लैंगिक शोषण
लैंगिक शोषण sakal
विदर्भ

लैंगिक शोषण प्रकरणी अल्पवयीन बालिकेने गळफास लावून संपवली जीवनयात्रा

सकाळ वृत्तसेवा

वणी, (जि. यवतमाळ) : लग्नाचे आमिष दाखवून वारंवार लैंगिक शोषण केल्याप्रकरणी अल्पवयीन बालिकेने घराशेजारी राहणाऱ्या तरुणाविरुद्ध गेल्या महिन्यात पोलिसात तक्रार नोंदवली होती. त्या...पीडितेने शनिवारी (ता.12) फेब्रुवारीला आपल्या राहत्या घरी गळफास लावून जीवनयात्रा संपविल्याची घटना सायंकाळी उघडकीस आली. (Yavalmal Girl Suicide Case)

सदर पीडिता ही शहरालगत असलेल्या चिखलगाव येथे वास्तव्यास होती. ती आई व भावासोबत आजोबाकडे राहत होती. भावाचा 21 वर्षीय मित्र नेहमी घरी येत असल्याने त्यांच्यात ओळख झाली, ओळखीचे रूपांतर प्रेमात झाले आणि जवळीक वाढली. त्या दोघात प्रेमसंबंध प्रस्थापित झाले, लग्नाचे आमिष दाखवून सातत्याने 'तो' शारिरीक शोषण करू लागला.

जेव्हा हवं तेव्हा तिचा उपभोग घेत होता. त्यातच 'तो' जबरदस्ती करायला लागला. घटनेच्या दिवशी ता. 10 जानेवारीला रात्री 9 वाजता तो पुन्हा पीडितेच्या घरी पोहचला आणि बळजबरी करत 'तिला' मारहाण केली. या प्रकाराने भेदरलेल्या परिवाराने वणी पोलिसात धाव घेत तक्रार दाखल केली होती.

वणी पोलिसांनी तात्काळ दखल घेत आरोपींच्या मुसक्या आवळल्या आणि भादंवि च्या कलम 376 (2) (3) (J)(N), 452, 323, 506 व सहकलम 4, 6 पोक्सो अंतर्गत गुन्हा नोंद केला होता. परंतु घडलेल्या घटनेच्या तब्बल एक महिन्यानंतर पीडितेने गळफास लावून आत्महत्या केल्याने विविध प्रश्न उभे ठाकले आहे. शनिवारी घरी कोणीच नसल्याची संधी साधून पीडितेने घरातच गळफास घेतला. सायंकाळी ही घटना उघडकीस आली. तात्काळ पोलिसांना सूचित करण्यात आले. पोलिसांनी घटनास्थळाचा पंचनामा करत मृतदेह उत्तरीय तपासणीकरिता रुग्णालयात पाठवला. परंतु पीडितेने हा टोकाचा निर्णय का घेतला या बाबतचे सत्य तपासाअंतीच स्पष्ट होणार आहे.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Pune News: वादळी वाऱ्यामुळे लोणी-काळभोरमध्ये बँड पथकावर होर्डिंग कोसळलं, घोडा गंभीर जखमी

IPL 2024 RCB vs CSK Live Score: बेंगळुरू चेन्नई प्लेऑफच्या एका जागेसाठी भिडणार, पण पावसाचे अंदाज काय?

'मोठं होऊन पंतप्रधान व्हाल', ज्योतिषीने केली होती भविष्यवाणी; प्रियांका गांधींनी सांगितला किस्सा

Virat Kohli: भारतीय संघात संधी मिळण्यासाठी रैनाची कशी झाली मदत? विराटनं सांगितली 16 वर्षांपूर्वीची आठवण

Lok Sabha Election 2024 : पंतप्रधान मोदींनी रायबरेली, अमेठीत प्रचार करणे टाळले, नेमकं कारण काय?

SCROLL FOR NEXT