Crime
Crime 
विदर्भ

चोरी पकडली म्हणून घरावर केला हल्ला

सकाळवृत्तसेवा

नागपूर - कळमना पोलिस ठाण्याच्या हद्दीत असलेल्या वैष्णोनगर परिसरात सायकल चोरत असलेल्या मुलाला पकडून त्याच्या आईच्या स्वाधीन केले असता, मुलासह नातेवाइकांनी एकत्रित येऊन एका व्यक्तीसह त्याच्या कुटुंबावर प्राणघातक हल्ला करून गंभीर जखमी केल्याची घटना मंगळवारी (ता. २३) सायंकाळी सहा ते रात्री दहादरम्यान घडली.

शिवशंकर रामेश्वर पांडे (वय ५५, प्लॉट नं. १०८, वैष्णवदेवीनगर) हे पुजारी असून ते कथा आणि धार्मिक कार्य करतात. काल सायंकाळी ते आपल्या घरी गाईचे दूध काढीत असताना नागेश्‍वर गजानन बांद्रे हा त्यांची सायकल चोरून नेताना दिसला. त्यांनी नागेश्‍वरला पकडले. तसेच त्याला शिवशक्‍ती बारमागे असलेल्या त्याच्या आईच्या दुकानात नेत त्याच्या कृत्याबद्दल सर्व हकीकत सांगितली. मात्र, मुलाला समजावण्यापेक्षा त्यांनी शिवशंकर पांडे यांच्याशीच भांडणास सुरुवात केली. तसेच परिसरातील दोन मुलांना बोलावून पांडे यांना मारहाण केली. 

आपला जीव वाचवीत ते कसेबसे घरी पोहोचले. मात्र, काही वेळातच नागेश्वर गजानन बांद्रे (रा. तुकाराम वाडी) हा आपल्यासोबत पाच ते दहा साथीदार घेऊन आला. त्याने घरात असलेल्या शिवशंकर पांडे यांच्या पत्नी, पुतनी, मोठा भाऊ ब्रिजनंदन पांडे (वय ६४) आणि जावई पीयूषकांत पांडे (वय ४०) यांना डोक्‍यावर मारून जिवानीशी ठार मारण्याचा प्रयत्न केला. तसेच घरासमोर असलेल्या दुचाकी वाहनाचे नुकसान केले. 

या प्रकरणी दिलेल्या तक्रारीवरून कळमना पोलिसांनी आरोपींविरुद्ध गुन्हा दाखल केला असून, तपास करीत आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

SRH vs LSG : अभिषेक शर्माचे SRH साठी सर्वात वेगवान अर्धशतक; 10 षटकात लखनौचं आव्हान केलं पार

Mumbai News: रुग्णवाहिका खरेदी निविदा प्रक्रिया भोवणार,उच्च न्यायालयाने घेतली दखल, भूमिका स्पष्ट करण्याचे दिले निर्देश

Mumbai Airport: तब्बल इतक्या वेळ मुंबई विमानतळ रहाणार बंद, जाणून घ्या काय आहे महत्वाचं कारण

Police Bharti 2023 : पोलिस भरतीमध्ये एकापेक्षा जास्त अर्ज केलेल्या उमेदवारांना द्यावं लागणार हमीपत्र; आदेशात नेमकं काय म्हटलंय?

Pune Crime : मतदानानंतर वारजे परिसरात गोळीबार, दोघे अल्पवयीन ताब्यात

SCROLL FOR NEXT