विदर्भ

पोलिस पदोन्नतीचा प्रश्‍न सोडवा, अन्यथा निवडणुकीवर बहिष्कार 

अनिल कांबळे

नागपूर : पोलिस महासंचालकांच्या अधीनस्थ 2013 मध्ये घेण्यात आलेल्या पोलिस उपनिरीक्षक पदासाठी अर्हता परिक्षेत उत्तीर्ण 12 हजार पोलिस हवालदाराचा पदोन्नतीचा प्रश्‍न ऐरणीवर आहे. उत्तीर्ण हवालदारांच्या पदोन्नतीचा तिढा न सुटल्यास राज्यातील सर्वच पोलिस कर्मचाऱ्यांचे कुटूंबीय आगामी निवडणुकीवर बहिष्कार घालतील, असा आक्रमक पवित्रा महाराष्ट्र राज्य पोलिस बॉईज संघटनेने घेतला आहे. जवळपास एक ते सव्वा कोटी मतदार संख्या असलेल्या पोलिस कुटूंबीयांमुळे राजकीय स्थिती बदलण्याची शक्‍यता वर्तविली जात आहे. 

राज्यातील कायदा व सुव्यवस्था राखण्यासाठी पोलिस अधिकाऱ्यांची निकड असताना केवळ राजकीय नकारात्मक भूमिकेमुळे खात्याअंर्गत पोलिस हवालदारांना पदोन्नती देण्यात येत नाही. राज्यातील उत्तीर्ण तब्बल 12 हजार पोलिस हवालदार पोलिस उपनिरीक्षक पदावर पदोन्नती मिळण्याच्या प्रतीक्षेत आहेत. त्यामुळे राज्य पोलिस दलात खदखद होत असून त्याचा उद्रेक केव्हाही होऊ शकते. 1985 वर्षात नियुक्‍ती झालेले कर्मचारी येत्या काही महिन्यात सेवानिवृत्त होणार आहेत. डीजी कार्यालयातील काही बाबूंच्या खाबूगिरीपणामुळे अनेक हलवादारांवर आपल्या हक्‍कापासून वंचित राहण्याची वेळ आली आहे. जर अर्हता परिक्षेत उत्तीर्ण झालेल्या पोलिस हवालदारांना हक्‍काची पदोन्नती न मिळाल्यास याचे पडसाद येत्या काही महिन्यांत राज्यभर दिसू शकतात. आगामी निवडणुकांना याचा मोठा फटका बसू शकतो. पोलिस महासंचालक दत्ता पडसलगीकर यांनी पदोन्नतीसंदर्भात आश्‍वासन दिले होते. त्यांनी त्याची पूर्तता त्यांनी करावी, अशी मागणी संघटनेच्या माध्यमातून करण्यात येत आहे. 

राज्यातील जवळपास दोन लाख पोलिस कर्मचाऱ्यांचे कुटूंब आणि नातेवाईकांची संख्या जवळपास दीड कोटीपर्यंत आहे. शिस्तीचे खाते असल्यामुळे पोलिस कर्मचारी आंदोलन करू शकत नाहीत. परंतु, आगामी निवडणुकांवर पोलिस कुटूंब बहिष्कार घालून ताकद दाखवून देतील. पोलिस महासंचालक आणि गृहमंत्रालयाने याकडे जातीने लक्ष द्यावे. 
- प्रमोद वाघमारे, संस्थापक अध्यक्ष, पोलिस बॉईज संघटना, उस्मानाबाद. 

डिसेंबर 2017 ला नागपुरातील हिवाळी अधिवेशनात संघटनेने मोर्चा काढला होता. त्यावेळी मुख्यंमत्र्यांनी पदोन्नतीचा प्रश्‍न सोडविण्याचे आश्‍वासन दिले होते. तसेच डीजी पळसलगीकर यांनीही आश्‍वासन दिले होते. मात्र, अद्यापर्यंत हा विषय गांभीर्याने घेतला नाही. त्यामुळे आता कंबर कसून तयारी केली आहे. 
- विश्‍वभूषण देशमुख (अध्यक्ष, पोलिस बॉईज संघटना, अमरावती) 

सोशल मिडियावर मॅसेज व्हायरल 
पोलिस बॉईज संघटनेच्या आवाहनाचा मॅसेज सोशल मिडियावर व्हायरला झाला. मतदानावर बहिष्कार घालून नकारात्मक भूमिका घेणाऱ्या राजकीय नेत्यांना ताकद दाखवावी. अशी विनंती केली आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

IPL 2024 LSG vs KKR Live Score: बिश्नोईने दूर केला तुफानी खेळ करणाऱ्या सुनील नारायणचा अडथळा, कोलकाताने गमावली दुसरी विकेट

Lok Sabha Election 2024 : लोकसभेचा तिसऱ्या टप्प्यातील प्रचार संपला, देशभरातील 94 जागांसाठी 7 मे रोजी मतदान

Ajit Pawar : रोहित पवार झाले भावनिक, अजित पवारांनी केली नक्कल! म्हणाले, असली नौटंकी...

IPL 2024 Point Table : ऋतुराजची चेन्नई टॉप फोरमध्ये दाखल! CSK च्या विजयानं पंजाबलाच नाही तर तब्बल सहा संघांना बसला धक्का

LinkedIn Job Search : नोकरीची चिंता आता सोडा.! लिंक्डइनवर जॉब शोधण्याची ‘ही’ आहे सोपी पद्धत

SCROLL FOR NEXT