संग्रहित छायाचित्र
संग्रहित छायाचित्र 
विदर्भ

चोरट्याची उडी चुकली आणि नागरिकांनी दिला चोप

संतोष ताकपिरे

अमरावती : घरफोडी करण्याच्या उद्देशाने दोघे घरात घुसले. परंतु, जागृत नागरिक घराभोवती जमल्याने चोरट्यांना पळता भुई झाली. त्यापैकी एक निसटला. परंतु दुसऱ्याने घरावरून उडी मारताना खाली आदळून गंभीर जखमी झाला. अन्‌ तो जमावाच्या हाती सापडला.

शहरातील उत्तमनगर गल्ली नंबर (दोन) मध्ये मध्यरात्रीनंतर दोनच्या सुमारास ही घटना घडली. येथील विशाल वासुदेव कांबळे यांच्या घरात मध्यरात्री दोनच्या सुमारास कसलातरी आवाज आला. शेजारच्या महिलेने घटनेची माहिती संदीप देविदास इंगळे यांना दिली. आसपासचे लोक घराभोवती जमले. चोरट्यांना त्यांचा डाव फसल्याची कल्पना आली. त्यामुळे त्यांनी कोणताही ऐवज चोरून न नेता, तेथून, पळून जाण्याचे ठरविले.

दोघांपैकी एकाने सर्व्हिस गल्लीतून पळ काढला. दुसऱ्याने घराच्या छतावरून उडी घेऊन पळण्याचा प्रयत्न केला. परंतु उडी मारताच, त्याला गंभीर दुखापत झाली. परिसरातील नागरिकांनी जखमी बंटी गोंडाणेस पकडून फ्रेजरपुरा पोलिसांना घटनेची माहिती दिली. पळालेला साथीदार मनोज गोंडाणे व बंटी या दोघांविरुद्ध इंगळे यांच्या तक्रारीवरून फ्रेजरपुरा पोलिसांनी गुन्हा दाखल केला.

सिलिंडरचोरांना सीसीटीव्हीने टिपले
गाडगेनगर ठाण्याच्या हद्दीत क्षितिज मंगल कार्यालय परिसरातून गॅस सिलिंडर चोरी करणाऱ्यास येथील सीसीटीव्ही कॅमेऱ्याने टिपले. गजानन शेषराव कडू यांच्या तक्रारीवरून पोलिसांनी अज्ञात व्यक्तीविरुद्ध चोरीचा गुन्हा दाखल केला.

संपादन - नरेश शेळके
 

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

IPL 2024, RCB vs CSK: चेन्नईचा 17 व्या हंगामातील प्रवास थांबला! धोनीचीही कारकिर्द संपली? सामन्यानंतरचा पाहा Video

Loksabha Election 2024 : हुश्श..! प्रचार संपला, राज्यात तोफा शांत, तलवारी म्यान

IPL 2024: RCB चा आनंद गगनात मावेना! प्लेऑफमध्ये पोहचताच केला जोरदार जल्लोष, पाहा Video

‘चार सौ पार’ पासून बहुमताच्या आकड्यापर्यंत

सत्ता ठरवणारा उ त्त र रं ग

SCROLL FOR NEXT