विदर्भ

सीताराम येचुरी येणारच

सकाळवृत्तसेवा

आज आंबेडकर महाविद्यालयात व्याख्यान

नागपूर - विद्यापीठाने नकार दिला असला तरी भारतीय कम्युनिस्ट पक्षाचे सरचिटणीस व खासदार सीताराम येचुरी उद्या शनिवारी (ता. १८) नागपूरमध्ये येणार आहेत. दीक्षाभूमी परिसरातील डॉ. बाबासाहेब आंबेडकर महाविद्यालयाने पुढाकार घेऊन त्यांचे व्याख्यान महाविद्यालयाच्या सभागृहात सायंकाळी पाच वाजता आयोजित केले आहे.

राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. सिद्धार्थविनायक काणे यांनी दीक्षान्त सभागृहातील खासदार सीताराम येचुरी यांचे व्याख्यान रद्द केल्याने वाद निर्माण झाला. आंबेडकरवादी व पुरोगामी विचारांच्या अनेकांनी कुलगुरू डॉ. काणे यांची भेट घेऊन निवेदन दिले. परंतु, कायदा व सुव्यवस्थेचे कारण देऊन येचुरींचे भाषण रद्द केल्याचे कुलगुरूंनी स्पष्ट केले. डॉ. बाबासाहेब आंबेडकर अध्यासनाने खासदार येचुरी यांचे ‘लोकशाहीचा ऱ्हास : आव्हाने व उपाय’ या विषयांवर दोन दिवसांचे व्याख्यान आयोजित केले होते. परंतु, गेल्या बुधवारी अचानकपणे कुलगुरूंनी डॉ. आंबेडकर अध्यासनाच्या प्रमुखांना पत्र पाठवून येचुरींचे व्याख्यान अनिश्‍चित काळासाठी रद्द केल्याचे कळविले. कुलगुरूंच्या या निर्णयाने खळबळ उडाली. 

आता येचुरींचे व्याख्यान होणार नाही, असे वाटत असताना डॉ. बाबासाहेब आंबेडकर महाविद्यालयाने पुढाकार घेत त्याच विषयावर खासदार येचुरी यांचे व्याख्यान आयोजित केले आहे. महाविद्यालयाच्या अर्थशास्त्र, इतिहास व राज्यशास्त्र विभागांच्या वतीने हे व्याख्यान आयोजित केल्याचे डॉ. आंबेडकर महाविद्यालयाचे इतिहास विभागप्रमुख डॉ. अविनाश फुलझेले यांनी कळविले आहे.

व्याख्यान पूर्वनियोजितच
राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठाने खासदार सीताराम येचुरी यांचे व्याख्यान रद्द केल्यामुळे डॉ. बाबासाहेब आंबेडकर महाविद्यालयात आयोजित केले जात नाही. आंबेडकर महाविद्यालयात खासदार येचुरी यांचे व्याख्यान १८ मार्चला सकाळी पूर्वनियोजित होते. नागपूर विद्यापीठाने दीक्षान्त सभागृहातील त्यांचे व्याख्यान रद्द केल्याने सर्वांच्या सोयीसाठी व्याख्यानाची वेळ सायंकाळी करण्यात आली आहे. व्याख्यानाचा विषय हा खासदार येचुरी यांनीच ठरविला आहे.
- प्रा. गौतम कांबळे, सहयोगी प्राध्यापक, अर्थशास्त्र विभाग, डॉ. आंबेडकर महाविद्यालय

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Solapur Lok Sabha Ground Report: राम सातपुतेंना धक्का बसणार की प्रणिती शिंदेंना? वंचित गेम चेंजर ठरणार...ग्राऊंड रिपोर्ट वाचा...

जे कुटुंबाला सांभाळू शकत नाहीत ते महाराष्ट्राला काय सांभाळणार?; PM मोदींची पवारांवर कडवट टीका

Gurucharan Singh : गुरुचरण सिंहने रचलाय बेपत्ता असल्याचा कट ? ; पोलिसांनी व्यक्त केला संशय

Suryakumar Yadav: भारताचा 'मिस्टर 360' सूर्यानं 'बेबी एबी'ला शिकवला कसा खेळायचा सुपला शॉट, पाहा Video

Latest Marathi News Live Update : "चित्रा वाघ यांनी माझी माफी मागावी," अनभिनेते राज नयानी यांचा इशारा

SCROLL FOR NEXT