Stone pelting and knife attack by youths on three hotels on amravati road Sakal
विदर्भ

Amravati News : अमरावती रोडवरील तीन हॉटेलवर युवकांची दगडफेक व चाकूहल्ला

दर्यापूर शहरात अशाप्रकारे प्रथमच आठ ते दहा अज्ञात युवकांनी दगडफेक व भ्याड हल्ला केल्यामुळे संपूर्ण शहरात भीतीचे वातावरण पसरले आहे.

सकाळ वृत्तसेवा

दर्यापूर : दर्यापूर अमरावती मार्गावर असलेल्या मोहिनी बार अँड रेस्टॉरंट मध्ये आज सायंकाळी सहा वाजताच्या सुमारास आठ ते दहा अज्ञात युवकांनी जेवण करून त्याच हॉटेलवर अचानक दगडफेक सुरू केली. यात हॉटेल मालकांसोबतही तू तू मै मै केली.

तसेच जवळच असलेल्या फाइव्ह केंडल या हॉटेलवरही दगडफेक केली.या प्रकरणी हस्तक्षेप केल्याने हल्लेखोरांनी चाकू काढून अचानक हल्ला करण्याचा प्रयत्न केला. दर्यापूर शहरात अशाप्रकारे प्रथमच आठ ते दहा अज्ञात युवकांनी दगडफेक व भ्याड हल्ला केल्यामुळे संपूर्ण शहरात भीतीचे वातावरण पसरले आहे.

त्याच युवकांनी हल्ल्यात मोहिनी बार अँड रेस्टॉरंटच्या आसपास असलेल्या दुकानांवरही तुफान दगडफेक केली.यात हॉटेल चालकांनी विरोध दर्शविताच त्यांच्यावरही चाकू ने हल्ला करण्याचा प्रयत्न झाला. मात्र हॉटेल मालक व व कर्मचारी यांनी स्वतःचा जीव वाचवत तेथून निघून जाणे पसंत केले. यामुळे सुदैवाने यात कुठलीही जीवित हानी झाली नाही.

परंतु दर्यापूर शहरात या संबंधातील दहशतीची चर्चा सर्व दूरपर्यंत पसरली होती. घटनास्थळी दर्यापूर पोलिस स्टेशनचे ठाणेदार संतोष ताले व त्यांचे कर्मचारी पोचले असता तिथून आरोपींनी पळ काढला. मात्र त्यानंतर पोलिसांनी शिताफीने दोन जणांना ताब्यात घेतले. उर्वरित साथीदार फरार झाले असून पोलिस त्यांचा कसून शोध घेत आहे. यांसह एका आरोपीची दुचाकी सुद्धा पोलिसांनी जप्त केली.संबंधित घटनास्थळी नागरिकांची गर्दी पाहण्यासाठी जमा झाली होती.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

LPG Cylinder Prices : इराण-अमेरिका युद्धाचा थेट फटका! गॅस सिलिंडर महाग; आजपासून नवे दर लागू, किती झाली किंमत?

अग्रलेख : उजेडातील रोषणाई!

मोठी बातमी! पहिली ते नववीची अंतिम सत्र परीक्षा २० एप्रिलपासून; शिक्षक-विद्यार्थ्यांना ४४ दिवसांची उन्हाळा सुट्टी; १५ जूनपासून सुरु होणार शाळा

Weekend Special Recipe: नवीन काहीतरी खायचंय? मग वीकेंडला बनवा चविष्ट मुगदाळीची बाटी, सोपी आहे रेसिपी

Weekly Rashi Bhavishya Horoscope News in Marathi : कसा असेल तुमचा आठवडा..? ग्रहमान : ७ मार्च २०२६ ते १३ मार्च २०२६ - मराठी राशी भविष्य

SCROLL FOR NEXT