shortage of 100 rs stamp paper Sakal
विदर्भ

Stamp Paper : शंभराचा स्टॅम्प पेपर मिळतोय दीडशेला!

रामटेक तालुक्यात स्टॅम्प पेपरचा काळाबाजार सुरू असून शंभर रुपयांचा स्टॅम्प पेपर दीडशे रुपयांपर्यंत विकला जात आहे. यात सामान्य माणसांची मोठी लूट सुरू आहे.

रूपेश वनवे

शिवनी (भोंडकी) - रामटेक तालुक्यात स्टॅम्प पेपरचा काळाबाजार सुरू असून शंभर रुपयांचा स्टॅम्प पेपर दीडशे रुपयांपर्यंत विकला जात आहे. यात सामान्य माणसांची मोठी लूट सुरू आहे. स्थानिक प्रशासनाने मात्र, दुर्लक्ष असून तक्रार होत नसल्यामुळे कारवाई करता येत नाही, असे सांगून प्रशासन या प्रकारापासून अलिप्त राहण्याचा प्रयत्न करीत आहे. याविरोधात सामान्य जणांनी रोष व्यक्त केला आहे.

सध्या शेतीचा हंगाम सुरू आहे. तसेच शालेय विद्यार्थ्यांना विविध कामांसाठी दाखल्याची गरज असते. काही कागदपत्रांसाठी स्टॅम्प पेपरची गरज नसते. तर काही दाखल्यांसाठी स्टॅम्प पेपरची गरज असते. सध्या शेतकरी आणि विद्यार्थ्यांची तहसील कार्यालयात प्रचंड गर्दी आहे. याच गर्दीचा लाभ घेत १०० रुपयांचा स्टॅम्प पेपर १५० रुपयांत विकण्यात येत आहे.

अनेक शेतकरी नाइलाजास्तव अधिकचे पैसे माजून स्टॅम्प पेपर खरेदी करीत आहे. सकाळपासून स्टॅम्प पेपरसाठी गर्दी असते. गावखेड्यातून मजुरी सोडून शेतकरी तहसील कार्यालयात कामासाठी येतात. मात्र, तहसील कार्यालयात आल्यानंतर चित्र वेगळे दिसते. पुन्हा गावाकडे गेल्यास नुकसान होण्याची भीती असते.

त्यामुळे अधिकचे पैसे मोजून स्टॅम्प पेपर विकत घेतले जाते. सामान्य जणांचे काम अडल्यामुळे ते प्रशासनाकडे तक्रार करीत नाही, त्याचा फायदा स्टॅम्प विक्रेते घेत आहेत. यावर आवर घालणे आवश्यक असून प्रशासनाने तातडीने कार्यवाही करावी, अशी मागणी होत आहे.

तुम्ही उद्या आम्हाला पत्र द्या. मी सर्वाना ऑफिसला बोलवितो.

- वंदना सवरंगतपते, उपविभागीय अधिकारी, रामटेक

ही एक शोकांतिका आहे. शेतकऱ्यांची पिळवणूक केली जात आहे. अधिकचे पैसे घेणाऱ्यांवर कारवाई करणे आवश्यक आहे. तहसीलदार किंवा उपविभागीय अधिकाऱ्यांनी भरारी पथक नेमून आठवड्यातून किमान एकदा छापा मारणे आवश्यक आहे. तरच या प्रकाराला आळा बसेल. संबंधितांवर कार्यवाही होणे आवश्यक आहे. अन्यथा आंदोलन करण्यात येईल.तहसीलदारांना घेराव घालण्यात येईल.

- राहुल किरपान, तालुकाध्यक्ष, भाजप, रामटेक

शालेय कामे, शेतीचे पीककर्ज यासाठी अनेक ठिकाणी विद्यार्थी, शेतकऱ्यांना स्टॅम्प पेपरची गरज पडते. मात्र काही स्टॅम्प पेपर विक्रेते त्यांची अडवणूक करीत आहे. अधिकचे पैसे घेऊन स्टॅम्प पेपर विक्री करीत आहेत. यामुळे नागरिक त्रस्त झाले आहे. विक्रेत्यांवर कारवाई होणे आवश्यक आहे. अन्यथा आंदोलन करण्यात येईल.

- रमेश कारेमोरे, प्रहार संघटना, रामटेक

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Ramdas Kadam : 'बाळासाहेबांचा मृतदेह २ दिवस मातोश्रीवर ठेवला' ही माहिती रामदास कदमांना कुणी दिली? स्वत: सांगितलं नाव...

Maharashtra tourism : महाराष्ट्राचे दार्जिलिंग! फोफसंडी गावाची या खासियत तुम्हाला माहीत आहे का? जाणून घ्या

Pune Crime: पुण्यातील दौंडमध्ये थरारक घटना! पत्नीचा गळा दाबून खून, नंतर उचललं टोकाचं पाऊल

Latest Marathi News Live Update : फर्ग्युसन रस्त्यावरील वाहतूक आज काही वेळासाठी बंद करण्यात येणार

Panchang 3 October 2025: आजच्या दिवशी अर्गला स्तोत्र पठण व ‘शुं शुक्राय नमः’ या मंत्राचा जप करावा

SCROLL FOR NEXT