वाघाचा मृत्यू sakal
विदर्भ

Tiger death : विषबाधेमुळे वाघाचा मृत्यू! ट्रान्झिट ट्रीटमेंट सेंटरमध्ये सुरू होते उपचार

सकाळ डिजिटल टीम

नागपूर : दक्षिण उमरेड वन परिक्षेत्रातील चारगावमधील मसाळा बिटमध्ये सहा दिवसापूर्वी जखमी वाघाला जेरबंद करण्यात आले होते. त्याचा सेमिनरी हिल्स येथील ट्रान्झिट ट्रीटमेंट सेंटरमध्ये उपचारा दरम्यान रविवारी मृत्यू झाला.

वाघाच्या शरिरात पस होऊन निर्माण झालेल्या विषबाधेमुळे अवयव संस्था निष्क्रिय झाली. त्यामुळे या वाघाचा मृत्यू झाला असावा असा प्राथमिक अंदाज पशुवैद्यकीय अधिकाऱ्यांनी व्यक्त केला आहे

बिट क्रमांक ३७४ राखीव वनातून नर जखमी वाघाला १९ जूनला जेरबंद केले होते. त्याच्या समोरील पायात जखम असल्यामुळे उपचारासाठी ट्रान्झिट ट्रीटमेंट सेंटरमध्ये आणले होते. तेव्हापासून उपचार सुरू होते. रविवारी मध्यरात्री जखमी वाघाचा मृत्यू झाल्याचे पशुवैद्यकीय अधिकाऱ्यांनी सांगितले.

राष्ट्रीय व्याघ्र संवर्धन प्राधिकरण (एनटीसीए) च्या मार्गदर्शक सूचनेनुसार समिती गठित करण्यात आली. चमूसमोर वाघाचे शवविच्छेदन करण्यात आले. विसरा नमुने गोळा करून लॅबला पाठविण्यात आले आहे. त्याच्या अहवालानंतर मृत्यूचे नेमके कारण स्पष्ट होणार आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Prithviraj Chavan: ''तुम्ही माझा राजकीय खून केलात?'' पृथ्वीराज चव्हाणांना गोपीनाथ मुंडे काय म्हणाले होते? पडद्यामागे नेमकं काय घडलेलं?

Samarth Movie Review: मनाचे श्लोक, अध्यात्म अन् बाप-लेकाचा संघर्ष; विचार करायला लावणारा 'समर्थ'; कसा आहे चित्रपट?

स्वतःला देशभक्त म्हणवता? मग यातील कोणकोणते चित्रपट तुम्ही पाहिलेत?

Hockey World Cup: पेनल्टी कॉर्नर ठरले भारताचे अस्त्र! स्वातंत्र्यदिनी वेल्सला हरवत विजयी सुरुवात

Crime: एका संशयाने नात्याला काळिमा! सासू आणि पत्नीच्या वादातून संताप अनावर; जावयाने उचललं टोकाचं पाऊल, काय घडलं?

SCROLL FOR NEXT