Team of Central government came in Amravati for inspection of corona patinets
Team of Central government came in Amravati for inspection of corona patinets  
विदर्भ

केंद्र सरकारची चमू अमरावतीत डेरेदाखल: वाढत्या कोरोना रुग्णसंख्येबाबत व्यक्त केली चिंता 

सुरेंद्र चापोरकर

अमरावती ः एकीकडे राज्यातील कोरोना रुग्णांच्या आकडेवारीत घट होत असतानाच अमरावती जिल्ह्यात वाढती कोरोना रुग्णांची संख्या चिंतेचा विषय बनली आहे. याबाबत मार्गदर्शन करण्यासाठी रविवारी (ता. सात) केंद्र सरकारची तीन सदस्यीय चमू अमरावतीला दाखल झाली. सुपर स्पेशालिटी हॉस्पिटलमध्ये अमरावतीसह अकोला, यवतमाळ तसेच वाशीम या जिल्ह्याचा आढावा घेण्यात आला. वाढत्या रुग्णसंख्येवर या वेळी चिंता व्यक्त करण्यात आली.

डॉ. सुजितकुमार सिंग, संकेत कुलकर्णी तसेच रणजित कौशिक अशी या चमूतील तज्ञांची नावे असून सुपर स्पेशालिटी हॉस्पिटलमध्ये तब्बल तीन तास कोरोना रुग्णवाढ तसेच उपाययोजनांबाबत मार्गदर्शन करण्यात आले. जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. श्‍यामसुंदर निकम, जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. दिलीप रणमले, अकोलाचे जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. सुरेस आसोले यांच्यासह यवतमाळ, वाशीम, अकोला येथील आरोग्य अधिकारी उपस्थित होते. 

या वेळी तज्ञांनी जिल्हानिहाय शहरी व ग्रामीण भागातील रुग्णसंख्येची माहिती संबंधित अधिकाऱ्यांकडून जाणून घेतली. कोणत्या वॉर्डामध्ये अधिक केसेस आल्या आहेत, मृत्यूदर, पॉझिटिव्हीचा दर किती? याबाबतची माहिती देण्यात आली. प्रत्येक जिल्ह्यात होम आयसोलेशनची परिस्थिती काय? याची माहितीसुद्धा त्यांनी घेतली.

व्यक्त केली चिंता 

अमरावतीसह इतर काही जिल्ह्यांमध्ये मागील काही दिवसांपासून रुग्णसंख्येत झपाट्याने वाढ झाली आहे. संबंधित जिल्ह्यांच्या यंत्रणांकडून काही तरी कमतरता असल्याचा एकूणच सूर या बैठकीत होता. कोरोना रुग्णांची संख्या आटोक्‍यात आणण्यासाठी चाचण्या वाढविणे, कन्टेनमेन्ट झोनमधील उपाययोजना, कॉन्टॅक्‍ट ट्रेसिंग या उपाययोजना तज्ज्ञ समितीकडून सुचविण्यात आल्या.

आणखी 192 कोरोनाबाधित

संत गाडगे बाबा अमरावती विद्यापीठ, डॉ पंजाबराव देशमुख महाविद्यालय प्रयोगशाळा, रॅपिड ऍण्टिजन टेस्ट तसेच विविध प्रयोगशाळेच्या अहवालानुसार जिल्ह्यात 192 नवे कोरोना रुग्ण आढळल्याची माहिती जिल्हा शल्यचिकित्सक कार्यालयाने दिली आहे. त्यानुसार अद्यापपर्यंत एकूण रुग्णांची संख्या 23 हजार 58 झाली आहे.

संपादन - अथर्व महांकाळ   

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Onion Garlands During Voting: गळ्यात टोमॅटो-कांद्याच्या माळा घालून मतदान; नाशिकमध्ये युवा मतदारांची चर्चा

Maharashtra Lok Sabha 2024 Phase 5 Election Voting LIVE: महाराष्ट्रात मतदारांमध्ये अनुत्साह, अकरा वाजेपर्यंत अवघे 16 टक्के मतदान

Bangladesh MP Missing: भारतात आलेला बांगलादेशचा खासदार 3 दिवसांपासून बेपत्ता; कुटुंबाकडून चिंता व्यक्त

RSS नंतर आता दिग्विजय सिंह यांनी CM योगींचे केले कौतुक मात्र मोदींवर खोचक टीका, नेमकं काय म्हटलं वाचा...

Healthy Tips: आता कमी वयातच पोटाचा वाढतोय घेर, जास्त चरबीमुळे हृदयविकार, मधुमेह, आजारांना निमंत्रण

SCROLL FOR NEXT