esakal | काय सांगता! 'या' गावातील ग्रामपंचायतीत प्रेमवीरांची बाजी: निवडून आलेल्या तब्बल ६ सदस्यांनी केलंय 'लव्ह मॅरेज'
sakal

बोलून बातमी शोधा

Men who done Love marriage elected in Gram Panchayat elctions in Karanji Chandrapur

गोंडपिपरी तालुक्यातील करंजी हे काॅग्रेसचे जेष्ठ नेते विजय वडेट्टीवार यांचे जन्मगाव. प्रेमनगरी म्हणूनही या गावाची एक वेगळी ओळख आहे.गेल्या अनेक वर्षात या गावात प्रेमविवाहाचे शतकपार झाले.

काय सांगता! 'या' गावातील ग्रामपंचायतीत प्रेमवीरांची बाजी: निवडून आलेल्या तब्बल ६ सदस्यांनी केलंय 'लव्ह मॅरेज'

sakal_logo
By
संदीप रायपूरे

गोंडपिपरी (जि. चंद्रपूर) :  गावात ग्रामपंचायत निवडणुक लागली.अनेकंानी उमेदवारी अर्ज दाखल केले.ज्यांनी त्यांनी आपआपल्या परीने प्रचार केला.निकाल लागला अनं अकरा सदस्यापैकी प्रेमविवाह केलेल्या सहा सदस्यांनी निवडणुकीत बाजी मारली.आज दिनांक 8 फेबु्रवारी रोजी सरपंच, उपसरपंच पदाची निवड होणार आहे. या पदावरही हेच प्रेमवीर विराजमान होणार आहेत. गोंडपिपरी तालुक्यातील करंजी गावात प्रेमवीरांचा झालेला विजय राजकीय वर्तुळात चांगलाच चर्चीला जात आहे.

गोंडपिपरी तालुक्यातील करंजी हे काॅग्रेसचे जेष्ठ नेते विजय वडेट्टीवार यांचे जन्मगाव. प्रेमनगरी म्हणूनही या गावाची एक वेगळी ओळख आहे.गेल्या अनेक वर्षात या गावात प्रेमविवाहाचे शतकपार झाले.यात बहुतांश आंतरजातीय विवाहांचा समावेश आहे. प्रेमविवाहातून सुखाने संसार सुरू असतांना आता त्यांना राजकीय सत्तेचे वेध लागले. यंदा सदस्य निवडून आल्यानंतर सरपंच पदाचे आरक्षण पाडण्यात आले. यामुळे अनेक प्रेमवीरांनी आपल्या पत्नीला निवडणुकीच्या रणधुमाळीत उतरविले. 

नक्की वाचा सकाळच्या वेळी शेतातून येत होता खळखळ आवाज; जाऊन बघताच तळपायाची आग गेली मस्तकात 

तर काही प्रेमवीर स्वत उभे राहिले.करंजी हे गोंडपिपरी तालुक्यातील संवेदनशिल गाव.गावात नेहमीच दोन गट आमनेसामने उभे असतात.पण यंदाची निवडणुक खÚया अर्थाने गाजवीली ती प्रेमविरांनी. ग्रामपंचायत निवडणुकांचा निकाल लागला अनं अकरा सदस्यापैकी तब्बल सहा प्रेमविवाह केलेल्यांनी विजयश्री मिळविली. गावातील समीर निमगडे,जानवी तेलकापल्लीवार,जयश्री भडके,आरती निमगडे,शितल वाढई,सरिता पेटकर या निवडून आलेल्या सहा उमेदवारांनी प्रेमविवाह केला आहे.

सदस्यपदाची निवडणुक झाल्यानंतर सरपंचपदाचे आरक्षण पडले. आज दि.8 फेबु्रवारी रोजी सरपंच,उपसरपंच पदाची निवड होणार आहे.यात निवडून आलेल्या प्रेमविवाह करणाÚया उमेदवारांचीच वर्णी लागणार आहे.एकीकडे सहा प्रेमविवाह करणाÚयाच्या पदरी विजयाची माळ पळली असतांना स्मिता चांदेकर या प्रेमविवाह करणाÚया उमेदवाराला मात्र पराभवाचा सामना करावा लागला.करंजी गावातील प्रेमविवाह करणाÚयांनी बाजी मारल्याने हि चर्चा सध्या राजकीय वर्तुळात चांगलीच रंगत आहे.

हेही वाचा - तीन दिवसांपासून बेपत्ता होता शेतकरी; विहिरीतील पाणी काढताच दिसलं भयंकर दृश्य  

मी स्वत प्रेमविवाह केला आहे.मी ग्रामपंचायत सदस्यपदाची निवडणुक जिंकली आहे.आमच्या गावात अकरा पैकी तब्बत सहा प्रेमविवाह करणाÚयांचा विजय झालेला आहे.यामुळे येणाÚया काळात प्रेमभावनेसोबत आम्ही विकासकामावरही भर देणार आहोत.

संपादन - अथर्व महांकाळ 

loading image
go to top