प्रकारचे व्यवसाय करणारे हॉकर्स आपल्या मालाच्या विक्रीसाठी रस्त्यावर तसेच पादचारी मार्गावर दुकाने थाटतात. त्यामुळे पादचाऱ्यांना या रस्त्यावरून चालणे अवघड होत होते. सीताबर्डी मेन रोड व्यापारी संघटनेच्या वतीने येथील हॉकर्सना इतर ठिकाणी हलविण्यासाठी उच्च न्यायालयात जनहित याचिका दाखल केली आहे. न्यायालयाने मार्गाच्या दोन्ही बाजूंनी योग्य अंतरावर पट्टे आखून व्यवसाय करण्याची मुभा महानगरपालिका यांना आदेशित केल्याप्रमाणे मनपाकडून कार्यवाही करण्यात आली. पोलिस आयुक्त डॉ. भूषणकुमार उपाध्याय यांच्या आदेशाने तसेच सीताबर्डी वाहतूक परिमंडळाचे वरिष्ठ पोलिस निरीक्षक जयेश भांडारकर यांच्या नेतृत्वात व मनपाच्या अतिक्रमण विभागाच्या पथकाने आज, शुक्रवारी अतिक्रमण कारवाई करण्यात आली. यात नियमबाह्य व्यवसाय करणारे 30 ते 35 अवैध हॉकर्स हातठेले यांच्यावर कारवाई करण्यात आली.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.