file Photo
file Photo 
विदर्भ

रामटेकमध्ये कुणाचा "राजयोग'; आज निकाल

सकाळ वृत्तसेवा

रामटेक (जि.नागपूर) : रामटेक विधानसभा मतदारसंघातून भाजप, कॉंग्रेस, प्रहार जनशक्ती पक्ष, आम आदमी पक्ष, बसपसह शिवसेनेचे बंडखोर व अपक्ष आशीष जयस्वाल, मुकेश पेंदाम, वंचित बहुजन पक्ष असे 9 जण निवडणूक रिंगणात असून कोणाचा "राजयोग' आहे हे उद्या गुरुवारी दुपारपर्यंत स्पष्ट होणार आहे. 
रामटेक विधानसभेसाठी उद्या गुरुवारी सकाळी 8 वाजतापासून मतमोजणी सुरू होईल. मतमोजणीच्या निकालासाठी 9 फेऱ्या होतील. मतमोजणीची तयारी झाली असून प्रशासन सज्ज आहे. रामटेक विधानसभेची सार्वत्रिक निवडणूक 21 ऑक्‍टोबर रोजी पार पडली. रात्री उशिरापर्यंत मतदान पथकांनी आपल्या व्हीव्हीपॅट व ईव्हीएम मशीन मतमोजणी केंद्रात जमा केल्या. त्यानंतर त्रिस्तरीय सुरक्षेत मतमोजणी केंद्र सुरक्षा यंत्रणांनी ताब्यात घेतले. उद्या सकाळी 8 वाजता मतमोजणी सुरू होईल. मतमोजणीसाठी एकूण 20 टेबलची व्यवस्था असून राखीवसह मतमोजणीसाठी 150 कर्मचारी सज्ज झाले आहेत. सर्वप्रथम पोस्टल बॅलेटची मोजणी केली जाईल. त्यानंतर ईव्हीएम मशीन्समधील मतांची मोजणी होईल. एका फेरीत साधारणतः 20 हजार मतांची मोजणी होईल. एकूण मतदान 1 लाख 83 हजार 925 झाले आहे. निवडणूक निर्णय अधिकारी तथा उपविभागीय अधिकारी जोगेंद्र कट्यारे, तीन सहायक निवडणूक निर्णय अधिकारी यांचे मार्गदर्शनात मतमोजणी होत आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Weather Updates: मे महिन्यातही सूर्य आग ओकणार! पावसासंदर्भातही मोठी अपडेट; IMD ने काय सांगितलं?

Google Layoffs : गुगलमधील कर्मचारी कपात सुरूच.. कोअर टीममधून 200 जणांना नारळ! भारत-मेक्सिकोमध्ये देणार संधी

Shyam Rangeela: मेरे प्यारे देशवासियो... मोदींची मिमिक्री करत प्रसिद्ध झालेल्या कॉमेडियनचे वाराणसीतून पंतप्रधानांना आव्हान

CSK vs PBKS : 'सेल्फिश' धोनी! शेवटच्या ओव्हरमधील ड्राम्यानंतर थाला होतोय ट्रोल, Video Viral

Share Market Today: शेअर बाजार उघडताच 'या' शेअर्सवर ठेवा लक्ष; काय आहे तज्ज्ञांचा अंदाज?

SCROLL FOR NEXT