Prashant Dikkar Sakal
विदर्भ

Prashant Dikkar : धक्कादायक! उपोषण करणारे स्वाभिमानीचे विदर्भ अध्यक्ष मध्यरात्री मंडपातून गायब; प्रशासनात खळबळ

पत्नीला आवरेनात अश्रू...

दत्ता लवांडे

जळगाव जामोद : स्वाभिमानीचे विदर्भ अध्यक्ष प्रशांत डिक्कर हे उपोषणाला बसले असताना मंडपातून मध्यरात्रीच्या सुमारास गायब झाल्याची धक्कादायक घटना घडली आहे. गेल्या ५ दिवसांपासून ते जळगाव जामोदमध्ये उपोषणाला बसले होते.रात्री अचानक ते उपोषण मंडपातून गायब झाल्याने प्रशासनाची धावपळ सुरू झाली असून परिसरात खळबळ उडाली आहे. त्यांच्या कार्यकर्त्यांनी जळगाव जामोद पोलिस स्टेशनमध्ये तक्रार दाखल केली आहे.

अधिक माहितीनुसार, स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे विदर्भ अध्यक्ष प्रशांत डिक्कर हे या परिसरातील अतिवृष्टीग्रस्त शेतकऱ्यांना शासकीय मदत मिळाली नसल्याने ही मदत मिळण्यासाठी मागच्या पाच दिवसांपासून उपोषणाला बसले होते. दोन दिवसांपूर्वी प्रशासनाने उपोषण मंडपातील विद्युत पुरवठा खंडित केला होता. त्यानंतर ते आता गायब झाल्यामुळे त्यांच्या पत्नी वंदना डिक्कर यांना अश्रू अनावर झाल्या आहेत.

"परिसरातील अतिवृष्टीमुळे शेतकऱ्यांना मदत मिळण्यासाठी ते उपोषणाला बसले आहेत. मागच्या १५ वर्षांपासून ते शेतकऱ्यांसाठी काम करत आहेत. पण रात्री ४ वाजल्यापासून ते गायब आहेत. त्यामुळे मी आता पोलिस स्टेशनला जात आहे. दोन दिवसांपासून त्यांचा फोन लागलेला नाही. शेवटचा फोन केला होता त्यावेळी त्यांची तब्येत चांगली असल्याचं सांगितलं होतं." असं म्हणत त्या भावूक झाल्या होत्या.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Swami Avimukteshwaranand : स्वामी अविमुक्तेश्वरानंद यांना मोठा दिलासा; अलाहाबाद उच्च न्यायालयाने अटक स्थगित केली

Rashmika wedding: ना पुरोहित , ना अग्नि; तरीही पवित्र! जाणून घ्या रश्मिका–विजयच्या कोडावा पद्धतीतील विवाहसोहळ्यामागील अनोख्या परंपरा

Silver Buying Tips : ऑनलाइन सिल्वर ज्वेलरी खरेदी करताय? मग बनावट चांदीपासून राहा सावध, आत्ताच पाहा फेक ओळखायच्या 'या' 5 ट्रिक्स

Akola News : स्मार्ट मीटरचा पातूर पोलीस स्टेशनला दणका; चार महिन्यांचे ५२ हजार रुपये बिल थकीत, वीजपुरवठा खंडित

Crime: भयंकर! क्षुल्लक वाद विकोपाला गेला; २१ वर्षीय तरूणाने १२ वर्षीय भावाला संपवलं, अमरावतीत धक्कादायक कृत्य

SCROLL FOR NEXT