file Photo
file Photo 
विदर्भ

सराफा व्यापाऱ्याची विष प्राशन करून आत्महत्या 

सकाळ वृत्तसेवा

कामठी (जि.नागपूर)  : कामठी तालुक्‍यांतर्गत येणाऱ्या भिलगाव येथील कॅनल कामठी रोडवरील फ्लॅट नंबर 102 सुंदरम अपार्टमेंट रहिवासी एका सुवर्णकार तरुणाने व्यावसायिक कामानिमित्त गावातील एका तरुणाकडून 50 हजार रुपये उधारी स्वरूपात घेतले होते. या रकमेची परतफेड व्याजाच्या स्वरूपात 85 हजार रुपये देणे बाकी होते. मात्र आर्थिक परिस्थिती हलाखीची असल्याने व्याजासह उधारीची रक्कम परत करणे शक्‍य नव्हते. या कारणावरून सावकार हा नेहमी आर्थिक त्रास देत शिवीगाळ करत असल्याने कर्जाला कंटाळून कर्जदार तरुणाने विष प्राशन करून आत्महत्या केल्याची घटना 30 जुलैला दुपारी घडली. मृत तरुणाचे नाव आदित्य विनोद भुताड (वय 29, भिलगाव) असे आहे. 
या प्रकरणात यशोधरा नगर पोलिसांनी आकस्मिक मृत्यूची नोंद करीत आत्महत्येस प्रवृत्त करणाऱ्या आरोपी सावकार तरुणाच्या आत्महत्येबद्दल गुन्हा नोंदविला. आरोपीचे नाव प्रणय गायकवाड (रा. भिलगाव) असे आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार विनोदचे भिलगावात सोनेचांदी विक्रीचे दुकान आहे. व्यावसायिक कामानिमित्त सावकार प्रणय गायकवाड याच्याकडून काही महिन्यापूर्वी 50 हजार रुपये उधार घेतले. मात्र व्यवसायात असलेल्या मंदीमुळे व आर्थिक कमजोरीमुळे उधारीचे पैसे परत देणे होत नव्हते. तर दुसरीकडे आरोपी प्रणय गायकवाड हा नेहमी 50 हजार रुपये उधारी व त्यावरील व्याज असे एकूण 85 हजार रुपयांच्या मागणीसाठी अश्‍लील शिवीगाळ करीत मारझोड करून मानसिक त्रास देत होता. हे नित्याचेच झाले होते. जाचक त्रास व कर्जाला कंटाळून कर्जदार अविवाहित तरुणाने 30 जुलै रोजी दुपारच्या सुमारास राहत्या घरातच विष प्राशन करून आत्महत्येचा प्रयत्न केला. त्याला तडकाफडकी कामठीच्या आशा हॉस्पिटलमध्ये उपचारार्थ दाखल करण्यात आले होते. मात्र परिस्थिती नाजूक असल्याने उपचारार्थ नागपूरच्या मेडिकल इस्पितळात हलविण्यात आले. 31 जुलैला दुपारी तरुणाचा दुर्दैवी मृत्यू झाला. मृताच्या पाठीमागे आई, वडील, एक भाऊ व एक बहीण असा आप्तपरिवार आहे. या प्रकरणाच्या तपासात निष्पन्न झालेल्या कारणावरून फिर्यादीचा भाऊ शुभम विनोद भुताड (26)याने स्थानिक पोलिस ठाण्यात दिलेल्या तक्रारीवरून आरोपी प्रणय गायकवाड याच्याविरुद्ध गुन्हा नोंदविण्यात आला असून आरोपी अजूनही अटकेबाहेर आहे.  

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

SRH vs LSG : अभिषेक शर्माचे SRH साठी सर्वात वेगवान अर्धशतक; 10 षटकात लखनौचं आव्हान केलं पार

Mumbai News: रुग्णवाहिका खरेदी निविदा प्रक्रिया भोवणार,उच्च न्यायालयाने घेतली दखल, भूमिका स्पष्ट करण्याचे दिले निर्देश

Mumbai Airport: तब्बल इतक्या वेळ मुंबई विमानतळ रहाणार बंद, जाणून घ्या काय आहे महत्वाचं कारण

Police Bharti 2023 : पोलिस भरतीमध्ये एकापेक्षा जास्त अर्ज केलेल्या उमेदवारांना द्यावं लागणार हमीपत्र; आदेशात नेमकं काय म्हटलंय?

Pune Crime : मतदानानंतर वारजे परिसरात गोळीबार, दोघे अल्पवयीन ताब्यात

SCROLL FOR NEXT