नागपूर : राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठाच्या आंतर महाविद्यालयीन ऍथलेटिक्‍स स्पर्धेत मंगळवारी महिलांच्या चारशे मीटर शर्यतीत प्रथम स्थान मिळविणारी सायली वाघमारे (505) अंतिम रेषेकडे वेगाने धावताना.
नागपूर : राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठाच्या आंतर महाविद्यालयीन ऍथलेटिक्‍स स्पर्धेत मंगळवारी महिलांच्या चारशे मीटर शर्यतीत प्रथम स्थान मिळविणारी सायली वाघमारे (505) अंतिम रेषेकडे वेगाने धावताना.  
विदर्भ

सायली वाघमारेचे यशस्वी पुनरागमन

सकाळ वृत्तसेवा

नागपूर ः दोन वर्षांपूर्वी गुंटूर येथे अखिल भारतीय आंतरविद्यापीठ स्पर्धेत आठशे मीटर शर्यतीत सुवर्णपदक जिंकल्यानंतर सायली वाघमारेला दुखापतीने जेरीस आणले होते. त्यातून तिने स्वतःला सावरले आणि आंतरमहाविद्यालयीन ऍथलेटिक्‍स स्पर्धेत चारशे मीटर शर्यत जिंकून दोन वर्षांनंतर यशस्वी पुनरागमन केले. 
आर. एस. मुंडले धरमपेठ महाविद्यालयात पदव्युत्तर शिक्षण घेत असलेल्या सायलीने दोन वर्षांपूर्वी चारशे मीटर शर्यतीत 57.99 सेकंदांचा स्पर्धा विक्रम नोंदविला होता. त्यामुळे साहजिकच अंतिम शर्यतीत तिच्या कामगिरीकडे सर्वांच्या नजरा होत्या. सायलीने मात्र पुनरागमन असल्याने जोखीम पत्करली नाही. प्रथम दोनशे मीटरपर्यंत ती दुसऱ्या क्रमांकावर होती. त्यानंतर तिने वेग वाढविला आणि 1 मिनिट 00.22 सेकंद अशा प्रभावी वेळेसह चौथ्यांदा अव्वल स्थान मिळविले. निकाल : 100 मीटर (पुरुष) : आदर्श भुरे (10.80 सेकंद, विद्याभारती कॉलेज, सेलू), गोपाल पलांदूरकर, जी. राजेश (दोघेही हिस्लॉप महाविद्यालय. (महिला) : साक्षी आंबेकर (13.06 सेकंद, एस. बी. सिटी कॉलेज), उत्कर्षा लेंडे (एस. बी. सिटी कॉलेज), अदिती फाळे (रेणुका कॉलेज). 100 मीटर अडथळा (महिला) : श्‍वेता वसुले (एस. बी. सिटी कॉलेज), निधी तिवारी (सिटी प्रीमियर कॉलेज), सविता खंदाडे (डॉ. एल. डी. बाळखांदे कॉलेज, पवनी). 400 मीटर (पुरुष) : अभी राणा (इंदूबाई स्मृती शा. शि. महाविद्यालय), सौरभ भुसारी (सिटी प्रीमियर कॉलेज), सुधीर शेंडे (भिवापूर महाविद्यालय). (महिला) : सायली वाघमारे (आर. एस. मुंडले धरमपेठ महाविद्यालय), जया राणी (अजित वाडेकर शा. शि. महाविद्यालय), मीना कळंबे (एस. बी. सिटी महाविद्यालय). 1500 मीटर (पुरुष) : दुष्यंत वर्मा (बॅरि. शेषराव वानखेडे महाविद्यालय, खापरखेडा), आकाश मेश्राम (सी. पी. ऍण्ड बेरार महाविद्यालय), मनोज पांडे (साकेत शा. शि. महाविद्यालय). (महिला) : ऋतुजा शेंडे (धनवटे महाविद्यालय), गीता चाचेरकर (लेमदेव पाटील कॉलेज), रिया दोहतरे (चक्रपाणी महाविद्यालय). उंच उडी (पुरुष) : जी. राजेश (हिस्लॉप महाविद्यालय), धनंजय (एस. एन. मोर कॉलेज), प्रज्वल लटाळे (सिटी प्रीमियर कॉलेज). (महिला) : अर्चना (जोतिबा शा. शि. महाविद्यालय), निकिता बावने (आरएमपीसी), सोनू लसुंते (श्री. जाजू महाविद्यालय, पिपरी). गोळाफेक (पुरुष) : उत्कर्ष (एनएफएससी), हिमांशू कावरे (ईश्‍वर देशमुख शा. शि. महाविद्यालय), सुमित्रा तापस (सिटी प्रीमियर कॉलेज). (महिला) : शिवानी नेगी (ईश्‍वर देशमुख महाविद्यालय), भावना बावने, वैशाली लोटे (दोघीही एस. जाजू जी. एस. कॉलेज). 

आदर्शने केली विक्रमाशी बरोबरी 
सेलू येथील विद्याभारती कॉलेजचा आदर्श भुरे आणि एस. बी. सिटी महाविद्यालयाची साक्षी आंबेकर यांनी स्पर्धेचे आकर्षण ठरलेली शंभर मीटर शर्यत जिंकून वेगवान धावपटूचा बहुमान पटकाविला. आदर्शने शंभर मीटर अंतर 10.80 सेकंदांत शर्यत पूर्ण करून एसएफएसचे जे. पी. फर्नांडीस यांनी 1966 तर बुलडाण्याचे डी. वाय. काळे यांनी 1960 मध्ये नोंदविलेल्या 10.80 सेकंदांच्या विक्रमाची बरोबरी केली. साक्षीने 13.06 सेकंदांत पूर्ण केले. 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Modi Video : नरेंद्र मोदींनी काढली बाळासाहेब ठाकरेंची आठवण; म्हणाले, डीएमकेचे लोक सनातन धर्माला डेंग्यू म्हणत आहेत...

IPL 2024 DC vs MI Live Score : मुकेश कुमारने टीम डेविडचा अडथळा केला दूर; मुंबईचा 6 फलंदाज आऊट

PM Modi Kolhapur Rally: पंतप्रधान मोदींच्या सभेला संभाजी भिडेंची हजेरी; मोदींचं कोल्हापुरकरांना पुन्हा सत्तेत आणण्याचं केलं आवाहन

Tristan Stubbs DC vs MI : 4,4,6,4,4,4 एकाच षटकात होत्याचं नव्हतं झालं! स्टब्सच्या तडाख्यात वूडची शकलं

Latest Marathi News Live Update : पाच वर्षात पाच पंतप्रधान करण्याचा इंडिया आघाडीचा प्लॅन- मोदी

SCROLL FOR NEXT