st_mahamandal
st_mahamandal 
विदर्भ

कोरोना इफेक्‍ट एसटीवरही, 99 टक्‍के उत्पन्न घटले!

भूषण काळे

अमरावती : गेल्या दोन महिन्यांपासून कोरानाने जनजीवन ठप्प झाले आहे. कोरोनाचा प्रादुर्भाव वाढू नये म्हणून देशभर लॉकडाऊनची घोषणा करण्यात आली. जिल्ह्यांच्या सीमा बंद करण्यात आल्या. परीणामी वाहतुकही थांबली. कधी नव्हे ती रेल्वे आणि बसेसची चाके थांबली होती. कोरोनाचा प्रादुर्भाव अजूनही सुरूच आहे मात्र आता हळुहळु जनजीवन पूर्ववत होते आहे. रेल्वेसेवा आणि बससेवाही काही प्रमाणात सुरू झाली आहे. मात्र प्रवासीच कोरोनाच्या भीतीने प्रवास टाळत आहेत. आणि त्याचा जबरदस्त फटका राज्य मार्ग एसटी महामंडळाला बसला असून मागील आठ दिवसांत एसटीचे उत्पन्न जवळपास 99 टक्‍क्‍यांनी घटले आहे.
22 मे पासून जिल्ह्यातील चांदूरबाजार, परतवाडा, दर्यापूर, अंजनगाव, चांदूररेल्वे आदी मोजकीच बसस्थानके सुरू आहेत. आठ दिवसांत महामंडळाला केवळ 2 लाख 48 हजार 126 रुपयांचे उत्पन्न झाले. 22 ते 28 मे या कालावधीत एसटीने 27 हजार 364 किलोमीटरचे अंतर पूर्ण करत अडीच लाख रुपयांचे उत्पन्न प्राप्त केले.
बडनेरा आणि अमरावती बसस्थानक अजूनही सुरू झाले नाही. एसटीचा सध्या जिल्ह्यातूनच प्रवास सुरू आहे. श्रमिक कामगार तथा अडकलेले नागरिक वगळता एसटीची चाके जिल्ह्याबाहेर गेलेली नाहीत. जादा गर्दीच्या हंगामातच महामंडळावर ही वेळ आल्याने महामंडळाचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले आहे. त्यातच अमरावती आगार हे जादा उत्पन्न देणारा डेपो आहे. मात्र रेड झोनमुळे हे स्थानकच बंद असल्याने महामंडळाच्या उत्पन्नावर गडद सावट पडले आहे.
कुठे 40 लाख अन्‌ कुठे 40 हजार
लॉकडाऊनपूर्वी महामंडळाला दरदिवशी 40 ते 45 लाख रुपयांचे उत्पन्न व्हायचे. लॉकडाऊनमध्ये एसटीची चाके जागच्या जागीच थांबलेली असल्याने महामंडळाला दोन महिन्यांत तब्बल 25 कोटी रुपयांचा फटका एकट्या अमरावती जिल्ह्यातून बसला आहे. पूर्वी एका दिवशी 40 लाख रुपयांचे होणारे उत्पन्न सध्या 40 हजारांवर आले आहे. महामंडळाचे उत्पन्न तब्बल 99 टक्‍क्‍यांनी कमी झाले आहे.

मालवाहतुकीचा उतारा
प्रवाशी तुट भरून काढण्यासाठी महामंडळाने मालवाहतूक सुरू करण्याचा निर्णय घेतला आहे. कोरोनामुळे एसटीला आधीचे दिवस कधी प्राप्त होतील, हे अनिश्‍चित आहे. त्यामुळेच महामंडळाने मालवाहतूक चालू करण्याचा निर्णय घेतला आहे. प्रत्येक स्थानकावरून ही मालवाहतूक केली जाईल, असे एसटीच्या सूत्रांनी सांगितले.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Devendra Fadanvis: 'उद्धव ठाकरेंचं रडगाणं सुरू, पराभव समोर दिसू लागल्यानेच त्यांची मोदींवर टीका'; देवेंद्र फडणवीसांचा आरोप

Latest Marathi Live News Update : तामिळनाडूत रात्रीपासून सुरू असलेल्या संततधार पावसामुळे पूरस्थिती

Rohit Sharma: रोहितने प्रायव्हसीचा भंग करण्याच्या आरोपावर स्टार स्पोर्ट्सनं दिलं स्पष्टीकरण

Anuskura Ghat : अणुस्कुरा घाटातील जंगलात लपलेल्या चोरट्यांच्या आवळल्या मुसक्या; मागावर होतं तब्बल 30 पोलिसांचं पथक, असं काय घडलं?

Accident News : छत्तीसगडमध्ये मृत पावलेले १८ जण आदिवासींच्या संरक्षित जमातीमधील; राष्ट्रपतींनी व्यक्त केल्या संवेदना

SCROLL FOR NEXT