mp navneet rana statement on sachin waze case in amravati 
विदर्भ

मग सोनिया गांधींना अपशब्द बोलणाऱ्यांवर कारवाई होणार का?

सकाळ डिजिटल टीम

अमरावती : मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यावर आक्षेपार्ह वक्तव्य केल्यामुळे केंद्रीय मंत्री व राज्याचे माजी मुख्यमंत्री नारायण राणे यांना मंगळवारी अटक करण्यात आली. यामुळे काल दिवसभर चांगलेच वातावरण तापले होते. यामुळे शिवसेनेचे व भाजपचे कार्यकर्ते एकमेकांच्या समोर आले होते. या सर्व वादावर भाष्य करताना खासदार नवनीत राणा यांनी सरकारलाच प्रश्न विचारला आहे.

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यावर वादग्रस्त वक्तव्य केल्यानंतर केंद्रीय मंत्री नारायण राणे यांना काल अटक करण्यात आली. केवळ बोलल्यामुळे केंद्रीय मंत्र्यांवर अटकेची कारवाई केली जात असेल तर यापूर्वी शिवसेनेच्या नेत्यांनी काँग्रेस अध्यक्ष तसेच काँग्रेसच्या नेत्या सोनिया गांधी यांच्याबद्दल अनेकदा खालच्या स्तरावरून टीका केली आहे. त्या नेत्यांवरही गुन्हे दाखल करून अटक करणार का, असा सवाल अमरावती जिल्ह्याच्या खासदार नवनीत राणा यांनी केला आहे.

नारायण राणे जेवण करीत असताना पोलिस त्यांना अटक करण्यासाठी पोहोचली. हे पाहून त्यांनी कोणता मोठा गुन्हा केला असावा, असे वाटले होते. मात्र, मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याविरोधात भाष्य केल्यामुळे त्यांना अटक करण्यासाठी पोलिस पोहोचल्याचे पाहून विचित्रच वाटले. मागील अनेक वर्षांत काँग्रेसच्या नेत्या सोनिया गांधी यांच्यावर शिवसेनेच्या मोठ्या नेत्यांनी भर स्टेजवर आरोप केले. खालच्या स्तरावर जाऊन टीका केली. मग त्यांच्यावर हे सरकार कारवाई करणार? त्यांना अटक करणार, असा सवाल नवनीत राणा यांनी उपस्थित केला.

गैरवापर सुरू

सिनियर सिटीजन, कॅबिनेट मंत्री व माजी मुख्यमंत्र्यांवर अशी कारवाई होत असेल तर सामान्य नागरिकांवर कशी कारवाई होणार, हे यानिमित्त सिद्ध झाले आहे. महाराष्ट्रात सुटीचे राजकारण सुरू आहे. सरकारविरोधात बोलले तर कारवाई करण्याचे राजकारण सद्या महाराष्ट्रात सुरू आहे. नारायण राणेंवर केलेली कारवाई केवळ सूडबुद्धीने केली असल्याचे खासदार नवनीत राणा यांनी म्हटले.

राजकारणाचा चुकीचे पद्धतीने वापर

महिलांविरुद्ध बोलणाऱ्यावर कोणत्याही प्रकारची कारवाई केली जात नाही. त्यांच्याकडे लक्ष द्यायला कोणालाही वेळ नाही. केवळ राजकीय नेत्यांविरुद्ध बोलले तर कारवाईचा बडगा उगारला जातो. त्यांना तुरुंगात टाकले जाते. राजकारणाचा चुकीचे पद्धतीने वापर केला जात असल्याचे खासदार नवनीत राणा म्हणाल्या.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

ठाणे हादरलं! ठाकरे गटाच्या नेत्यावर झाडल्या गोळ्या, उपचारावेळी मृत्यू

लालबाग राजाच्या चरणी भक्तांनी भरभरून दिलं दान; १२ दिवसात कोट्यवधींची रोकड

Exam Fee : दुष्काळग्रस्त भागातील दहावी बारावीच्या विद्यार्थ्यांना परीक्षा शुल्क माफी

Motorcycle Accident : मोटरसायकलची समोरासमोर धडक होऊन दोन जण ठार :एक जखमी

CSK च्या कोचिंग स्टाफमध्ये बदलाचे वारे! झहीरपाठोपाठ माजी वेगवान गोलंदाजाचीही संघात एन्ट्री

SCROLL FOR NEXT