file photo
file photo 
विदर्भ

विशेष पथक हरिणायाकडे रवाना 

सकाळ वृत्तसेवा

चंद्रपूर : चंद्रपुरातील अल्पवयीन मुलीला हरियानात विकण्याचे प्रकरण तब्बल दहा वर्षानंतर उघडकीस आल्यानंतर याप्रकरणात आतापर्यंत चंद्रपुरातील चार महिलांना अटक करण्यात आली. या मानवी तस्करीच्या प्रकरणाचा छडा लावण्यासाठी स्थापन केलेले चंद्रपूर पोलिसांचे विशेष पथक आज (ता.11) हरिणायाकडे रवाना झाले. याप्रकरणातील जवळपास 15 आरोपी हरिणायातील विविध जिल्ह्यात असल्याची माहिती आहे. ते हाती लागल्यास मानवी तस्करीची श्रृंखलाच पोलिसांच्या हाती लागण्याची शक्‍यता वर्तविली जात आहे. 

लग्नाच्या नावावर विकण्याची कबुली

पोलिस कोठडीतील आरोपींनी आतापर्यंत वीसच्या वर मुली लग्नाच्या नावावर विकण्याची कबुली दिली आहे. पिडीतेला पोलिसांनी दोन जानेवारीला चंद्रपुरात आणले. त्यानंतर तिला विकणाऱ्या जान्हवी मुजूमदार आणि सावित्री रॉय या दोन महिलेला सहा जानेवारीला पोलिसांनी अटक केली. या दोघींनी गीता मुजूमदार ही सुद्धा मुलींना दुसऱ्या राज्यात लग्नाच्या नावावर पाठविते असे सांगितले. गीताला आठ जानेवारीला पोलिसांनी अटक केली. गीताने दिलेल्या माहितीनुसार जिजाबाई शिंदे हिला पोलिसांनी ताब्यात घेतले. मध्यप्रदेशातील उज्जैन येथील सहा जण क्रिष्णनगर परिसरातील एका गरीब कुटुंबातील मुलीला न्यायला येणार आहे, अशी पोलिसांना गीताने माहिती दिली. त्यात जिबाबाईची मध्यस्थी होती, अशी "टीप'तिच्याकडून पोलिसांना मिळाली. 

सहा जणांना घेतले ताब्यात 

पोलिसांनी सापळा रचून सहा जणांना नऊ जानेवारीला ताब्यात घेतले. चौकशीत जिजाबाई शिंदे हिने सात मुलींचा सौदा केल्याचे समोर आले. या मुली दिल्ली, उत्तरप्रदेश, हरियाना, हिमाचल प्रदेशात पाठविण्यात आल्या आहे. पोलिस आता त्यांच्या कुटुंबीयांचा शोध घेत आहे. हरिणायातील सहा जणांची पोलिसांनी तब्बल तीन दिवस चौकशी केली. मात्र पिडीतेच्या कुटुंबीयांनी तक्रार देण्यास नकार दिला. शेवटी पिडीतेने यातील दशरथ पाटीदार आणि राजेश प्रजापती (दोघेही मध्यप्रदेशातील) यांनी विनयंभगांचा प्रयत्न केल्याचे बयाण दिले. त्यासाठी जिजाबाईने मदत केली, असा आरोप तिने केला. त्यामुळे तूर्तास पोलिसांनी पाटीदार, प्रजापती आणि जिजाबाईवर भादंवी 354, 452 अन्वये गुन्हा दाखल केला आहे. दशरथ पाटीदार याने जिबाबाईशी मुली संदर्भात संपर्क साधला होता. त्यानंतर पाटीदार सहा जणांसह दीड लाख घेऊन मुलीच्या घरी पोहचला. मात्र तत्पूर्वीच पोलिस पोचले आणि पुढचा अनर्थ टळला. दुसरीकडे अटकेतील चारही महिलांनी सांगितलेल्या मुलींच्या कुटुंबीयांशी पोलिस संपर्क साधत आहे. आता मुलगी नेमकी कुठे आहे, याची माहिती घेत आहे. 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

महाराष्ट्रासाठी आर्थिक विकासाची ‘गॅरंटी’, नवी दिल्ली भेटीत पंतप्रधानांचे आश्वासन

Labour Day : एक दंगल झाली आणि त्यामुळे जगात कामगार दिन साजरा होऊ लागला, वाचा इतिहास

Maharashtra Din 2024 : बहु असोत सुंदर संपन्न की महा..प्रिय अमुचा एक महाराष्ट्र देश हा.! महाराष्ट्र दिनाच्या द्या हटके शुभेच्छा

Loksabha Election 2024 : हुकूमशहांकडे महाराष्ट्र देणार नाही ! ; उद्धव ठाकरे यांनी मोदी, शहा यांच्यावर डागली तोफ

ढिंग टांग : भटकती आत्मा आणि बाबा बंगाली..!

SCROLL FOR NEXT