विदर्भ

उज्ज्वल उद्यासाठी आपण बदलूया : हमीद दाभोलकर

सकाळवृत्तसेवा

अकोला : "उज्वल उद्यासाठी आपण बदलूया" असा संदेश युवकांना देत युवकांनी बदलत्या काळाप्रमाणे नव्या संकल्पना व विचार आत्मसात करावे असे मत डॉ. हमीद दाभोलकर यांनी युवा संवाद कार्यक्रमामध्ये विवेकवाद ह्या विषयावर बोलतांना व्यक्त केले.  

महाराष्ट्र निर्मूलन समिति, विवेक वाहिनी व श्री शिवाजी महाविद्यालय यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित युवा संवाद या कार्यक्रमामध्ये विवेकवाद या विषयावर स्थानिक श्री शिवाजी महाविद्यालयामध्ये कार्यक्रम आयोजित केला होता. कार्यक्रमाला मुख्य संवादक म्हणून दाभोलकर बोलत होते.

''तरुणाई ही नैराश्यामुऴे आत्महत्या करत आहे. परंतु विवेक वाहिनीसारख्या कार्यक्रमाद्वारे तरुणांना आपला विवेक जागृत होण्यासाठी मदत होते. युवकांना तरुणाईच्या वयामध्ये प्रेम, आकर्षण, लग्न, अंतरजातीय विवाह, रुढी परंपरा या ज्वलंत सामाजिक प्रश्नावर हमीद दाभोलकरांनी प्रकाश टाकला.

अंधश्रद्धा निर्मुलन समितीद्वारे विवेक वाहिनी ही चांगले किंवा वाईट काय  आणि माणसाच्या मनामध्ये स्वत:मध्ये बदल घडविण्याची क्षमता विवेकवाद देतो. समाजोभिमुख विषय हाताळण्याचे कार्य विवेक वाहिनीसारख्या कार्यक्रमातून होत असते, असे डॉ. दाभोलकरांनी मत व्यक्त केले.

मुलींच्या-महिलांच्या मासिक पाळीविषयी, शारिरिक बदलांविषयी मुलां-मुलींचे समुपदेशन होणे आवश्यक आहे. मासिक पाळी ही अपवित्र मानली जाते. परंतु महिलांच्या या नैसर्गिक क्रियेतूनच मनुष्याचा जन्म होतो. त्यामुळे ही नैसर्गिक शारीरिक प्रक्रिया पवित्र आहे, असे स्पष्ट मत डॉ. दाभोळकरांनी ह्यानिमित्त युवकांशी संवाद साधतांना व्यक्त केले.

कार्यक्रमामध्ये महादेवराव भूईभार यांनी येत्या दिवाळीमध्ये प्रदूषणास कारणीभूत ठरणारे फटाके बंद करावे अस मत व्यक्त केले. विद्यार्थ्यांचे अस्तित्व जागृत करण्याचे कार्य डॉ हमिद दाभोळकर ह्यांनी केले असे कार्यक्रमाचे,अध्यक्ष प्राचार्य डॉ. रामेश्वर भिसे ह्यांनी केले.

कार्यक्रमाचे अध्यक्ष म्हणून प्राचार्य डॉ. रामेश्वर भिसे होते तर प्रमुख अतिथी म्हणून महाराष्ट्र राज्य अनिस उपाध्यक्ष मा. महादेवराजी भूईभार,  महाराष्ट्र राज्य अनिस चे प्रधान सचिव प्रा.बबनराव कानकिरड, प्रा. मधु जाधव, महाराष्ट्र राज्य अनिसचे कार्याध्यक्ष डॉ.संजय तिडके, सर्पमित्र बाळ काळणे तसेच महानगर कार्याध्यक्ष डॉ प्रविण वाघमारे हे होते.  कार्यक्रमाचे संचालन शितल मानकर तर अनिकेत ताथोड ह्यांनी आभार प्रदर्शन केले.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

IPL 2024 MI vs SRH: सूर्यकुमारचं तडाखेबंद शतक अन् मुंबईचा दणदणीत विजय; वानखेडेवर हैदराबादला दिला पराभवाचा धक्का

MI vs SRH: पहिलाच सामना अन् हेडचा उडवलेला त्रिफळा, पण झाला नो-बॉल; निराश झालेल्या अंशुलला बुमराह-हार्दिकने असा दिला धीर

Mumbai News : मुंबईतील कार्यालयीन वेळेत बदल होणार? रेल्वेच्या आवाहनाला ३३ कंपन्यांचा प्रतिसाद

Abhishek Ghosalkar: घोसाळकर कुटुंबियांना सीसीटीव्ही फुटेज दाखवा; हायकोर्टाचे पोलिसांना निर्देश

Mumbai Riots: मुंबईतील 1992च्या दंगलीतील खटले निकाली काढा; सुप्रीम कोर्टाचे सरकारला निर्देश

SCROLL FOR NEXT