File photo
File photo 
विदर्भ

महापरीक्षा पोर्टल बंद करण्यासाठी विद्यार्थ्यांचा मोर्चा

सकाळ वृत्तसेवा

अमरावतीः शासनाच्या विविध विभागात पदभरतीसाठी महापरीक्षा पोर्टलद्वारे घेण्यात येणाऱ्या परीक्षा प्रक्रियेत अनेक घोळ असल्याचे सांगत सरकारने महापरीक्षा पोर्टल त्वरित बंद करण्याच्या मागणीसाठी शेकडो विद्यार्थ्यांनी गुरुवारी (ता. 22) जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चा काढला.
गाडगेनगर येथून जिल्हाधिकारी कार्यालयावर काढण्यात आलेल्या मोर्चात जिल्ह्यातील शेकडो विद्यार्थी सहभागी झाले. हातात मागण्यांचे फलक झळकवित व घोषणा देत हा मोर्चा जिल्हाकचेरीवर धडकला. शासनाने सर्व परीक्षा महाराष्ट्र लोकसेवा आयोगामार्फतच घ्याव्यात किंवा महाराष्ट्र लोकसेवा आयोगासारखे स्वतंत्र आयोग नेमण्यात यावे, परीक्षेच्या अवाजवी शुल्कात कपात करावी, महापरीक्षेत पदांकरिता घेतल्या जाणाऱ्या लाचखोरीला आवर घालावा, परीक्षा केंद्रातील गैरकारभार व बेशिस्तीवर कठोर कारवाई करावी, जिल्ह्यातील विद्यार्थ्यांना जिल्ह्यातच परीक्षेला बसता यावे, ऑनलाइन परीक्षा बंद करून सर्वांची परीक्षा एकाच दिवशी असावी, योग्य तज्ज्ञांकडून परीक्षा प्रक्रिया राबविण्यात यावी, एखाद्या परीक्षेत आधारकार्डची झेरॉक्‍सप्रत विद्यार्थ्यांकडे असल्यास त्याला परीक्षेपासून वंचित न ठेवता त्याच्याकडून हमीपत्र घेऊन त्याला परीक्षेला बसू देण्यात यावे, अशा विविध मागण्या या मोर्चाद्वारे करण्यात आल्यात.
विद्यार्थी कृती समिती प्रमुख किशोर जाधव यांच्या नेतृत्वात विद्यार्थ्यांच्या शिष्टमंडळाने जिल्हाधिकारी शैलेश नवाल यांना निवेदन दिले. यावेळी पोलिसांचा तगडा बंदोबस्त ठेवण्यात आला होता.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Madha Loksabha: मावळत्या सूर्याची शपथ अन् शरद पवार... मोदींची टीका; जाणून घ्या काय आहे संपूर्ण प्रकरण?

Latest Marathi News Live Update : प्रज्वल रेवण्णा स्कॅंडल प्रकरणात जनता दल सेक्युलर पक्षाची मोठी कारवाई

मोहन जोशींना झाला होता मालिका सोडल्याचा पश्चाताप; जाणून घ्या शूटिंगदरम्यानचा 'तो' भन्नाट किस्सा...

Aamir Khan: "मुसलमान असल्यामुळे मला नमस्कार करण्याची सवय नव्हती पण..."; आमिरनं सांगितला पंजाबमधील 'तो' किस्सा

वॉशिंग्टन पोस्टच्या रिपोर्टमधील गंभीर आरोपांवर भारताचे सडेतोड उत्तर; काय करण्यात आलाय दावा?

SCROLL FOR NEXT