corona 
विदर्भ

हॅलो.. मी कोरोना बोलतोय; अमरावतीत आणखी सहा जणांना घेरलयं, तुम्ही घरातच थांबा अन्यथा...

सकाळवृत्तसेवा

अमरावती : स्थानिक पाटीपुरा व तारखेडा येथील अनुक्रमे ९५, ४० वर्षीय मृत महिला, हैदरपुरा येथील कोरोनाबाधित मृत ६० वर्षीय महिलेचा २० वर्षीय नातू तसेच कमेला ग्राउंड येथील मृत ७० वर्षीय महिलेच्या कुटुंबातील तीन महिला, असे एकूण सहा जण कोरोना पॉझिटिव्ह आढळले आहेत. यासोबतच शहरातील कोरोनाबाधितांची संख्या १४ झाली आहे. त्यात पाच मृत तसेच चार बरे झालेल्यांचा समावेश आहे.

स्थानिक पाटीपुरा येथील ९५ वर्षीय महिलेचा बुधवारी (ता.२२) मृत्यू झाला. या महिलेचा थ्रोट स्वॅब गुरुवारी (ता.२३) रात्री पॉझिटिव्ह आल्याने कुटुंबातील पाच सदस्यांना क्वारंटाइन करण्यात आले. त्यांच्या घश्यातील स्त्रावाचे नमुने घेण्यात आले आहेत. याशिवाय हैदरपुरा येथील एका ६० वर्षीय महिलेचा सोमवारी (ता.२०) मृत्यू झाला होता. त्या महिलेचा थ्रोट स्वॅब पॉझिटिव्ह आल्याने कुटुंबातील १२ सदस्यांचे नमुने घेण्यात आले होते. त्यापैकी वृद्धेच्या २० वर्षीय नातवाचा नमुना पॉझिटिव्ह आला. हे दोन्ही अहवाल गुरुवारी (ता. २३) रात्री उशिरा प्राप्त झाले. पाटीपुरा येथील वृद्धेच्या कुटुंबातील पाच सदस्यांना संस्थात्मक क्वारंटाइन केले. तर हैदरपुरा येथे २० एप्रिलला मरण पावलेल्या वृद्धेच्या कुटुंबातील १२ सदस्यांना यापूर्वीच क्वारंटाइन करण्यात आले.

पाटीपुरा, तारखेडा येथील मृत व कमेला ग्राउंडच्या तीन महिलांचा समावेश
दरम्यान, शुक्रवारी (ता. २४) दुपारी आणखी चार नमुने पॉझिटिव्ह आले. त्यात तारखेडा येथे बुधवारी (ता. २२) मरण पावलेल्या महिलेसह कमेला ग्राउंड येथील मृत वृद्धेच्या कुटुंबातील तीन महिलांचा समावेश आहे. संबंधित वृद्ध महिला सोमवारी (ता.२०) मरण पावली होती. तिचा नमुना पॉझिटिव्ह आला होता.

तीन अहवाल निगेटिव्ह
गुरुवारी (ता.२३) रात्री ३ अहवाल नागपूर येथून तर २० अकोला येथून प्राप्त झाले. अकोला येथून प्राप्त २० नमुन्यांमध्ये पाटीपुरा आणि हैदरपुरा येथील प्रत्येकी एक अहवाल पॉझिटिव्ह, तर नागपूरचे तीनही अहवाल निगेटिव्ह आले. दरम्यान, शुक्रवारी (ता. २४) प्राप्त चार अहवाल पॉझिटिव्ह आले.

विद्यापीठातील अहवाल मान्यतेसाठी रवाना
संत गाडगेबाबा अमरावती विद्यापीठात उघडण्यात आलेल्या प्रयोगशाळेत काही नमुन्यांची चाचणी करण्यात आली. त्याचे अहवाल नागपूर येथील अखिल भारतीय आयुर्विज्ञान संस्थेकडे (एम्स्) मान्यतेसाठी पाठविले आहेत. एम्सची मान्यता मिळाल्यानंतर नमुने चाचणीला सुरुवात केली जाईल, असे जिल्हाधिकारी शैलेश नवाल यांनी सांगितले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

IND vs ENG, 2nd T20I: रवी बिश्नोईची 'ती' चूक महागात पडली! जेकब बेथलच्या आक्रमणामुळे भारताविरुद्ध इंग्लंडचा ऐतिहासिक विजय

IND vs ENG, 2nd T20I: अक्षर पटेलने इंग्लंडच्या कॅप्टनला आऊट करत घडवला इतिहास; यापूर्वी कोणत्याही भारतीय फिरकीपटूला जमलं नव्हतं!

जळगावमध्ये भीषण अपघात! टोलनाक्यावर उभ्या ट्रकला गॅस टँकरची धडक, बघता क्षणी घेतला पेट, आगीत होरपळून दोघांचा मृत्यू

Latest Marathi Update : राज्यासह देशविदेशात दिवसभरात काय काय घडलं? वाचा एका क्लिकवर...

Raigad Heavy Rain : रायगडला मुसळधार पावसाचा तडाखा; अंबा नदी धोक्यापलीकडे, भेरव पूल पाण्याखाली, पोलादपुरात दरड कोसळल्याने नागरिकांचे स्थलांतर

SCROLL FOR NEXT