file photo
file photo 
विदर्भ

सर्पदंश शेतकरी, शेतमजुरांच्या जिवावर

सूरज पाटील

सर्पदंश शेतकरी, शेतमजुरांच्या जिवावर
यवतमाळ : खरीप हंगाम कॅश करण्यासाठी शेतकरी कामाला लागले आहेत. या कालावधीत शेतशिवार माणसांनी फुलून जाते. पावसाळ्यात शेतशिवारासह घरात सर्प निघण्याचे प्रमाण अधिक आहे. हा काळ सापांसाठी पोषक मानला जातो. बेसावध क्षणीचा सर्पदंश शेतकरी व शेतमजुरांच्या जिवावर बेतते. वर्षाला सरासरी 20 जणांचे मृत्यू होत असून, शेकडो नागरिक बाधित होतात.
साप हा शेतकऱ्यांचा शत्रू नसून मित्र आहे, असे म्हटले जाते. मात्र, आजही समाजात सापाबाबत अनेक गैरसमज आहेत. सर्पदंश झाल्यास तत्काळ रुग्णालयात न जाता. लोक बाधित व्यक्तीला घेऊन वैदूकडे जातात अथवा त्याला घरी बोलावून घेतात. उपचारात अंधश्रद्धेतून निर्माण झालेली बाधा घातक ठरत आहे. शेवटच्या क्षणी रुग्णाला दवाखान्यात नेले जाते. तोपर्यंत सर्वकाही संपलेले असते. साप म्हणजे मरण ही कल्पना लोकांच्या मनात इतकी खोलवर रुजली आहे की, साप म्हणताच अनेकांचे अवसान गळते. सापाविषयी अनेक अंधश्रद्धा प्रचलित आहेत. सापाचे विष मंत्राने किंवा काही प्रकारच्या जडीबुटीने उतरते, या घातक अंधश्रद्धेपायी दरवर्षी नागरिक मृत्युमुखी पडतात. सापाच्या विषावर प्रतिसर्प विष हेच एकमेव औषध आहे. बहुतांश नागरिक धास्तीनेच मरण पावत असल्याचे वैद्यकीय तज्ज्ञ व सर्पमित्र सांगतात. सर्पदंशाबाबत जनजागृती होणे काळाची गरज आहे.

विषारी साप
-नाग
-फुरसे
-परड
-मण्यार

परजिल्ह्यात सर्पमित्रांसाठी साहित्य उपलब्ध करून देण्यात आले आहे. आपल्या जिल्ह्यात कोणत्याही सुविधा नाहीत. सर्पमित्र जिवावर उदार होऊन साप पकडतात. आतापर्यंत तीन सर्पमित्रांना जीव गमवावा लागला आहे. एमएच 29-हेल्पींग हॅण्ड्‌स नेचर ऍडव्हेंचर क्‍लबचे सदस्य जिल्हाभरात आहेत. एका फोनवर ते साप पकडण्यासाठी धावून जातात.
- सूरज खोब्रागडे, सर्पमित्र, यवतमाळ.

प्रथमोपचार आवश्‍यक
डॉक्‍टरांपर्यंत पोहोचेपर्यंत प्रथमोपचार अत्यंत महत्त्वाचा आहे. सर्पदंश झाल्यावर तत्काळ वैद्यकीय मदत मिळणे शक्‍य नसते. प्रथमोपचाराने रुग्णांचे प्राण वाचू शकते. जखम स्वच्छ पाण्याने धुवावी, सर्पदंश झालेल्या व्यक्तीला धीर द्यावा, पायी चालणे, जास्त बोलणे टाळावे, विषारी साप हाताला चावला असेल तर दंडाला दोरीने बांधून आवळून घ्यावे, पायाला चावला असेल तर मांडीला दोरीने बांधून आवळून घ्यावे, दंश झालेल्या जागेवर चिरा मारू नये, त्यामुळे जास्तीचा रक्तस्राव होऊन व्यक्ती दगावण्याची शक्‍यता असते.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Modi Video : नरेंद्र मोदींनी काढली बाळासाहेब ठाकरेंची आठवण; म्हणाले, डीएमकेचे लोक सनातन धर्माला डेंग्यू म्हणत आहेत...

IPL 2024 DC vs MI Live Score : मुकेश कुमारने टीम डेविडचा अडथळा केला दूर; मुंबईचा 6 फलंदाज आऊट

PM Modi Kolhapur Rally: पंतप्रधान मोदींच्या सभेला संभाजी भिडेंची हजेरी; मोदींचं कोल्हापुरकरांना पुन्हा सत्तेत आणण्याचं केलं आवाहन

Tristan Stubbs DC vs MI : 4,4,6,4,4,4 एकाच षटकात होत्याचं नव्हतं झालं! स्टब्सच्या तडाख्यात वूडची शकलं

Latest Marathi News Live Update : पाच वर्षात पाच पंतप्रधान करण्याचा इंडिया आघाडीचा प्लॅन- मोदी

SCROLL FOR NEXT