वाडी ः आयुधनिर्माणी परिसरातील कडक सुरक्षाव्यवस्था.
वाडी ः आयुधनिर्माणी परिसरातील कडक सुरक्षाव्यवस्था. 
विदर्भ

आयुधनिर्माणीच्या संपाला संघटनांचा पाठिंबा

सकाळ वृत्तसेवा

वाडी  (जि.नागपूर): आयुधनिर्माणी अंबाझरीसहित देशभरातील सर्व आयुधकारखान्यांत आज सलग दुसऱ्या दिवशीसुद्धा शंभर टक्‍के प्रतिसाद लाभला.
सर्व आयुध कारखान्यांचे प्रस्तावित निगमीकरण रद्द व्हावे, या एकमेव मागणीसाठी रक्षा क्षेत्रातील सर्व कामगार संघटनांच्या राष्ट्रीय फेडरेशन एआयडीईएफ, आयएनडीडब्ल्यूएफ, बीपीएमएस, सीडीआरएद्वारा आयोजित देशव्यापी बंद मंगळवारपासून सुरू झाला. त्याचा आज दुसरा दिवस होता. कालप्रमाणेच दुसऱ्या दिवशीसुद्धा बंद यशस्वी ठरला. जीवनावश्‍यक सेवा वगळता कुणीही कर्मचारी आणि अधिकारी स्वयंस्फूर्तपणे कामावर गेले नाहीत. त्यामुळे आयुधनिर्माणी अंबाझरीचे उत्पादन, प्रशासकीय कामकाज पूर्णतः बंद राहिले. सरकारच्या धोरणाचा निषेध करीत हजारो कर्मचाऱ्यांनी तिन्ही गेटसमोर येऊन जोरदार घोषणा दिल्या.
आंदोलनाला विविध राजकीय पक्ष आणि संघटनांचे समर्थन लाभत आहे. बसप, कॉंग्रेसनंतर आज मार्क्‍सवादी कम्युनिस्ट पक्षाचे नेते तसेच सेंटर फॉर इंडियन टेड युनियनचे जिल्हा अध्यक्ष मोहम्मद ताजुद्दीन, कोषाध्यक्ष रामेश्वर चरपे यांनीही आंदोलनस्थळी भेट दिली आणि पाठींबा जाहीर केला.
बंदच्या समर्थनार्थ नागपूर डिफेंस परिसरातील बाजार आणि दुकानदारांनी आपली दुकाने बंद
ठेवून पाठिंबा व्यक्त केला. संपूर्ण तीस दिवस शांतपणे बंद यशस्वी करण्यासाठी सर्व कर्मचाऱ्यांनी निर्धार केल्याची माहिती संयुक्त संघर्ष समितीचे गिरीश खाडे, बी. बी. मुजुमदार, आर. पी. चावरे, बंडू तिडके, सुभाष पडोळे, गजभिये, रंगारी यांनी दिली.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

IPL 2024 MI vs SRH: सूर्यकुमारचं तडाखेबंद शतक अन् मुंबईचा दणदणीत विजय; वानखेडेवर हैदराबादला दिला पराभवाचा धक्का

MI vs SRH: पहिलाच सामना अन् हेडचा उडवलेला त्रिफळा, पण झाला नो-बॉल; निराश झालेल्या अंशुलला बुमराह-हार्दिकने असा दिला धीर

Mumbai News : मुंबईतील कार्यालयीन वेळेत बदल होणार? रेल्वेच्या आवाहनाला ३३ कंपन्यांचा प्रतिसाद

Abhishek Ghosalkar: घोसाळकर कुटुंबियांना सीसीटीव्ही फुटेज दाखवा; हायकोर्टाचे पोलिसांना निर्देश

Mumbai Riots: मुंबईतील 1992च्या दंगलीतील खटले निकाली काढा; सुप्रीम कोर्टाचे सरकारला निर्देश

SCROLL FOR NEXT