विदर्भ

Loksabha 2019: स्वाभिमानी शेतकरी संघटनेने पंतप्रधानांना पाठविल्या शीट्या

सकाळन्यूजनेटवर्क

बुलढाणा: चौकीदारी करण्यासाठी लागणाऱ्या वस्तु पैकी मुख्य वस्तु म्हणजे शिट्टी आहे, पंतप्रधान चौकीदारी करण्यात कमी पडले असून त्याना शिट्टीची आवश्कयता असल्याने स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे जिल्ह्याध्यक्ष कैलास फाटे यानी पोस्टाद्वारे असंख्य शिट्या पाठविल्या आहेत.

देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी स्वतःला चौकीदार म्हणून घेत आहे त्यांच्यासोबत त्यांचे सर्व सहकारी चौकीदार म्हणायला लागले आहेत, स्वाभिमानीने काही प्रश्न उपस्थित केले असून, त्यात मोदी कमी पडल्याने शीट्या पाठविल्या आहेत, खामगांव येथील पोस्ट ऑफीसमध्ये संघटनेच्या असंख्य कार्यकर्त्यांनी एकत्रित जाऊन शिट्या पाठविल्या आहेत, आता शिट्या चांगल्या वाजवा व चौकीदारी करा असा उद्भोदक सल्ला संघटनेच्या वतिने दिला आहे

दुसरीकडे चौकीदारी करीत असताना 300 किला आरडीएक्स देशात आले कसे, हजारो करोड़ो रूपये मल्ल्या देशाबाहेर गेला कसा, बैंक बुडवून नीरव मोदी पळून जाण्यात यशस्वी झाला कसा असे अनेक प्रश्न उपस्थित करीत मोदी कमी पडले म्हणून आता यापुढे चांगल्या शिट्या वाजवून चौकीदारी करा असा सल्ला स्वाभिमानी शेतकरी संघटनेने दिला आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Amethi Congress Office: अमेठीत राडा, काँग्रेस कार्यालयाबाहेरील अनेक वाहनांची तोडफोड; भाजपवर आरोप

Poonch Attack 2024: पुंछ हल्ल्यामागे पाकिस्तानची संघटनेचा हात, तीन ते चार दहशतवाद्यांनी...

Daily Rashi Bhavishya : आजचे राशिभविष्य - 06 मे 2024

Women’s T20 World Cup: स्कॉटलँडने रचला इतिहास, वर्ल्ड कपचं पहिल्यांदाच मिळवलं तिकीट; श्रीलंकाही ठरले पात्र

Sharad Pawar : बारामतीकरांना धक्का अशक्य;निवडणुकीची अमेरिकेतही उत्सुकता

SCROLL FOR NEXT