विदर्भ

बालगृहातील विद्यार्थ्यांच्या यशाचे कौतुक प्रेरणादायीच

रूपेश खैरी

वर्धा : दहाव्या वर्गाचा निकाल नुकताच लागला. यात उत्तीर्ण झालेल्या अनेक बालकांच्या पालकांनी कौतुक केले. या परीक्षेत येथील बालगृहातील १४ मुले उत्तीर्ण झालीत. त्यांचे कौतुक करण्यासाठी कोणी पुढे आले नाही. अशात मातृ हृदयी जिल्हाधिकारी प्रेरणा देशभ्रतार आणि सीईओ डॉ. सचिन ओम्बासे यांनी पुढाकार घेत मुलांना घरी बोलाऊन यशाचा आनंद साजरा केला. हे कौतुक त्यांच्यासाठी खरच प्रेरणादायी ठरणारे आहे. (tenth-pass-Balgruh-students-Collector-Prerna-Deshbhratar-Wardha-News-nad86)

जिल्हाधिकाऱ्यांनी केवळ आनंदच साजरा केला नाही त्यांना घरच्या टेबलावर बसवून जेवणाचा आस्वाद घेतला. एवेच नाही तर त्यांच्या यावेळी मुलांना त्यांच्या सोबत घेत केक कापून सर्वांनी टाळ्या वाजवून या यशाचा आनंद साजरा केला. यावेळी जिल्हा परिषदेचे मुख्यकार्यकारी अधिकारी डॉ. सचिन ओम्बासे आणि जिल्हाधिकारी प्रेरणा देशभ्रतार यांचे पती कस्टम विभागात कार्यरत असलेले प्रशांत पाटील उपस्थित होते. त्यांची उपस्थिती या विद्यार्थ्यांना आनंद देणारीच होती.

बालगृहात असलेल्या या बालकांच्या आनंदात जिल्हाधिकारी स्वतः एका मातेप्रमाणे त्यांच्या पाठीशी उभ्या राहिल्याने या बालकांना मिळालेला आनंद त्यांच्या जीवनात सकारकात्मक बदल घडविणारा ठरणार अशा भावना बाल संरक्षण विभागाच्या वतीने व्यक्त करण्यात येत आहे. तर जिल्ह्याच्या एका मुख्य अधिकाऱ्याने या बालकांना दिलेला प्रेमाचा आधार त्यांच्या आयुष्याच्या वाटेवर मोलात ठरणार यात दुमत नसल्याचे उपस्थितांकडून सांगण्यात आले.

इरा आणि इशानीची उपस्थिती

जिल्हाधिकाऱ्यांच्या शासकीच निवासस्थानी आयोजित या कौतुक सोहळ्यात जिल्हाधिकाऱ्यांची कन्या इरा आणि सीईओंची कन्या इशानी यांची उपस्थिती या बालकांसाठी महत्त्वाची ठरली. या दोघींनी या मुलांसोबत घालवलेल्या वेळाने आणि साधलेल्या संवाद त्यांना आपण बाहेर नाही तर आपल्या घरीच असल्याचा अनुभव देत होता.

(tenth-pass-Balgruh-students-Collector-Prerna-Deshbhratar-Wardha-News-nad86)

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Sharad Pawar: "अरे मामा जरा जपून... तुझं सर्व काढायला वेळ लागणार नाही"; इंदापुरात शरद पवारांचा इशारा!

IPL 2024 PBKS vs CSK Live Score : ऋतुराजने पुन्हा नाणेफेक गमावली; पंजाबने घेतला गोलंदाजीचा निर्णय

Lok Sabha : 'एक भाकरी, एक रूपया द्या.. एका भिक्षुकाला पंतप्रधान करा' म्हणणाऱ्या विजयप्रकाश कोंडेकरांकडे किती आहे संपत्ती?

Latest Marathi News Live Update : भारतातील निवडणूक प्रक्रिया पाहण्यासाठी आले 23 देशांमधील पाहुणे

South India Travel : उन्हाळ्यातही करू शकता दक्षिण भारताची सफर; जाणून घ्या 'ही' थंड हवेची ठिकाणं?

SCROLL FOR NEXT