विदर्भ

आपल्याच शेतात जाण्यासाठी रस्ता नाही; मग काय घेतले विष

सकाळ वृत्तसेवा

चांदूरबाजार (जि. अमरावती) : शेतीच्या रस्त्याचा वाद मिटावा यासाठी प्रशासनाकडे दाखल तक्रारीचा निपटारा न झाल्यामुळे वैफल्यग्रस्त शेतकऱ्याने (farmers news) नायब तहसीलदारांच्या दालनात विष पिऊन आत्महत्या करण्याचा (attempt to suicide) प्रयत्न केला. सचिन रामेश्वर वाटाणे (वय ४०) असे आत्महत्येचा प्रयत्न करणाऱ्या शेतकऱ्याचे नाव आहे. (The-farmer-took-poison-in-the-hall-of-the-Deputy-Tahsildar)

पावसाळ्यात पेरणी तोंडावर आली असताना आजूबाजूच्या इतर शेतकऱ्यांनी शेतात जाण्यायेण्याचा रस्ताच बंद करून टाकला. त्यामुळे सचिन रामेश्वर वाटाणे (रा. चांदूरबाजार) हे काही दिवसांपासून चिंतित होते. बेलोरा बेसखेडा मार्गावर सचिन वाटाणे यांची आई पुष्पा वाटाणे यांच्या नावाने नऊ एकर शेत आहे. त्यांच्याच शेतात त्यांना जाण्यासाठी रस्ता नाही.

त्यांनी काही दिवसांपूर्वी तहसील कार्यालयामध्ये तक्रार अर्ज सादर केला होता. त्यांच्या तक्रारीवरून नायब तहसीलदार देवेंद्र सवई यांच्या कक्षामध्ये मंगळवारी (ता. २९) सुनावणी होणार होती. परंतु, त्यापूर्वीच सचिन वाटाणे हे नायब तहसीलदार सवई यांच्या दालनात पोहोचले. त्यांच्यासोबत चर्चा केली. परंतु, त्यांचे समाधान झाले नाही. त्यामुळे त्यांनी सोबत बॉटलमध्ये आणलेले विष नायब तहसीलदार यांच्या दालनात असताना प्राशन करून आत्महत्या करण्याचा प्रयत्न केला. संबंधितांनी घटनेची माहिती चांदूरबाजार पोलिसांना दिली. पोलिसांनी सचिन वाटाणे यांना उपचारासाठी चांदूरबाजारच्या ग्रामीण रुग्णालयात दाखल केले.

सचिन वाटाणे यांच्या अर्जावर मंगळवारी सुनावणी होणार होती. त्यांनी मंगळवारी येणे अपेक्षित होते. शेतात जाण्यासाठी तात्पुरता रस्ता मोकळा करण्याची सहमतीसुद्धा झाली होती. तसे पत्र त्यांना सुनावणीच्या दिवशी मिळणार होते. परंतु, त्यांनी अचानक असे का केले? याबाबत समजू शकले नाही.
- देवेंद्र सवई, नायब तहसीलदार, चांदूरबाजार

(The-farmer-took-poison-in-the-hall-of-the-Deputy-Tahsildar)

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Rohit Shetty : रोहित शेट्टीच्या घरावर गोळीबार, आणखी चौघांना अटक; मोबाईलसह महत्त्वाचे पुरावे हाती

Nashik Ration Shops : ग्रामपंचायती अन् बचत गटांची प्रतीक्षा संपणार कधी? नवीन रेशन परवान्यांसाठी नाशिककर आक्रमक

Pune News: वारज्यात महामार्गाचीच कोंडी! दीड किलोमीटर अंतर पार करण्यासाठी लागतो दीड तास; काय आहेत काेंडीची कारणे..

फक्त एका मालिकेमुळे रातोरात प्रसिद्ध झाली अभिनेत्री नंतर अचानक झाली गायब; आता ओळखणंही झालं कठीण

Latest Marathi News Update : नागपूर विमानतळावरील सुरक्षा मशिन्स पूर्ववत सुरू

SCROLL FOR NEXT