Suicide
Suicide 
विदर्भ

प्रेयसीची जाळून घेऊन आत्महत्या

सकाळवृत्तसेवा

नागपूर - तीन प्रेयसींसोबत प्रेमसंबंध असल्याचे बिंग फुटल्यानंतर संतापलेल्या प्रियकराने दुसऱ्या प्रेयसीला घेऊन पहिल्या घरात घुसून धिंगाणा घातला. दोघांनी मिळून तिला अश्‍लील शिवीगाळ व मारहाण केली. मध्यस्थी करणाऱ्या काकूला मारहाण केली. या प्रकारामुळे मनस्ताप झालेल्या प्रेयसीने घरात स्वत:ला बंद करून पेटवून घेतले. याप्रकरणी वाडी पोलिसांनी आरोपी प्रियकर आणि त्याच्या दुसऱ्या प्रेयसीवर गुन्हा दाखल केला आहे. 

वाडी हद्दीत तवक्कल ले-आउट नागपूर येथे राहणारी सायली राजू बागडे (१८) मूळ पत्ता मांगळूर, ही ८ ऑक्‍टोबरला दुपारी तीनच्या सुमारास तिच्या घरी बसली होती. यादरम्यान तिला भेटण्याकरिता तिचा पूर्वाश्रमीचा प्रियकर आशीष उईके तिथे आला. दोघांमध्ये अज्ञात कारणावरून वाद झाला आणि सायलीने स्वत:ला रूममध्ये कोंडून घेतले व अंगावर केरोसीन टाकून पेटवून घेतले. गंभीर अवस्थेत तिला उपचाराकरिता मेयो हॉस्पिटलमध्ये भरती करण्यात आले, पण ९ ऑक्‍टोबरला दुपारी एकच्या सुमारास उपचारादरम्यान तिचा मृत्यू झाला.

मानसिक धक्क्यातून आत्महत्या
या प्रकरणाच्या चौकशीअंती सायलीचे तिच्या गावातील परिचित व्यक्ती आरोपी आशीष उईके (वय२१, मंगरूळ, डोंगरगाव, बुटीबोरी) याच्यासोबत प्रेमसंबंध होते. तसेच आरोपीचे इतर दोन मुलींसोबतसुद्धा प्रेमसंबंध होते. हा प्रकार सायलीला कळल्यानंतर तिने आशीषसोबतचे संबंध संपुष्टात आणले. हे आशीषची दुसऱ्या प्रेयसी चान्सी मेश्राम (३०, मंगरूळ, डोंगरगाव, बुटीबोरी) हिला कळल्यानंतर ती आशीषवर संतापली. २ ऑक्‍टोबर रोजी साडेपाचच्या दरम्यान आरोपी आशीष उईके व आरोपी चान्सी मेश्राम हे दोघेही सायलीच्या घरी आले व सायलीला ‘तू माझ्या जीवनातून निघून जा. गेली नाही तर तुला मारून टाकीन. तुझा जीव घेईन’ अशी धमकी दिली आणि शिवीगाळ करून हातबुक्कीने मारहाण केली. त्यांच्यातील भांडण सोडविण्याकरिता सायलीची काकू आली असता तिलासुद्धा आरोपींनी मारहाण केली. या गोष्टीचा सायलीला मानसिक धक्का बसला. तिने घराचा दरवाजा आतील कडी लावून बंद करून अंगावर केरोसीन ओतले आणि स्वत:ला जाळून घेतले. 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Sharad Pawar: "अरे मामा जरा जपून... तुझं सर्व काढायला वेळ लागणार नाही"; इंदापुरात शरद पवारांचा इशारा!

Shreyas Talpade: कोरोना लसीमुळे हृदयविकाराचा झटका आला? श्रेयस तळपदे म्हणाला,'लस घेतल्यानंतर मला...'

IPL 2024 PBKS vs CSK Live Score : अर्शदीपचा अप्रतिम यॉर्कर अन् रहाणे झाला बाद

Lok Sabha : 'एक भाकरी, एक रूपया द्या.. एका भिक्षुकाला पंतप्रधान करा' म्हणणाऱ्या विजयप्रकाश कोंडेकरांकडे किती आहे संपत्ती?

Latest Marathi News Live Update : राहुल गांधी यांनी वायनाडच्या लोकांशी केलेली फसवणूक - गौरव वल्लभ

SCROLL FOR NEXT