solar pump.jpg 
विदर्भ

महत्त्वाकांक्षी योजना फसली लालफितशाहीत

चेतन देशमुख

यवतमाळ : विजेचा लपंडाव व वीजबिलाच्या कटकटीतून शेतकऱ्यांची कायमची सुटका व्हावी, या उद्देशाने युती सरकारने अनुदानावर मुख्यमंत्री सौर कृषिपंप योजना अंमलात आणली होती. गेल्या तीन वर्षांत जिल्ह्यात एक लाख जोडणीचे उद्दिष्ट होते. मात्र, आतापर्यंत हा आकडा 160 च्या समोर सरकला नाही. साडेतीन हजार शेतकऱ्यांनी अर्ज केले. सुमारे बाराशे शेतकऱ्यांनी अनामत रक्कम भरली. त्यापैकी 218 सौरपंप जोडणीचेच आदेश मिळाले. एकूणच अत्यंत महत्त्वाकांक्षी योजना लालफितशाहीत फसली.

कृषिपंपास रोहित्रांच्या माध्यमातून लघुदाब वाहिनीद्वारे सध्या वीजपुरवठा केला जातो. मागील काही वर्षांत लघुदाब वाहिन्यांची लांबी वाढली. विद्युतपुरवठ्यात वारंवार बिघाड होऊ लागले. त्यामुळे वीजपुरवठा खंडित होण्याचे प्रमाण वाढले, तांत्रिक वीजहानी होऊ लागली, विद्युत अपघाताचे प्रमाण वाढले, वीजचोरीसारख्या समस्यांमुळे शेतकऱ्यांना वीजपुरवठा करण्यात अडचणी येऊ लागल्या. परिणामी, शेतकरी डिझेल इंजिनचा वापर करून कृषिपंप चालवू लागले. याचा आर्थिक भुर्दंड शेतकऱ्यांवर बसला. या संकटातून शेतकऱ्यांना मुक्त करण्यासाठी पारेषणविरहित सौरपंप अनुदानावर देण्यासाठी मुख्यमंत्री सौर कृषिपंप योजना मोठा गाजावाजा करून सुरू करण्यात आली. जिल्ह्याला तीन वर्षांसाठी एक लाख सौरपंप जोडणीचे उद्दिष्ट देण्यात आले आहे. गेल्या वर्षात 25 हजार सौरपंपाचे उद्दिष्ट महावितरणला देण्यात आले होते. यंदा ते 50 हजार; तर 2021 मध्ये 25 हजार करण्यात आले. कागदावर आकडे मोठे वाटत असले तरी प्रत्यक्षात अनेक अडचणी येत आहेत. 2019 मध्ये महावितरणला सहा हजार 543 शेतकऱ्यांचे अर्ज प्राप्त झाले. यातील तीन हजार 508 अर्जांना मंजुरी देण्यात आली. एक हजार 593 शेतकऱ्यांना मागणी पत्र पाठविण्यात आले. त्यापैकी एक हजार 200 शेतकऱ्यांनी पैसे भरले. महावितरणने 218 जोडण्यास कार्यारंभ आदेश दिले असले तरी प्रत्यक्षात 160 सौरपंपांची जोडणी वर्षभरात झाली. संथगतीने सुरू असलेल्या योजनेमुळे शेतकऱ्यांना आर्थिक भुर्दंड सहन करावा लागत आहे. पैसे भरूनही सौरपंपांची जोडणी मिळत नसल्याने लाभार्थ्यांकडून तीव्र प्रतिक्रिया उमटत आहेत.

महावितरणकडून कामांना गती

वीजजोडणी देण्यासाठी महावितरणकडून गतीने कामे करून घेतली जात आहे. लवकरात लवकर शेतकऱ्यांना जोडणी देण्याचा प्रयत्न असल्याचे महावितरणने स्पष्ट केले आहे.

2019 चा लेखाजोखा

  • उद्दिष्ट : 25हजार
  • प्राप्त अर्ज : 6,543
  • मंजूर : 3,508
  • डिंमाड नोट : 1,593
  • पैसे भरले  : 1200
  • कार्यारंभ आदेश : 218
  • जोडणी : 160
  • प्रगतिपथावर : 18
     

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

VIDEO : उत्तरप्रदेशात मराठी तरुणाला भोजपुरीत बोलण्यासाठी दमदाटी, भाषा येत नाही म्हटल्यावर....पाहा व्हिडीओ

Latest Maharashtra News Live Updates: आषाढी एकादशी निमित्तानं कल्याण इथल्या बिर्ला महाविद्यालयात ज्ञान दिंडी सोहळ्यात उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचा सहभाग

VIRAL VIDEO: दुध विक्रेता चक्क दुधात थुंकला, घटना सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद, व्हिडिओ व्हायरल

Ashadhi Ekadashi : नाशिकच्या विठ्ठल मंदिरांत आषाढीला भक्तीचा झगमगाट

Crime News: हॉर्न वाजविल्याच्या किरकोळ कारणाने दोन गटांत हाणामारी; सूतगिरणी चौकातील घटना

SCROLL FOR NEXT